Posts

Showing posts from September, 2022

शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी घेतली सदिच्छा भेट.

Image
शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी घेतली सदिच्छा भेट.  पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  राज्यावर केंद्राचे संकटआल्याने शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्याचबरोबर शिवसेना पक्ष नव्याने उभारण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मातोश्री येथे उपस्थित राहून घेतली सदिच्छा भेट भेटीदरम्यान सदैव आपल्या पाठीशी असणार अशी ग्वाही सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख मा. प्रतापराव जाधव यांनी दिली. यावेळी शिवसेना पक्षाचे उपनेते मा. नितीन बानगुडे पाटील सर. नवनियुक्त सातारा जिल्हा प्रमुख प्रतापराव जाधव. उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे. भानुदास कोरडे सर. तालुकाप्रमुख रमेश बोराटे. महाराष्ट्र रंग कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय घोरपडे. खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर. असलम भाई शिकलगार यांच्यासह शेकडो शिवसैनिक मातोश्री येथे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वर्धनगड गावचे सुपुत्र असलमभाई  शिकलगार यांची विचारपूस केली असता जिल्हाप्रमुख प्रतापराव जा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिस्कळ गावचे सुपुत्र शामराव मद‌ने समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत.

Image
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिस्कळ गावचे सुपुत्र  शामराव मद‌ने समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   डिस्कळ गावचे सुपुत्र ,जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जय मल्हार संघटनेचे च्या वतीने भिवडी ता पुरंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , भटके विमुक्त जाती जमाती मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते आमदार गोपीचंद पडळकर व संघटनेचे संस्थापक दौलत उमाजी शितोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कोअर कमेटी अध्यक्ष रामदास धनवटे,अंकुशराव जाधव, रोहिल मद्ने हनुमंत भांडवलकर, प्रविण नाईक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इरफान जमादार व राजू मुल्ला यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कोरेगाव राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड.

Image
इरफान जमादार व राजू मुल्ला यांच्या  सामाजिक कार्याची दखल घेत कोरेगाव राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग कोरेगाव शहर अध्यक्षपदी इरफान सलीम जमादार यांची राष्ट्रवादी काँग्रेस  अल्पसंख्यांक अध्यक्ष शफिक शेख यांनी निवड करून आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. इरफान जमादार व राजू मुल्ला यांचे असलेले समाजातील कार्य तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांचे योगदान हे लाख मोलाचे असून वेळोवेळी त्यांनी कोरेगाव शहर अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून शशिकांत शिंदे साहेबांची पाठ राखण केली आहे. तसेच समाजातील त्यांचे असलेले स्थान  व त्यांच्या पाठीमागे असलेले लोकमत हे खरोखरीच उल्लेखनीय असून  एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समाजाच्या असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची सर्वानुमते कोरेगाव शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी अनेक अल्पसंख्याक समाजातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के...

सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम यांच्या हस्ते विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीचे आज आयोजन.

Image
सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम यांच्या हस्ते विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीचे आज आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  विसापूर ता .खटाव. येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही मालिकेतील लोकांच्या मनामनात घर  करणारी मालिका ,, साता जन्माच्या गाठी ,,व तुझ्या रूपाचं चांदणं ,,यातील सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम  मु .पो .अंभेरी ता. कोरेगाव यांच्या हस्ते देवीच्या आरतीचे आयोजन दिनांक 30. 9 .2022 शुक्रवार रोजी सायंकाळी 6.45 वा.ता करण्यात आले असून ते विसापूर येथील गुलाब नाना साळुंखे( बापू) यांचे नातू आहेत तरी विसापूर परिसरातील सर्व भक्तांनी सायंकाळी आरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघेश्वरी नवलाई देवी उत्सव समितीने केले आहे. 

कोरेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने बेवारसरित्या आढळलेल्या वाहनांबाबत आवाहन; मुदतीत वाहने न नेल्यास लिलाव करणार : पोलीस निरीक्षक नितीन सावंत.

Image
कोरेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने बेवारसरित्या आढळलेल्या वाहनांबाबत आवाहन; मुदतीत वाहने न नेल्यास लिलाव करणार : पोलीस निरीक्षक नितीन सावंत. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव पोलीस ठाण्यात बेवारस रित्या व न्यायालयीन निकाल लागलेल्या गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल तसेच एकूण ३३ दुचाकी व ४ चार चाकी वाहने असून या वाहनांबाबत मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तींनी दिनांक  ३० नोव्हेंबरपर्यंत कोरेगाव पोलीस ठाणेत येवून वाहने पाहुन खात्री करावी व खात्री झाले नंतर  कागदपत्रे सादर करावीत व वाहन घेऊन जावे अन्यथा त्याचा कायदेशीर लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.  कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३३ दुचाकी व ४ चार चाकी वाहनेही बेवारस स्थितीत मिळून आलेकी आहेत, ही सर्व वाहने व न्यायालयीन निकाल लागलेल्या सोन्याच्या गुन्ह्यातील मुद्देमाल शासन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांबाबत अद्याप कोणीही मालकी हक्क सिद्ध केलेला नाही. कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, ज्यांची ही वाहने असतील त्यांनी मूळ कागदपत्र...

शुक्रवारी जाखणगाव येथे येस ग्रुपच्या सोयाबीन खरेदी केंद्र व गोदामाचा उद्घाटन समारंभ.

Image
शुक्रवारी जाखणगाव येथे येस ग्रुपच्या सोयाबीन खरेदी केंद्र व  गोदामाचा  उद्घाटन समारंभ.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.                  जाखणगाव .ता. खटाव येथील येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी संचलित सोयाबीन खरेदी केंद्र क्रमांक -1 व गोदाम क्रमांक-1 चा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सहकार बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून येस बँकेचे महाव्यवस्थापक हरतेज सिंग, राज्य प्रकल्प व्यवस्थापक ज्योति शंखपाल,  इनपुट डिव्हिजनचे हेड पांडुरंग जाधव ,ऍग्रो बाजारचे रवींद्र साखरे, कृषी बाजारचे राज्यव्यवस्थापक कुशाग्र मुंगी , जिल्हा कृषीअधीक्षक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे ,तालुका कृषी अधिकारी राहुल जीतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होईल यावेळी सर्व सभासद शेतकरी प्रगतशील शेतकरी सातारा जिल्ह्यातील...

वर्धनगड येथील मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीच्या रस्त्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज.

