Posts

Showing posts from July, 2024

मनोज दादा घोरपडे यांच्याकडून 50% सवलती मध्ये लक्ष्मी आटा चक्की महिलांना वाटप.

Image
मनोज दादा घोरपडे यांच्याकडून 50% सवलती मध्ये लक्ष्मी आटा चक्की महिलांना वाटप. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. खटाव माण शुगर .प्रा .लि. चेअरमन मनोज (दादा) घोरपडे यांच्या सहकार्याने ५० % टक्के सवलती मध्ये लक्ष्मी आटा चक्की नागठाणे गटामध्ये वितरणाचा शुभारंभ मा मंगलताई घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्या वर्णे गट यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी मिनाक्षी क्षिरसागर,नकुसा चव्हाण भाजपा महिला आघाडी कराड उत्तर उपाध्यक्ष, प्रियांका साळुंखे,सिमा नलवडे,पुनम नलवडे,पुष्पा साळुंखे,सारीक साळुंखे ,कोमल साळुंखे,सुनिता नलवडे,मंजुषा शिंगटे,विलासराव कदम माजी पंचायत समिती सदस्य,अशोक ढाणे सरपंच  पाडळी,संजय ढाणे ग्रामपंचायत सदस्य पाडळी, रविंद्र ढाणे चेअरमन यात्रा कमिटी पाडळी,सुधीर जाधव (काका) अतित,भगवान पवार वर्णे ,श्रीरंग गोरे (आबा), नंदकुमार नलवडे, शंकरराव साळुंखे (आप्पा), हंबीरराव गोरे (दादा), चंद्रकांत भोसले,राजू शिर्के (काका),सतिश गोरे, सुनिल पाटील,लखन साळुंखे,शंकर साळुंखे भाजपा कराड उत्तर उपाध्यक्ष,राम साळुंखे, दत्तात्रय नलवडे (बाबु), आप्पासाहेब नलवडे,योगेश साळुंखे,सुधीर काळे, गणेश ढाणे, अ...

कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बनवडी ता.कराड येथे रामराज्य रथाचे स्वागत.

Image
कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बनवडी ता.कराड येथे रामराज्य रथाचे स्वागत. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड उत्तरचे नेते मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या माध्यमातून संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याण योजना प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पीक विमा योजना, बांधकाम कामगार कल्याण, विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना इ. योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून "रामराज्य रथ, विकसित भारत भाजपा आपल्या दारी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे आज बनवडी ता.कराड येथे हा "रामराज्य रथ " पोहचला असताना या रथाचे स्वागत  वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. विक्रमबाबा कदम, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ काका,मा.जि.प सदस्य सागर शिवदास आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी  दिपालीताई खोत,सीमाताई घार्गे,नवीन जगदाळे, जयसिंग डांगे,तुकाराम नलवडे, दत्ता साळुंखे,बाळासाहेब शिंदे, रवींद्र ताठे, युवराज गोतपागर, प्रमोद साव...

कोपर्डे येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन.

Image
कोपर्डे येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. कोपर्डे मनोजदादा युवा मंचच्या माध्यमातून कोपर्डे येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.मनोजदादा घोरपडे, पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, संजय कदम माजी सरपंच, ऍड.धनाजीराव जाधव संचालक मार्केट कमिटी, कृष्णत कांबळे सरपंच, आनंद कदम माजी चेअरमन, हेमंत मोहिते ग्रामपंचायत सदस्य, अरुण कदम माजी  चेअरमन, तानाजी कदम चेअरमन, विक्रमनाना घोरपडे संचालक खटाव माण साखर कारखाना, कृष्णत शेडगे संचालक खटाव मान साखर कारखाना,सचिन कदम, संजय पवार माजी सरपंच तुकाईवाडी, शहाजी निकम उपसरपंच, युवा उद्योजक अभिजीत कदम,विकास घोरपडे,सागर कदम, विक्रम कदम,उमेश वाघ माजी सरपंच सायळी, राजू शेळके, सचिन सावंत देसाई हॉस्पिटलचे डॉक्टर, सुधीर शेळके व स्टॉप गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना 50% सवलती मध्ये फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.

शहीद जवानांच्या परिवारांच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची ग्वाही.

