Posts

Showing posts from December, 2024

तीन वर्षापासून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हातावर तुरी देऊन पळणारा आरोपी पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमण यांना पकडण्यात यश.

Image
तीन वर्षापासून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हातावर तुरी देऊन पळणारा आरोपी पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमण यांना पकडण्यात यश. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. माणा व फलटण तालुक्यामध्ये गंभीर गुन्हातील फरार आरोपी गेले तीन वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये रात्रीच्या वेळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी एपीआय संदीप पोमण हे पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी फिरताना मिळून आला त्याला तात्काल अटक करून पुढील तपासासाठी  दहिवडी पोलीस ठाणे गु.र.नं145/2021 भा.दं.वि.सं.कलम 392,34 या गुन्ह्यातील व मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो दहिवडी  यांचेकडील  R.C.C.No.22/2022 पकड वॉरंट मधील पहिजे असलेला आरोपी नामे तिसराकोन उर्फ सुधीर जाकर काळे वय 21वर्षे रा.मोळ ता.खटाव जि. सातारा यास   श्री.सेवागिरी महाराज यात्रा बंदोबस्त पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतला असून त्यास पुढील कार्यवाही कामी दहिवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदर आरोपीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस 201/2021 कलम 457,380 प्रमाणे मालमत्तेचा गंभीर स्वरूपाचा गुन्...

चुलीवरच्या थालीपीठल्याचा आस्वाद घेत आहेत यात्राकरू.

Image
चुलीवरच्या थालीपीठल्याचा आस्वाद घेत आहेत यात्राकरू. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. पुसेगाव तालुका खटाव येथील प. पु.श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात भारी आदिनाथची चवच न्यारी  वडूज येथील प्रख्यात हॉटेल आदिनाथचे संचालक आबासाहेब गडदरे यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी यात्रेतील कृषी प्रदर्शनात सहभाग घेऊन खास चुलीवरील थालीपीठ, दही, धपाटे,उसळ यांची लज्जत यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली आहे. आदिनाथ थालीपीठ या नावाने अनेक प्रदर्शनामध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्री.गडदरे यांच्या आदिनाथ हॉटेलच्या सदिच्छा भेटी प्रसंगी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, येरळा परिवार प्रमुख धनंजयजी क्षीरसागर, दैनिक सकाळचे बातमीदार आयाज मुल्ला, अंबवडे ग्रामपंचायतीचे मा. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर इंगवले,ओमराज क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड..

Image
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड.. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धावपळीच्या जीवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी  एकजूट होणे आवश्यक असल्याने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटाव तालुका स्थापना करण्यात आली आहे.  सन २०२५ सालासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतील नूतन कार्यकारिणी निवडीची बैठक लोकराष्ट्र न्यूज चॅनेलचे वडूज येथीलऑफिसमध्ये  पार पडली.यावेळी नूतन कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष डॉ.विनोद खाडे,कार्याध्यक्ष-श्री.विजय जगदाळे,उपाध्यक्ष-श्री राजीव पिसाळ,सचिव-श्री. जे. के काळे, सहसचिव- सौ मिलिंदा पवार, खजिनदार-श्री महेश यादव,सहखजिनदार-श्री दत्तात्रय फाळके, संघटक- प्रा.अजय शेटे, प्रसिद्धी प्रमुख- श्री लालासाहेब माने- पाटील,संपर्कप्रमुख -श्री सचिन पवार,मार्ग...

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा यांच्या वतीने विध्यमान चेअरमन सौ. निशा राजेंद्र मुळीक यांचा सत्कार.

Image
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा यांच्या वतीने विध्यमान चेअरमन सौ. निशा राजेंद्र मुळीक यांचा सत्कार. सोनवडी बु, प्रतिनिधी, नासिर शेख. आज दि . २४ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा तसेच फलटण सेवानिवृत्त यांचे वतीने *विद्यमान चेअरमन .* सौ निशा राजेंद्र मुळीक यांचा प्राथमिक शिक्षक बँकेच्या फलटण शाखेच्या हॉलमध्ये संपन्न झाला .सातारा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष खाडे साहेब , तसेच घाडगे गुरुजी , फलटण सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष र . ना . कुंभार गुरुजी , डी के कदम आण्णा , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नारायणराव सपकाळ , शेवते साहेब , माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक  राजेंद्र  बोराटे , ह . सो गायकवाड , डांगे आबा , ढाणे गुरुजी , कृष्णात कुंभार व सर्वच सेवानिवृत्त शिक्षक .      फलटण शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलका , सरचिटणीस हणमंत चिंचकर , कोषाध्यक्ष तात्या आढाव वरील सर्वांच्या उपस्थित चेअरमन व नवीन कार्यकारणी फलटण प्राथमिक शिक्षक संघाचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

रावडी बु येथे कृषिदुतांकडून रांगोळीतून घडविले ग्रामीण दर्शन.