Image
वर्धनगड येथील मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीच्या रस्त्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज. पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  वर्धनगड मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीसाठी रस्ताची नितांत गरजेची मागणी असून सध्या असलेल्या दफनभूमीमध्ये मयत व्यक्तींना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही तर मयत नेहण्यासाठी सरळ रस्ता सुद्धा नाही त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावरून बांधावरून दफन भूमीमध्ये मयत न्यावे लागत आहे, ही मोठी सध्याच्या काळात शोकांतिका असून,प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करून येथील मुस्लिम समाजास दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व जुन्या दफन भूमीकडे जाणारा रस्ता त्वरित डांबरी करून देण्याची मागणी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. .  वर्धनगड तालुका खटाव या गावांमध्ये मुस्लिम समाजाचे 70 ते 80 घरी असून 600 ते 700 लोकसंख्या आहे. मुस्लिम समाजास पूर्वंपार या ठिकाणी फक्त सात गुंठे दफनभूमी आहे. शेजारून ओढा जात असल्याकारणाने ओढ्याला येण्याच्या पाण्याच्या प्रवाहाने आत्तापर्यंत दोन ते तीन गुंठे जागा त्यामध्ये गेली आहे. या ठिक...

निढळ येथील आयआयटी पवई मुंबई येथील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा मा.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन.

Image
निढळ येथील आयआयटी पवई मुंबई येथील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा  मा.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. निढळ ता खटाव येथे आय आय टी  पवई मुबई मधील 33 विद्यार्थी यांनी या गावचा अभ्यास दौरा केला. त्यावेळेस माजी विभागीय आयुक्त व निढळ चे सुपुत्र चंद्रकांत दळवी यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की  ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गुणवत्ते मध्ये कुठे ही कमी नाही. मराठी मीडियम मधील विद्यार्थी सुध्दा आय आय टी मध्ये जावू शकतात हे या अभ्यास दोऱ्यात आलेल्या काही विद्यार्थी यांनी दाखवून दिले आहे.प्रयत्न आणि कष्ट केल्यास आपल्या विद्यार्थ्यांना आय आय टी अशक्य नाही .  यावेळी निढळ परिसरातील विद्यार्थी व आय आय टी मधील विद्यार्थी  यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आय आय टी मधील विद्यार्थ्यांना येथील विद्यार्थी अनेक प्रश्न विचारले व त्याची उत्तरे आय आय टी मधील विद्यार्थी नी दिली. व येथील तरुणांना प्रोत्साहन दिले.  आय आय टी मधील विध्यार्थ्यांना दोन दिवस निढळ चा अभ्यास दौरा केला. यामध्ये निढळ मधील विक...

सातारा जिल्ह्यामधील लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय असण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका:जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल.

Image
सातारा जिल्ह्यामधील लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय असण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत या कारणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे. अशी अफवा पसरवतात सातारा पोलीस दलामार्फत शहानिशा केली असता ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी असल्याबाबत जर कोणी जाणीवपूर्वक सदरची अफवा पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले असते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत या करिता सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलामार्फत केले जात आहेत व सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी पालकांनी अशा तथ्यहीन अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आपण राहात असलेल्या परिस...

पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती उत्तर कोरेगाव भारतीय जनता पार्टी तर्फे उत्साहात साजरी.

Image
पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती उत्तर कोरेगाव भारतीय जनता पार्टी तर्फे  उत्साहात साजरी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त उत्तर कोरेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने पिंपोडे बुद्रुक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. सेवा सप्ताहानिमित्त दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रदर्शित होणाऱ्या मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते.२५ सप्टेंबर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय जनसंघाचे अध्यक्ष मा.पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्री डॉ. भागवत कराडकर यांचे स्वीय सहाय्यक मा.अमितजी चव्हाण यांनी दिली. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी , पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेतून सुरू झालेल्या राष्ट्रीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या प्रवासाविषयी माहिती देण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामील करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला.  ...

अल्पसंख्याक बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा :मा.जिल्हाधिकारी सो!

Image
अल्पसंख्याक बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा :मा.जिल्हाधिकारी सो!  कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.   कोरेगाव शेजारील कब्रस्तान लगत असणाऱ्या वॉल कंपाऊंड तोडून काही जणांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमणाच्या बाबत कोरेगाव येथील मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असता काही लोकांनी मनात राग ठेवून संबंधित अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहीद कुरेशी यांच्या वरती प्राण घातक हल्ला करून त्यांची गाडी पेटवली व तसेच त्यांचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला अशा काही अल्पसंख्याक विरोधी लोकांच्या वरती कडक कारवाई होणे गरजेचे आहे एकंदरच म्यपको कोरेगाव येथील कब्रस्तान लगत असणाऱ्या अतिक्रमण  करणाऱ्यांची संख्या एक वरून पाच पर्यंत पोहोचलेली आहे त्याच संबंधितांनी कुरेशी यांच्यावरती जीवघेणी हल्ला केलेला आहे तरी अशा लोकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा बुधवार दिनांक 28 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या  वतीने अल्पसंख्याक बांधवांच्या न्याय हक्कासाठी व कब्रस्तान बचाव यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आले. 

रणसिंगवाडी येथील क्षितिजा रणसिंग सर्वप्रथम पहिली महिला वकील होण्याचा बहुमान.

Image
रणसिंगवाडी येथील क्षितिजा रणसिंग सर्वप्रथम पहिली महिला वकील होण्याचा बहुमान. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.    रणसिंगवाडी ता. खटाव येथील अतिशय दुर्गम व डोंगर भागात बसलेल्या वाडीमध्ये कोणत्याही शासकीय सुविधा नसतानाही परिस्थितीवर मात केली असून त्यांचे प्राथमिक शिक्षण रणसिंगवाडी मध्येच झाले तर पुढील शिक्षण ,स्वामी मुक्ता नंद हायस्कूल चेंबूर, कुमुद विद्या मंदिर गोवंडी येथे पदवीधर शिक्षण झाले असून व्ही .इ .एस. कॉलेज चेंबूर येथे लॉचे शिक्षण पूर्ण  करून कुमारी क्षितिजा राजेंद्र रणसिंग या गावातील सर्वप्रथम पहिल्या महिला वकील होण्याचा बहुमान मिळाला असून गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे  त्यांच्या या यशाबद्दल  गावातून त्यांचं आई ,वडील, भाऊ ,बहीण, चुलते व नातलग लोकांनी अभिनंदन केले असून महिला, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार, राजकीय नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य ,शेतकरी वर्ग यांनी मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून कोरेगावात मोटरसायकल जाळली ;

Image
जुन्या भांडणाच्या रागातून कोरेगावात  मोटरसायकल जाळली ; कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरासमोरील उभी असलेली एक्टिवा मोटरसायकल कोरेगाव येथील विशाल बर्गे याने रात्रीच्या वेळी पेटवून दिली, पेटलेली दुचाकी पाहताच दुचाकी एक्टिवाची मालक असलेल्या समीना कुरेशी यांनी विशाल बर्गे चे नाव घेतले म्हणून, विशाल ची आई चित्रलेखा बर्गे व वडील चंद्रकांत बर्गे यांनी दमदाटी करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार कोरेगाव पोलीस स्टेशनला समीना कुरेशी यांनी दिली असून घटनेचा तपास कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सनी आवटे करीत आहेत.कोरेगाव येथील चौथाई गल्ली मध्ये राहत असलेल्या समीना व शाहिद कुरेशी सातारला आपल्या चारचाकी वाहनातून मुलीला व जावयाला सोडून येत असताना, घरासमोर आल्यानंतर रात्री साडेबाराच्या दरम्यान विशाल बर्गे सिगारेट ओढून, त्याने माझ्या मोटरसायकलच्या फाटलेल्या सीटवर काहीतरी टाकून जुन्या केसचा राग मनात धरून हातातील लाईटरने माझ्या घरासमोरील लावलेली ऍक्टिवा फोर जी एम एच 11 सी एन 17 99 ही मोटरसायकल पेटवून देत असल्याचे पाहिले, माझ्या चार चाकी गाडीच्या ला...