Image
शहीद जवानांच्या परिवारांच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची ग्वाही. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सैनिक कल्याण विभागातर्फे आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त सातारा येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रम पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच कारगिल युद्धात भारतीय सैन्य दलांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल मन:पूर्वक सलाम करत शहीद जवानांच्या स्मृतींना त्यांनी यावेळी अभिवादन केले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपले जवान छातीचा कोट करून परकीय शक्तीची आक्रमणे परतवून लावत असतात. वर्दीधारी जवान अहोरात्र देशांच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण देशबांधव सुरक्षित राहतो. त्यामुळे आपल्या सैन्य दलांचा आणि सैनिकांचा आदर्श घेऊन त्...

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सम्राट गायकवाड यांची नियुक्ती.

Image
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सम्राट गायकवाड यांची नियुक्ती. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. दि.२६ केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी सम्राट गायकवाड यांची निवड करण्यात आली सम्राट गायकवाड हे झी 24 तास सातारा जिल्हा प्रतिनिधी तसेच पुण्यनगरी  प्रतिनिधी, व अजिंक्य सह्याद्री या साप्ताहिकाचे संपादक सम्राट गायकवाड यांची निवड केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजु दळवी व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.श्री.सम्राट गायकवाड हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम कित्येक वर्ष करत आले आहेत तसेच शिव- शाहू फुले आंबेडकर व सर्व  महापुरुष यांचे विचारांचा वारसा जोपासणारे व अभ्यास व्यक्तिमत्व तसेच  निर्भीडपणे आपले मत मांडणारे तसेच लेखणीच्या माध्यमातून जन सामान्य लोकांचा वृत्तपत्राच्या माध्यमातून पोचणारे सम्राट गायकवाड यांची निवड केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड  झाल्याबद्दल सर्...

विसापूर येथील गुंडोजीबाबा विद्यालयात निर्भया पथकाची मीटिंग उत्साहात.

Image
विसापूर येथील गुंडोजीबाबा विद्यालयात निर्भया पथकाची मीटिंग उत्साहात. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. विसापूर ता खटाव जिल्हा सातारा येथे  पोलीस उपाधिक्षक कोरेगाव यांच्यावतीने श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर मध्ये निर्भया पथकाच्या मीटिंगचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी या पथकाचे पोलीस नाईक आरती यादव यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.पोलीस नाईक आरती यादव यांनी निर्भया पथकाची गरज सांगितली. निर्भया पथक कोणती कामे करते याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना कोणकोणत्या अडचणी येतात अशावेळी मुलींनी काय करावे याचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्बोधनातून अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांची माहिती सांगितली. मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे याच्या सूचना दिल्या. पोलीस शिपाई राहुल मदने यांनी मुलांनी कोणत्या सवयी पासून दूर राहावे याची माहिती दिली. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा कसा गुन्हा आहे याची माहिती दिली. तुम्हाला जर अडचणी आल्या तर कोणत्या नंबर वर संपर्क साधायचा अथवा क...

वडूज येथील अग्निशमन केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न.

Image
वडूज येथील अग्निशमन केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. वडूज तालुका खटाव येथील  नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या अग्नीशमन केंद्र इमारतीचे भूमिपूजन माण-खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय जलनायक आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या योजनेसाठी इमारत बांधकाम व गाडीसाठी अंदाजे १ कोटी ७२ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याकामी आ.जयकुमार गोरे व सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. अग्नीशमन केंद्र व अग्निशमन गाडी सुविधेचा हा खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रम आहे.या उपक्रमामुळे आगीसारख्या दुर्घटनेत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .यावेळी वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप साहेब,  नगराध्यक्ष सौ.मनीषा रवींद्र काळे , उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर , खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब , भरत (आप्पा ) माळी , सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्पशेठ शहा ,आप्पासाहेब गोडसे , भाजपा वडूज शहर अध...

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सातारा, दि. १९: शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.  साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे 'शिवशस्त्रशौर्यगाथा' अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरां...

हनुमानगिरी हायस्कूल मध्ये 1999 - 2000 या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह मेळावाचे आयोजन

Image
हनुमानगिरी हायस्कूल मध्ये 1999 - 2000 या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह  मेळावाचे आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव ता.खटाव जि. सातारा येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा व गुरुजन सन्मान सोहळा रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 1O वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये आजी-माजी मुख्यध्यापक शिक्षक व शिक्षिका शाळेचे सर्व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणारा आहे.या कार्यक्रमांमध्ये स्वागत दीप प्रज्वलित व प्रतिमा पूजन, प्रस्तावन, जे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका शाळेचे कर्मचारी यांचे निधन झाला आहे त्यांना श्रद्धांजली  देण्यात येणार आहे . व शिक्षक सन्मान, विद्यार्थी सन्मान चिन्ह वाटप, विद्यार्थ्यांचे मनोगत ,शिक्षकांचे मार्गदर्शन मनोगत होणार असल्याचे या विद्यार्थी  मेळाव्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

पुसेगाव परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ पोलिस चोरट्यांच्या मुस्क्या आवळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न.