उद्धव ठाकरेंच्या मस्तकी लावण्यासाठी किल्ले प्रतापगडावरील माती जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिली भेट.

Image
उद्धव ठाकरेंच्या मस्तकी लावण्यासाठी किल्ले प्रतापगडावरील माती जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिली भेट. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या  सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड किल्ल्यावरील माती साताऱ्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कलशातून भेट दिली आहे.. स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानचा कोथळा याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता.. ती भूमी पराक्रमाची साक्ष असल्याने त्या भूमीतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मस्तकी आणि त्यांच्या चरणी त्या भूमितील माती लावण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पवित्र भूमीतील मातीचा कलश सुपूर्द केला. महाराष्ट्रावर अफजलखानरुपी संकट आले होते.त्याच पद्धतीने राज्यावर केंद्राचे संकट आले असून त्यावर मात करण्यासाठी आई भवानी उद्धव ठाकरेंना ताकद देईल अशी आशा शिवसैनिकांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली.  यावेळी नवनियुक्त सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव,नितीन बानगुडे-पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्र...

पत्नीस जीवदेण्यास प्रवृत्त केल्याने पतीस सक्त मजुरी

Image
पत्नीस जीवदेण्यास प्रवृत्त केल्याने पतीस सक्त मजुरी फलटण सोनवडी प्रतिनिधी. नासिर शेख.  जिंती ता.फलटण येथील रोहिदास भास्कर घाडगे वय वर्ष 23 व दिपाली रोहिदास घाडगे हे दोघे पती पत्नी असून पती रोहिदास घाडगे याने त्याची पत्नी रूपालीस किरकोळ कारणावरून छळ करीत तिच्या चारित्र्यावर संशय घेत वेळोवेळी गलीच्छ शिवीगाळ व दमदाटी करून त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून दिपाली हिने आत्महत्या केली. तिच्या भावाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने या पोलीस ठाण्याचे सपोनि    नागटिळ्क साहेब यांनी तपास करून दोषारोपपत्र साक्ष पुराव्यासह न्यायालयात दाखल केल्याने त्यांच्या सहकार्याने पती रोहिदास घाडगे यास न्यायमूर्ती यांनी  सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड असी सजा सुनावली. 

शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रणजितसिंह भोसले तर महिला जिल्हासंघटकपदी शारदाताई जाधव यांची निवड.

Image
शिवसेना  शिंदे  गटाचे  युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रणजितसिंह भोसले तर महिला  जिल्हासंघटकपदी शारदाताई जाधव  यांची  निवड. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. सातारा      जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथजी  शिंदे  यांचे हात  बळकट  करण्यासाठी नुकताच   प्रवेश  झालेले  रणजितसिंह भोसले  व महिला  आघाडीच्या  जिल्हा संघटक सौं शारदाताई  जाधव  यांनी प्रवेश  केला व  लगेचच  काही दिवसात त्यांची शिंदे  गटाने फेर निवड करण्यात आली यावेळी त्यांना सातारा जिल्हाचे अधिकृत पत्र पक्षाचे  सचिव श्री संजयजी  मोरे सचिव  श्री किरण  पावसकर पक्ष प्रवक्त्या व उपनेत्या  शीतलताई म्हात्रे सातारा संपर्क प्रमुख  श्री शरदजी कणसे यांच्या उपस्थितीत  दिले. या वेळी रणजीतसिंह भोसले म्हणाले  मी शिवसेनेतच आहे फक्त नेतृत्व आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायेत त्यांच्या सोबत जावुन बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात वाचवायचं काम मी आता हाती घेतलय. शेवसेनेत काम ...

कोरेगाव येथील हाजी मोहम्मद शेख मिस्त्री यांचे दुःखद निधन.

Image
कोरेगाव येथील  हाजी मोहम्मद शेख  मिस्त्री यांचे दुःखद निधन.  कोरेगांव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  कोरेगाव येथील हाजी महंमद बादशाह शेख मिस्त्री यांचे अल्पशा आजार तसेच वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले हाजी महंमद मिस्त्री हे मोटार व्यवसायातील चांगले कारागीर होते ते कोरेगाव सह अनेक तालुक्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू तसेच सर्वांशी चेष्टा मस्करी करणे नेहमी हसतमुख सगळ्यांशी विचारपूस करणारा असा होता. लहानापासून आबाल वृद्धापर्यंत  त्यांच्याशी एकदा ओळख झाली की कधीच ते कोणास विसरत नव्हते नेहमीच सर्वांसाठी व गोरगरिबांसाठी धावून जाणारे महंमद मिस्त्री हे सर्वांमध्ये परिचित होते. अगदी छोट्या वयापासून त्यांनी ट्रक लेलँड दुरुस्ती करणे हा मिस्त्री व्यवसाय सुरू केला होता त्यामध्ये ते अत्यंत तरबेज होते. त्यांच्या रूपाने आज कोरेगाव शहरातील एक मोटार व्यवसायातील एक नामांकित हाजी मोहम्मद मिस्त्री आपल्यातून नियतीने हिरावून नेला आहे. त्यांच्या जाण्याने कोरेगाव शहरासह मोटार व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले नात...

बोरगाव पोलिसांची दमदार कामगिरी तीन चोर व टेंपोसह५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Image
बोरगाव पोलिसांची दमदार कामगिरी तीन चोर व  टेंपोसह५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.      पुसेगांव प्रतिनिधी  पंकज कदम.        खोडद (ता.सातारा) येथे असलेलता संत निरंकारी मंडळाच्या कंपाउंडचे गेट उघडून तेथील पत्र्याचे शेड उचकटून सुमारे ३६ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन चोरट्याना केवळ २४ तासांत जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले.निकेत वसंत पाटणकर (वय.२९),अनिकेत वसंत पाटणकर (वय.३०,दोघे रा.नवीन एम.आय.डी. सी,चंदननगर,कोडोली,सातारा) व गणेश धनंजय ननावरे (वय.२४,नांदगिरी, ता.कोरेगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.बोरगाव पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे परिसरारून कौतुक होत आहे.          याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खोडद गावच्या हद्दीत सातारा-कराड मार्गावर महामार्गानजीक संत निरंकारी मंडळाची जागा आहे.त्या जागेभोवती कंपाउंड केले असून तेथे पत्र्याचे शेड बांधले आहे.महेश माने हे या ठिकाणी देखभाल करत असतात.        या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी शेडच्या पत्र्याची पाने उ...

अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई यांच्याकडून कोविडयोद्धा वहर्ष फाउंडेशन अध्यक्ष आप्पा घोरपडे यांचा सन्मान.

Image
अतिरिक्त पोलीस आयुक्त  रवी  देसाई यांच्याकडून कोविडयोद्धा व हर्ष फाउंडेशन अध्यक्ष आप्पा घोरपडे यांचा सन्मान. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.        चांगल्या कामाचे फळ चांगलेच   मिळते.कोरोनाच्या काळात तसेच कोरोना नंतर सुद्धा प्लाझ्माचें, रक्ताचे  मदत मुंबई पोलीस यांना वेळोवेळी हर्ष फाउंडेशन कडून होत आली आहे. हर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून रक्तदानातील भरीव कार्य झाले आहे .असे मत अ .पो. नि. रवी देसाई यांनी मांडले. ते  रेहाना शेख क्राईम ब्रँच ऑफिसर यांनी मुंबई पोलीस 2011 च्या बॅचला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य कार्यक्रमाचे नियोजन गिरगाव मुंबई करण्यात झाले होते. त्या वेळी बोलत होते.           रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अपघातात अनेकदा रक्ताची तात्काळ गरज पडते .पोलीस शक्य ती मदत करतात पण त्यांच्या कार्याला आम्ही रक्त दानाच्या माध्यमातून हर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून मदत करत असतो असे हर्ष फाउंडेशन चे अध्यक्ष आप्पा घोरपडे यांनी सत्कार स्वीकारताना सांगितले. तसेच भविष्यात रस्त्यावर झालेल्या अपघातातील क...

कोरेगाव मतदार संघातील रस्त्यांचे गौडबंगाल काय? रमेश उबाळे.

Image
कोरेगाव मतदार संघातील रस्त्यांचे गौडबंगाल काय? रमेश उबाळे.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. खेड येथील रस्ता कागदावर तर बोरखळ येथील रस्त्याचा निधीचा पत्ताच नाही सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे तर बोरखळ येथील  झालेल्या रस्त्याचा निधीचा  पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. याबाबत रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  सातारा शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधी २०२१-२२ अंतर्गत मंजूर काम शिवसुंदर कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटर तयार करणे ८ लाख ४४ हजार ८६७ रुपये कामाची निविदा होऊन दि.११.०३.२०२२ रोजी काम सुरू झाले दि. २६.०५.२०२२ रोजी काम संपले.सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली झाले आहे. परंतु प्रत्यक्षात रस्ता व गटरचे...

तरुणांनी राष्ट्रीय, सामाजिक एकात्मता जपावीरविंद्र बेडकिहाळ; फलटण येथील विधी महाविद्यालयात शिक्षकदिन व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न.

Image
तरुणांनी राष्ट्रीय, सामाजिक एकात्मता जपावी रविंद्र बेडकिहाळ; फलटण येथील विधी महाविद्यालयात शिक्षकदिन व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न. फलटण प्रतिनिधी.. राजेंद्र मदने.  फलटण । समाजात दुही, अशांतता, धार्मिक वैमनस्य, द्वेष या माध्यमातून सामाजिक सलोख्याला धक्का पोचत असेल तर कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना समाजप्रबोधनाची जबाबदारी एक कर्तव्य म्हणून द्यावी लागेल. त्यासाठी आजच्या तरुणांपुढे धर्म की भाकरी, हिंदुत्त्व की भारतीयत्त्व हे आव्हान असून त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांनी यावर सकारात्मक विचार करावा व राष्ट्रीय, सामाजिक एकात्मता जपावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी ज्ञानप्रबोधन संस्थेच्या विधी महाविद्यालयात आयोजित शिक्षकदिन व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ सर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अ‍ॅड.रमेशचंद्र (नाना) भोसले होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांची सन्माननीय उपस्थिती होती. कायद्याचं ...

जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

Image
जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका  आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका  आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक १५/९/२२ रोजी  केदारेशवर रोड कळकाई गल्ली येथील काळूबाई मंदिर कोरेगाव येथे संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष दौलत नाना शितोळे साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सुनील जी खात्री साहेब,आनंदराव जाधव, कायदेशीर सल्लागार ॲड विशाल शिरतोडे, सुधीर बुधावले,किरण चव्हाण,हरी बुधावले,कपिल नाना चव्हाण, पारस बुधावले,गणेश माकर,शंकर भंडलकर,तात्या बुधावले,साईनाथ पाटोळे, विश्र्वा जाधव तसेच इतर बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. यावेळी समाज भूषण पुरस्कार विष्णू मदने सर,समाज गौरव पुरस्कार गणेश चव्हाण, आदर्श सेवा पुरस्कार नथुराम बोडरे,गणपत चव्हाण,सूरज मदने व इतर सन्मानिय लोकांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी नाईक सरकार ग्रुप कोरेगाव यांचं सहकार्य लाभले.

मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न.

Image
मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.   फलटण दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा सातारा येथे इयत्ता बारावीतून प्राविण्य प्राप्त गुण मिळवलेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचे रोख बक्षीस प्रशासकीय पत्र ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सन 2020 .20 21 या दोन वर्षात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक द्वितीय. तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी प्राचार्य पवार सर प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम सर माननीय भोजराज नाईक निंबाळकर साहेब माननीय शरद रणवरे सर माननीय रंजीत निंबाळकर साहेब प्राचार्य कोळेकर सर उपप्राचार्य सौ कदम मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीत तथा हस्ते विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी मानवाधिकार फाउंडेशन भारतचे महाराष्ट्र अध्यक्ष रणधीर भोसले यांची कन्या कुमारी शिवांजली रणधीर भोसले  हिस पीक शास्त्र.याविषयात तसेच एच एस सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून तृती...

उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची - डॉ . श्री सुरेशराव जाधव.

Image
उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची - डॉ . श्री सुरेशराव जाधव.      पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.                                  पुसेगाव - शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना उपक्रमशील  व कृतीप्रवण बनवा . त्यांच्यातील न्यूनगंड दूर करा .  विद्यार्थ्याची संशोधनवृत्ती वाढीस लावून त्यांना विज्ञाननिष्ट बनवा . नवनिर्मीतीची जाणीव निर्माण करा . उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची आहे . आदर्श व समाजप्रवण विद्यार्थी घडवून या संस्थेतील गुरुजणांनी संस्थेचा गौरव वाढवला आहे . शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी हे त्या शाळेचे , संस्थेचे तसेच समाजाचे भूषण असतात असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या संस्थेचे अध्यक्ष व सातारा जिल्हा काँगेस कमिटी अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले ते संस्थेने आयोजित केलेल्या आजी माजी गुरुजनांचा सत्कार व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी गौरव समारंभात बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा श्री श्...

पुसेगाव येथे ऑपरेशन ऑल आउट कारवाईत गुटक्यासहित 4 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त.

Image
पुसेगाव येथे ऑपरेशन ऑल आउट कारवाईत  गुटक्यासहित  4 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पुसेगाव पोलीस स्टेशनने ऑपरेशन ऑल आउट तसेच अवैद्य धंद्यावर पोलिसांची कारवाईचे सत्र सुरूच असून या अंतर्गत  सोमवार दिनांक 12 .9.2022 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात कारवाई करण्यात आली यामध्ये गुटक्याची वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे चार लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑल आऊट ऑपरेशन तसेच अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याबाबत  सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या सूचनेनुसार पुसेगाव परिसरात कसून तपास सुरू आहे छत्रपती शिवाजी चौक येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे ,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील ,पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले या कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन ऑल आउटची कारवाई करीत असताना एपीआय संदीप शितोळे यांना माहिती मिळाली होती पुसेगाव परिसरात मनोज पोपट...

खटाव येथील येरळा नदीमध्ये वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेल्याने मृत्यू.

Image
खटाव येथील येरळा नदीमध्ये वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेल्याने मृत्यू. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. खटाव नजीक येरळा नदीच्या पात्रात भिकू पाटोळे वय 60 वर्ष अचानक आलेल्या नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्याने मयत झाले असल्याची तक्रार पुसेगाव पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपास पुसेगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.  दिनांक अकरा रोजी दुपारी बारा वाजता शिरस वस्ती, खटाव येथील भिकू अकोबा पाटोळे वय 60 वर्ष गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांनी नेहलेल्या  गुरांपैकी एक म्हैस घरी परत आली परंतु भिकू पाटोळे व इतर गुरे परत न आल्याने, नारायण वसंत पाटोळे, बंधू दीपक भिकू पाटोळे व भावकीतील संजय गोविंद पाटोळे व संजय भिवा जाधव सगळ्यांनी मिळून त्यांचा शोध शिरस वस्ती शिवारात घेतला, परंतु ते सापडले नाहीत त्यानंतर दिनांक 12 रोजी शोध घेत येरळा नदीच्या पात्राकडे गेलो असता, नदीपात्राचे पाण्यात भिकू अकोबा पाटोळे हे  उताणे  पडलेल्या अवस्थेत दिसून आले. व एक रेडकु नदीपात्र्याचे पाण्यात वाहून जाऊन शेजारी उभे होते व बाकीची गुरे आजूबाजूला चरत होती. जवळ गेले असता भिकू पाटोळे मयत झाले असल्याचे स...

कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील मुतारीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी.

Image
कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील मुतारीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी.   कोरेगाव प्रतिनिधी -अज्जू मुल्ला.  कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील 30 वर्षांपूर्वी बांधलेली मुतारी दुर्दशा झाली असून या मुतारीमुळे दुर्गंधी पसरली असून या परिसरातील राहणाऱ्या लोकांना तसेच या मंदिरा परिसरामध्ये नगरपंचायतीच्या वतीने बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बाकड्यावरती बसणाऱ्या आबाल वृद्धांना या मुतारीच्या दुर्गंधी पासून आरोग्यास  धोका निर्माण झाला असून या मुतारीचे बांधकाम नव्याने करण्याची विनंती कोरेगाव ग्रामस्थांच्या  वतीने मुख्याधिकारी कोरेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील चौथाई गल्लीमध्ये असणाऱ्या या मुतारी मध्ये दुर्गंधी पसरले असून , या मुतारीच्या फरश्या निघाल्या आहेत तसेच वरील पत्रा संपूर्ण फुटल्यामुळे लघवी करण्यास उभे राहिले असता वरून पाणी अंगावर टपकत असते, ही मुतारी रस्त्याच्या कडेला असल्याने येना जाणाऱ्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून लघु शंका करणाऱ्या लोक या रस्त्य...

मासाळवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पदांवर नियुक्त झालेल्यांचा अनिल देसाई यांच्या हस्ते सत्कार.

Image
मासाळवाडी येथील  गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पदांवर नियुक्त झालेल्यांचा अनिल देसाई यांच्या हस्ते सत्कार. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. मासाळवाडी येथे गणपती निमित्त विद्यार्थी गुणगौरव तसेच गावातील इंडियन नेव्ही,आर्मी,पोलीस व विविध सरकारी पदावरती नेमणूक झालेला चा सत्कार समारंभ कार्यक्रम व मासाळवाडीचे युवा उद्योजक अविनाश मासाळ यांच्या मुलाचे व सचिन मासाळ यांच्या मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रमास सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई व त्यांच्यासोबत रासपाचे बबन दादा विरकर व दादासाहेब दोरगे साहेब तसेच मासाळवाडी गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिलभाऊ देसाई म्हणाले मासाळवाडी मध्ये अविनाश मासाळ यांनी गणपती उत्सवाच्या निमित्ताने व आपल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील गुणवंतचा सत्कार तसेच गावातील नवीन नेमणूक झालेले विविध पदांवरती युवकांचा  सत्कार असा कार्यक्रम घेतलेला आहे त्याची मी मनापासून कौतुक करतो.मासाळवाडीतील कोणालाही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काही मदत लागली तर मी सदैव आपल्यातला कार्यकर्ता म्हणून मदत करीन  मासा...

शिवरायांच्या नीती मूल्याचे आचरण करणे महत्त्वाचे- शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी.

Image
शिवरायांच्या नीती मूल्याचे आचरण करणे महत्त्वाचे- शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.      छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व दीपस्तंभ प्रमाणे आजही मार्गदर्शन करत आहे. शिवरायांचा जयजयकार करणे सोपे असून शिवरायांच्या चांगल्या गोष्टीचे आचरण करणे खूप अवघड आहे. शिवरायांच्या नीती मूल्याचे आचरण करणे महत्त्वाचे असून व नवयुवकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहणे  हीच खरी शिवभक्ती आहे असे मत शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.        अनपटवाडी येथील श्री ओम साई तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शिवव्याख्यानामध्ये ते बोलत होत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, प्रशांत तोडकर ,सोनाली खाडे यांची उपस्थिती होती.       शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी म्हणाले शिवाजी महाराज हा प्रेरणादायी मंत्र समस्त तरुण वर्गाला मार्गदर्शन करत आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपली जीवनमूल्य उंचावणे महत्त्वाचे असून आपले आचरण सुद्धा शिवरायांच्या आचरणासारखे असणे तितकेच गरजेचे...