Image
पुसेगाव परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ पोलिस चोरट्यांच्या मुस्क्या  आवळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावणाऱ्या घटनांचा पाढा काही सध्या सुटत नाही. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर ठीक आहे . कारण या घटना शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्याच असतात परंतु केबल चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवर आता आपला ठिय्या केला आहे. लाखो रुपये किमतीच्या केबल तांब्याच्या  विक्रीमोहापाई चोरट्यांनी  लंपास केल्याच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की.. शेतकऱ्यांच्या विहिरीवर मोटर साठी लागणाऱ्या केबल ह्या अतिशय महाग आहेत. त्यामध्ये असणारे तांबे हे विद्युत वाहक असल्याने त्याला बाजारात मोठा भाव मिळतो. एका विहिरीवर तीन हजार ते पाच हजार रुपये किमतीची केबल जोडली जाते. चोरट्यांना याबाबत माहिती असल्याने रात्री आपण रात्री या केबल कनेक्शन कट करीत पसार केल्या जातात. याबाबत येथील शेतकरी लक्ष्मणराव जाधव, उमेश मखरे ,रामचंद्र माने, शंकर वसंत जाधव, यशवंत चव्हाण, मनोज जाधव इत्यादी सह अनेक जणांच्या विहिरीवरील केबल ...

योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विविध महत्वाकांक्षी योजनांची आढावा बैठक  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मुंबई, दि. १८ : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अमंलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.  शासनाने जाहीर केल्या सात महत्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचे अधिकाऱ्यांसह, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आदी उपस्थित होते. तसेच वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्य सचिवांसह विविध विभांगांचे सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी यासाठी दक्ष राहीले पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट साध्य करताना लाभार्थ...

स्वच्छ वारी, निर्मल वारी' बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
स्वच्छ वारी, निर्मल वारी' बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. स्वच्छ वारी, निर्मल वारी' कार्यक्रमाचा समारोप 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे सादरीकरण करणाऱ्या कला पथकाला मिळणार राज्यभरात जनजागृती करण्याचे काम. पंढरपूर, दि. १७:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित 'स्वच्छ वारी निर्मल वारी' कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की स्वच्छ वारी निर्मल वारी सारख्या उपक्रमामधून स्वच्छतेबर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन.

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन. तीर्थ क्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. सोलापूर, दि. १७ : आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात नाहून निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थ क्षेत्र  सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार भरत गोगावले, समाधान आवताडे,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहि...

पंढरीचा पांडुरंग संत स्वाभावी आहे.ह. भ. प .सुनील धोंगडे महाराज.

Image
पंढरीचा पांडुरंग संत स्वाभावी आहे.ह. भ. प .सुनील धोंगडे महाराज. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मानवी स्वभाव हा गुंतागुंतीचा आहे. तो चंचल आहे तसाच तो वाईट आणि चांगलाही असल्याचे मत ह .भ .प. भ सुनील धोंगडे महाराज यांनी व्यक्त केले. भाळवणी तालुका पंढरपूर येथे श्री सेवागिरी महाराज दिंडी मुक्कामी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर शेठ जाधव, माझी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, विश्वस्त संतोष वाघ , सचिन देशमुख, गौरव जाधव आणि भाविक उपस्थित होते. यावेळी कीर्तनात बोलताना धोंगडे महाराज पुढे म्हणाले ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट नळी मध्ये घातले तरी सरळ होत नाही त्याचप्रमाणे वाईट माणसाचा स्वभाव सहजासहजी बदलत नाही. संत महात्म्यांचा स्वभाव मुळातच देव भावी असल्याने त्यांच्यावर कितीही वाईट वृत्तींचा मारा झाला तरी त्यांच्या स्वभावामध्ये बदल होत नाही. वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी पंढरपूर च्या विठोबाची वारी करीत मनुष्य स्वभावामध्ये भाविकता, श्रद्धाळूपणा व भक्ती मार्गाचे रस भरण्याचा प्रयत्न केला आहे. याव...

स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुंबई येथेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांनी स्मृतीना केले अभिवादन.

Image
स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुंबई येथेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांनी स्मृतीना केले अभिवादन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबईतील पावनगड निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्व. शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, शिक्षण व उद्योग समूहाच्या माध्यमातून पाटण तालुक्याला विकासाची विधायक दिशा दाखविणारे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मुंबईतील पावनगड निवासस्थानी शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम आयो...