सणाच्या स्पर्धा मधून महिलांना विविध कला गुणदर्शन सादर करण्यासाठी नवीन व्यासपीठाचे दालन : डॉ. अरुणाताई बर्गे.

Image
सणाच्या स्पर्धा मधून महिलांना विविध कला गुणदर्शन सादर करण्यासाठी नवीन व्यासपीठाचे दालन : डॉ. अरुणाताई बर्गे.   कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  एकंबे तालुका कोरेगाव येथे चव्हाण दापत्यांच्या वतीने सौ प्रतिभा चव्हाण व ॲडव्होकेट  राजेश चव्हाण यांनी पारंपारिक पद्धतीने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली ही अतिशय अप्रतिम व स्तुत्य  अशी असून या सणाच्या माध्यमातून महिलांना विविध कला गुण दर्शनाचा वाव मिळत असून महिलांसाठी अशा स्पर्धा आपल्या विविध कला कौशल्य सादर करण्याचे एक व्यासपीठ या रूपाने मिळाले असल्याचे मत आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणाताई  बर्गे यांनी व्यक्त केले.एकंबे येथे भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा समयी येथील भैरवनाथ मंदिर मध्ये आयोजित बक्षीस समारंभा वेळी बोलत होत्या, बर्गे पुढे म्हणाल्या "अशा स्पर्धा मध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे, ही बाब खरोखर अभिनंदनिय आहे.आज महिला परंपरा, रूढी प्रथेनुसार नटून थटून सणा बरोबर स्पर्धेमध्ये 83 महिलांनी भाग घेतला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग खरोखरच प्रशंशापूर्वक व उल्लेखनीय आहे. या स्पर्धेमध्ये...

कोरेगाव ग्रामपंचायत च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्याकडून कोरेगाव ग्रामपंचायतच्या सर्व हयात सरपंच यांचा यथोचित सत्कार.

Image
कोरेगाव ग्रामपंचायत च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्याकडून कोरेगाव ग्रामपंचायतच्या सर्व हयात सरपंच यांचा यथोचित सत्कार. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव ग्रामपंचायतला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरेगाव नगरपंचायत  व राष्ट्रवादीच्या वतीने हयात असणाऱ्या  सर्व आजी-माजी सरपंच यांचा यथोचित सत्कार  सन्मान  करण्यात आला.8 सप्टेंबर 1922 रोजी कोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती..आज 8 ऑगस्ट सन 2022 रोजी ग्रामपंचायत स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने कोरेगाव ग्रामपंचायत प्रथम सरपंच स्वर्गीय बुवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या नगरपंचायत कार्यालयात असलेल्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ दिपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे विषय समिती   सभापती आघाडीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यासह  नगरपंचायत राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवक नगरसेविका कोरेगाव  शहरातील बहुसंख्य  ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोरेगाव ग्रामपंचायतच्या हयात...

सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त 231 वि जयंती फलटण येथे उत्साहात साजरी.

Image
सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त 231 वि जयंती फलटण येथे उत्साहात साजरी.  फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.  फलटण-इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देशाला मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे थोर  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त  231 सावी जयंती फलटण शहरात ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनेत्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी ह्यूमन राईट कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब उर्फ नाना यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती सांगितली शिवछत्रपतींच्या काळापासून रामोशी समाजातील थोर व्यक्तींचा सहभाग दिसून येत आहे. असे सांगून छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यासारखी रामोशी समाजाचे नेतृत्व गुण कौशल्य प्राप्त थोर व्यक्तिमत्व असणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना सात सप्टेंबर जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून यांच्या देशभक्तीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सां...

श्री गणेश उत्सव निमित्त चिमणगाव येथे कुस्ती मैदान उत्सहात संपन्न.

Image
श्री गणेश उत्सव निमित्त चिमणगाव येथे कुस्ती मैदान उत्सहात संपन्न.  चिमणगाव प्रतिनिधी. दत्ता सावंत.  चिमणगाव ता. कोरेगाव येथे सालाबादप्रमाणे श्री गणरायाचे आगमन करते वेळी चिमणगाव ग्रामस्थ यांनी एक गाव एक गणपती असी प्रता व एकतेच प्रतीक जपत या उत्सहात कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.या कुस्ती मैदानाचा आनंद या पंच क्रोशीतुन तसेच भाहेरून सर्व भाविक भक्त व मल्य यांनी उपस्थिती दिली. यावेळी या कुस्ती मैदानात लहान गटापासून ते मोठया गटा पर्यंत 100रु.ते 1 लाख रु.असे बक्षिस ठेवण्यात आले होते. या कुस्ती मैदानाचा मल्य (पैयलवान )मा. दत्ता नारळे यांनी एक लाख रु. निकाली कुस्ती करून मानकरी ठरले.त्यामुळे नारळे यांचे पंचक्रोशीतुन कौतुक करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी कुस्ती मैदानाला निकाली कुस्ती करने करिता मल्य प्रणव सरक पुणे.नारळे कोल्हापूर. दिग्विजय जाधव सुकणे. भैया चव्हाण पिंपरी. रामा धायगुडे लोणंद त्याचबरोबर पंचक्रोशितील भाविक भक्तांनी उपस्थिती देऊन आनंद घेत शोभा वाढविली त्याबद्दल चिमणगाव ग्रामस्थ यांनीसर्वांचे अभिनंदन करून सदरचे मैदान उत्सहात संपन्न करण्यात आले. 

मा. प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला.

Image
मा. प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.   संकल्पित त्रैवार्षिक राज्य स्तरीय धार्मिक समाज भूषण पुरस्कार 2022 नाचु कीर्तनाचे रंग !ज्ञानदीप लावू जगी !मोहत्सव सप्ताह निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित सदस्य , श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हाय.व ज्युनि.कॉलेजचे विद्यार्थी प्रिय गुरुजन , प्रसिद्ध व्याख्याते,कथाकथनकार ,सामाजिक कार्याला वाहून घेणारे ,महाराष्ट्रभर समाजप्रबोधनात नवी उमेद जागवून  नवा अध्याय सुरु करणारे ,माझे खास स्नेही मा.प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना समाजभूषण जीवन गौरव हा अध्यात्मिक क्षेत्रातील मानाचा पुरस्कार शिक्षकदिनाच्या पूर्वसंधेला देऊन कार्याचा यथोचित गौरव केला.हा पुरस्कार महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील नामांकित कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प.बडातात्या कराडकर व ह.भ.प.जाधव महाराज वारकरी सांप्रदाय फलटण ता. अध्यक्ष. ऑड. निकम साहेब. लोकजागरचे संपादक मा. बेडकिहाळ सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.शुभेच्छुक. ह्युमन राईट्स फॉउंड...

सर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला .

Image
सर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला   .  संपादकीय विशेष लेख बासर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला   . का प्रसंगातून आपल्या कौशल्याच्या जोरावर विविध अभ्यासाचे पैलू असणारे अपार मेहनत चिकाटी व चौकस बुद्धी तसेच सामाजिक कार्याचे आवड असणारे वेळोवेळी दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारे मुस्लिम समाजातील कोरेगाव येथील येणाऱ्या पुढील काही दिवसातील युवा व उज्वल व उभरते  नेतृत्व कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार अज्जू  मुल्ला यांचा आज दिनांक पाच रोजी वाढदिवस असून त्यांनी आपल्या वयाची 50 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा,  आजमुद्दीन बाबालाल मुल्ला यांचा जन्म कोरेगाव येथे 5/9/ 1972 रोजी झाला, त्यांच्या वडिलांचे नाव बाबालाल मुल्ला त्यांचा व्यवसाय शेती हा होता, मोजकी शेती, त्यावर पूरक  उदरनिर्वाह करीत होते, त्यांचा मुलगा अजमुद्दिन मुल्ला आज त्यांच्या हिम्मत...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल फडतरवाडी येथील युवकावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल.

Image
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल फडतरवाडी येथील युवकावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल.   कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत तावरे राहणार वाघोली यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अविनाश फडतरे मित्र समूह या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे व अशांतता पसरवण्याचे काम केले असून त्यांच्याबद्दल वाठार पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख प्रशांत तावरे, सुमित चव्हाण...

सुलाबाई भोसले शिरंबे यांचे अचानक निधन.

Image
सुलाबाई भोसले शिरंबे यांचे अचानक निधन. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील संपत बाजीराव भोसले यांच्या मातोश्री मुकबधीर  श्रीमती सुलाबाई बाजीराव भोसले वय ८२ यांचे अचानक निधन झाले.त्यांनी आज किर्तन सेवा श्रवण करून जेवणाचा ही लाभ घेतला.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर शोककळा पसरली आहे.गौरी गणपती काळात आज गेल्या.तसेच  त्यांच्या जावबाय यांच्या प्रथम पुण्यस्मरणा दिवसी निधन झाले.त्यांच्या पाश्यात तीन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे.आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार शिरंबे स्मशान भूमीत करण्यात येणार आहेत.

नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

Image
नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील येणाऱ्या गाव व वाड्या वस्तीवरील सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई व भक्तिभावात गणेश मूर्ती स्थापन केल्या परंतु काही सार्वजनिक गणेश मंडळे याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत असून शासन दरबारी व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमोर गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांची गावागावात मीटिंग घेण्यात आली होती यामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल अशा अटीवर सार्वजनिक गणेश मंडळांना परवाने दिले होते परंतु बऱ्याच मंडळाच्या अध्यक्षांनी कायदेच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता मोठ्या आवाजात  वाजणारे साऊड स्पीकर व डॉल्बीनच्या बॉक्सचा वापर करून मोठ्या आवाजात वाढीवस्तीवरील लोकांना व शाळेतील मुलांची व आजारी लोकांची डोकेदुखी वाढवली असून यांना आवर कोण घालणार असा प्रश्न वाडी वस्तीवरील लोक व ग्रामस्थ करीत आहेत संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी  अशा बेशिस्त  गणेश मंडळाच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आह...

बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर केलेल्या हल्लेखोरांना अटक ; विश्वास मोरे.

Image
बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर केलेल्या हल्लेखोरांना अटक ; विश्वास मोरे. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. बनवडी (इब्राहिमपूर) तालुका कोरेगाव येथे राहणाऱ्या पारधी समाजावर दुधनवाढीतील काही समाजकंटकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली. व जीवना  आवश्यक वस्तूंची नासधूस  करून असणाऱ्या घराची तोडफोड करून पारधी समाजावर अन्याय केला होता. या हल्ल्याबाबत पारधी समाजाच्या वतीने अन्याय केलेल्या समाजकंटकांना अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी  पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्याकडे केली होती  सदर या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली होती  , वाठार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार व पारधी समाजाची महिला .  निर्मला विनोद भोसले वय 45 वर्ष, यांनी  दिलेल्या जबाबात म्हटले होते मोटार सायकलच्या अपघाताच्या कारणावरून, नावे पूर्ण माहित नसल्याने,दुधनवाडीतील काही समाजकंटक व गाव गुंडांनी बनवडी,इब्राहिम फाटा तालुका कोरेगाव येथे आम्ही राहात असलेल्या ,माझ्यासह पारधी समाजावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला करून येथील महिला व मुलांना जबर मारह...

जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या सांगतेनिमित्त कोरेगावमध्ये सवाद्य वरघोडा रथ मिरवणूक.

Image
जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या सांगतेनिमित्त कोरेगावमध्ये सवाद्य वरघोडा रथ मिरवणूक. कोरेगाव प्रतिनिधी.अज्जू मुल्ला.  जैन समाजाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पर्युषण महापर्वाच्या सांगतेनिमित्त शनिवारी संपूर्ण शहरातून जैन समाजाच्यावतीने सवाद्य वरघोडा रथ मिरवणूक काढण्यात आली. या रथामध्ये तीर्थंकर महावीर स्वामी भगवान विराजमान होते.  श्री मुनिसुव्रत स्वामी भगवान जैन मंदीर ट्रस्टवतीने संपूर्ण शहरातून ही रथ मिरवणूक काढण्यात आली. आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह प्रमुख प्रमुख मान्यवरांनी भगवानांचे दर्शन घेतले. जैन समाजाच्यावतीने मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आशिष सुमनलाल शेठीया, सेक्रेटरी प्रवीण छगनलाल ओसवाल, ट्रस्टी छगनलाल पन्नाजी ओसवाल, निलेश देवीचंद ओसवाल, राजेंद्र मोतीलाल ओसवाल, नथमल धर्माजी जैन, अशोक देडीया, प्रसन्न मोतीलाल भंडारी, राजेंद्र मणिलाल शहा, राजेंद्र रमणलाल गांधी व डॉक्टर सागर प्रकाश भंडारी यांच्यासह ज्येष्ठ  व्यापारी जयंतीशेठ बहुआ व समाज बांधव सहभागी झाले होते. जैन मंदिरापासून सुरू झालेली रथ मिरवणूक जुना मोटर स्टॅन्ड- ...

हार तुरे नको तुमची साथ हवी आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव यांचे आवाहन.