रणसिंगवाडी येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार.

Image
रणसिंगवाडी येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक  विठ्ठल फडतरे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. रणसिंगवाडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  श्री विठ्ठल श्रीरंग फडतरे यांची शिक्षक ते मुख्याध्यापक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रणसिंगवाडी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते यामध्ये रणसिंगवाडीचे सरपंच सुखदेव रणसिंग , पोलीस पाटील सुनील रणसिंग , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू बागल, माजी सरपंच अविनाश रणसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे यांनी 39 वर्षाच्या सेवेमध्ये धारपुडी, नेर, फडतरवाडी, बुध, चिंचणी, रेवलकरवाडी ,राजापूर व  शेवट रणसिंगवाडी या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक सेवा केली तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिक्षक बँक संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी ,सातारा जिल्हा समिती सरचिटणीस, शिक्षक स्वाध्याय भवन चेअरमन ,अशी विविध पदे भूषवली आहेत.त्यांच्या या कार्यक्रमात शिक्षिका संजीवनी देशमुख, शोभा शिरतोडे ,रीना मंडले . शिक्षक अजित गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली ...

फलटण येथे छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.

Image
फलटण येथे छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.  छत्रपती शाहू महाराज यांची सालाबाद प्रमाणे शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोळा विविध उपक्रमांनी थाटात साजरा करण्यात आला. मंगळवार पेठेतून  छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा सालाबाद प्रमाणे काढण्यातआली.छत्रपती शाहू महाराज जयंती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब तुकाराम जगताप. प्रा. डॉ. प्रभाकर पवार. ज्येष्ठ पत्रकार  प्रा. रमेश आढाव सर. मुरलीधर सावंत. जयंती समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य प्रदीप जगताप. मुख्याध्यापक बंटी शिंदे बारामती. नंदू गायकवाड. असे अनेक मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. सदर सोहळ्यामध्ये अभिप्रेत असलेल्या पारंपरिक वाहनांचा देखील समावेश होता. त्याचबरोबर मुलींचे लेझीम पथक. सनई सुर. हलगी. संबळ. तुतारी असे अनेक वाद्यांचा समावेश होता. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांची मूळ नाव यशवंत असे होते त्य...

समाजसेविके वनिताताई भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक भवानीनगर शाळेला एलसीडी भेट.

Image
समाजसेविके वनिताताई भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक भवानीनगर शाळेला एलसीडी भेट. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. पुसेगाव ता .खटाव येथील भवानीनगर मध्ये समाजसेविका वनिताताई भंडारे आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व कामगार सेना सातारा जिल्हा महिला अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शालेय भेटवस्तू , वृद्धाश्रम येथे फळ वाटप , वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम करण्यात आले त्याचबरोबर  भवानीनगर पुसेगाव अंगणवाडी क्रमांक १७९ येथे एलसीडी देण्यात आली अंगणवाडी सेविका सुलोचना रोकडे व ग्रामपंचायत सदस्य शकुंतला जाधव , उज्वला वाघमारे सुजाता नवगण, मृणाल खराटे, सारिका लोहार, रूपाली वाघमारे ,क्रांती पवार, दीपा सूर्यवंशी ,कल्पना जाधव, व  सचिव दत्तात्रय शिंदे ,डॉ. ढोक ,अतुल जगदाळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आभार रोकडे मॅडम यांनी मानले.

नवीन कायद्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणे मार्फत पोलीस पाटलांना मार्गदर्शन.

Image
नवीन कायद्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणे मार्फत पोलीस पाटलांना मार्गदर्शन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पोलीस पाटील यांना आज दिनांक 2.7.24 रोजी सकाळी 11.00 वा .ता पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व नागरिक यांचेसाठी नवीन कायदे बाबत प्रशिक्षण पुसेगाव पोलीस ठाणे येथे सहा.पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांनी आयोजित केले होते. उपस्थितांना स पो नि आशिष कांबळे यांनी 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेल्या 1.भारतीय न्याय संहिता 2023, 2.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, 3.भारतीय साक्ष अधिनियम 2023 यातील प्रमुख तरतुदींचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी निर्माण केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे अनुषंगाने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या माहितीबाबत सॉफ्ट कॉपी पोलीस पाटील यांना देण्यात आल्या आहेत. चर्चासत्राची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील      सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, सामाजिक व्यासपीठे येथेही आगामी कालावधीत नवीन कायदे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करणार असल्य...