Image
  हार तुरे नको तुमची साथ हवी आहे  शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव  यांचे आवाहन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कठीण प्रसंगी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी संघटनेला साथ द्या अशी भावनिक हाक शिवसेना जिल्हाप्रमुख मा. प्रताप जाधव यांनी दिली. काल वर्धनगड येथे मुस्लिम संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अर्जुनराव मोहिते , संजय घोरपडे, शिवसेना संघटक भानुदास कोरडे, तालुकाप्रमुख दिनेश देवकर, खटाव जिल्हापरिषद गट विभागप्रमुख मुगटराव कदम, असलम शिकलगार, यशवंत जाधव व मुस्लिम संघटनेचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवसेना कायमच जाती- पातीपलीकडचं समाजकारण करत असून जातीय तेढनिर्माण  करण्याचे काम काही समाजकंटकांकडून केलं जातं व आपल्यात दुरी भेदभाव निर्माण करण्याचा प्रकार या समाजकंटकांकडून केला जातो परंतु याला कोणत्याही प्रकारची दाद न देता आपण सर्व ऐक्याची सुलोख्याची भूमिका घेऊन ज्या वेळेस असा प्रसंग आले त्यावेळेला सातारा जिल्ह्यातील शिवसेना कायम शांततेची भूमिका घेतली आहे. येणाऱ्या काळात आदरणीय ...

कोरेगाव येथील विधवा 70 वर्षीय वृद्ध महिलेस आसिफ मणेर यांची शिवीगाळ व दमदाटी ;

Image
कोरेगाव येथील विधवा 70 वर्षीय वृद्ध महिलेस आसिफ मणेर यांची शिवीगाळ व दमदाटी ;  कोरेगाव - अज्जू मुल्ला. कोरेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दौलत चित्र मंदिरासमोरील 70 वर्षे विधवा महिलांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्या आसिफ इसाक मणेर यांचे वर कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . फिर्यादी श्रीमती सईदा मुसा भाई मणेर यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी सईदा मणेर या आपल्या दुकानासमोरील छतावर साचलेले पाणी काडीत असताना जाणीवपूर्वक समोर येऊन तू मला पाहून माझे अंगावर पाणी उडवलेस म्हणून शिवीगाळ करीत व 70 वर्षीय वृद्धेश अर्वाच्य भाषेमध्ये बोलत दमबाजी करीत अंगावर धावून गेला व मारण्याची धमकी दिली, यांची घरे मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे या भांडणामुळे सगळ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती तर असिफ मणेर हा बघ्यांच्या  गर्दीमुळे अधिकच रस्त्यावर तमाशा करत होता. यास अनुसरून भीतीने या वृद्धेने आरोपी असिफ इसाक मणेर यांचे विरुद्ध कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये  फिर्याद  दाखल केली आहे.

आफजल भाई कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा;

Image
आफजल भाई कुरेशी यांचा  वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा;  कोरेगाव - अज्जू मुल्ला.   जामियत उलमाएं हिंद कोरेगाव  कार्यकारिणी सदस्य आणी सामाजिक कार्यकर्ते आफजल भाई कुरेशी याचा वाढदीवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  कोरेगाव शहर येथील अफजलभाई कुरेशी सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जामियेत उलेमाये हिंद या संघटनेच्या माध्यमातून अनेक  वेळा समाज उपयोगी कामे केले आहेत. आणि समाजाची एकनिष्ठ राहून सर्व स्तरातील लोकांच्यासाठी, त्यांनी वेळोवेळी मोठे सहकार्य करीत असून,कोरेगावच्या मुस्लिम समाजामध्ये त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला. पण हा वाढदिवस साजरा करीत असताना, वाढदिवसाच्या ऐवजी  या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाज उपयोगी कामे केली पाहिजेत असे विचार अफजल भाई कुरेशी यांनी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते मोहसीन कागदी,गफार कुरेशी, गुलाब कुरेशी आसिफ कुरेशी, इब्राहिम कुरेशी,समीर कुरेशी, माजीद सौदागर असे अनेक   कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसानिम...

बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर दुधनवाडी येथील समाजकंटकाचा हल्ला

Image
बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर दुधनवाडी येथील समाजकंटकाचा  हल्ला   कोरेगाव प्रतिनिधी अज्जू मुल्ला  बनवडी इब्राहिमपूर येथे राहणाऱ्या पारधी समाजावर दुधनवाढीतील  काही समाजकंटकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली. व जीवना  आवश्यक वस्तूंची नासधूस  करून असणाऱ्या घराची तोडफोड करून पारधी समाजावर अन्याय केला असल्याची तक्रार पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्याकडे केली असून सदर या घटनेची नोंद वाटार पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे.. , वाठार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार व पारधी समाजाची महिला .  निर्मला विनोद भोसले वय 45 वर्ष, यांनी  दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मोटार सायकलच्या अपघाताच्या कारणावरून, नावे पूर्ण माहित नसल्याने,दुधनवाडीतील काही समाजकंटक गाव गुंडांनी बनवडी,इब्राहिम फाटा तालुका कोरेगाव येथे  राहात असून, येथे रहात असणाऱ्या  माझ्यासह  पारधी समाजावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला करून येथील महिला व मुलांना जबर मारहाण केली, तसेच समाज उपयोगी साहित्याची मोडतोड धान्य धुण्याची व घराची नासाडी व मोडतो...

चिमणगाव येथे एक गाव एक गणपतीचे आनंद उधळीत आगमन.

Image
चिमणगाव येथे एक गाव एक गणपतीचे आनंद उधळीत आगमन.  कोरेगाव चिमणगाव प्रतिनिधी. दत्ता सावंत.   कोरेगाव तालुक्यातील मौजे चिमणगाव येथे एक गाव एक गणपती अशी परंपरा 1959 सालापासून सुरू असून या गावांमध्ये एकते चे प्रतीक जपत असलेने या गावाला अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रधान झाला असून ही परंपरा खूप वर्षापासून चालू असल्याने ह्या गावामध्ये गणेशाच्या आगमन पालकी मधून वाजत गाजत आनंद घेत.गणेश आगमना नंतर  कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात येते. या परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व मल्ल या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान चिमण गावकर यांनी केले आहे. शासन निर्णय नुसार पोलीस प्रशासनाचा गावोगावी एक गाव एक गणपती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असताना देखील ह्या सर्व बाबीवर अनेक गावांनी विचार केलेला दिसून आला नाही.  .परंतु अनेक गावांमध्ये पाहायला मिळत असतं एक गाव एक गणपती नसून अनेक मंडळांचे गणरायाचे आगमन करते वेळी प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपती आगमनाचा आनंद घेतल्यास  कोणताही वाईट प्रकार न घडता गणेश उत्सहा मध्ये एकमेकांच्या विचारांती आनंद घेता...