Image
रावडी बु येथे कृषिदुतांकडून रांगोळीतून घडविले ग्रामीण दर्शन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण तालुक्यातील रावडी बु.येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी  संत सावतामाळी मंदिर, रावडी बु. येथे रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवले, या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या रांगोळीतून कृषिदूतांनी गावातील शेती, ग्रामपंचायत, रस्ते, निरा नदी, निरा उजवा कालवा, देऊळ प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, कृषी दुकाने, दूध संकलन केंद्र, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी दाखविल्या.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर,  कार्यक्रम अधिकारी- प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक - प्रा. निलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यां...

साताऱ्यातील मंत्र्यांचा घटनाकार डॉ. आंबेडकर स्टॅच्यू व संविधान देऊन रमेश उबाळे यांनी केला सत्कार.

Image
साताऱ्यातील मंत्र्यांचा घटनाकार डॉ. आंबेडकर स्टॅच्यू व संविधान देऊन रमेश उबाळे यांनी केला सत्कार. कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुल्ला.  सातारा दि: सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन व एक उपाध्यक्ष पद असा भर गच्च अनुशेष भरून काढला आहे. यानिमित्त कॅबिनेट मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नामदार मकरंद पाटील यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू व संविधानाची प्रत भेट देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे  पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्याने मंत्री महोदय सुद्धा भारावून गेले. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  सर्व मागासवर्गीय वाड्या- वस्तीमध्ये जाऊन प्रचार केला. तसेच भविष्यात मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये विकास कामांसाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले होते. त्यामुळे महायुतीला यश मिळाले आहे. अशा शब्दात मंत्रिमहोदयांनी श्री उबाळे यांचा गौरव केला...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

Image
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. उपसंपादक, नितीन घोरपडे. मुंबई दि.२४- राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज ऊपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी व्यक्त केला.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्...

खामगांव येथील कृषीदूतांकडून कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक.

Image
खामगांव येथील कृषीदूतांकडून कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक दिले. कृषीदूत ठोंबरे सौरभ, धायगुडे प्रणव, वडणे अथर्व, सकट उत्कर्ष, तूपसौंदर ओंकार, थोरात चरण, फरांदे संकेत आणि पिसाळ रवीकुमार यांनी या कार्यक्रमाअंतर्गत खामगांव, तालुका फलटण येथील ज्वारी पिकावरील कीड नियंत्रणासंबंधित कीटकनाशक फवारणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. फवारणी नंतर शेतकर्‍यांना आवश्यक काळजी घेण्याची सविस्तर माहिती दिली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

केळी व्यवस्थापन" या विषयावर खामगांव येथे व्याख्यान आयोजित.

Image
केळी व्यवस्थापन" या विषयावर खामगांव येथे व्याख्यान आयोजित. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. खामगांव, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत खामगांव येथे "केळी व्यवस्थापन" आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.केळी व्यवस्थापन आधारित व्याख्यान देण्यासाठी माजी कृषी परिवेशक तय्यब सल्लाउद्दिन मुजावर सर, सरपंच अर्चना जगताप, सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मुजावर सरांनी सुरुवातीला केळी लागवडीसाठी निवडण्याची योग्य जागा, पाण्याचे व्यवस्थापन, केळीची महत्त्वपूर्ण जात, खात्रीशीर केळी उत्पादन व त्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. त्यानंतर फळबागांचे महत्त्व, जमिनीची निवड, केळीवरील रोग व किड व्यवस्थापन, केळीच्या जाती, झाडांमधील अंतर व फळ पिकल्यानंतर त्यासाठी मार्केट, व्यापारी व त्यातून मिळणारे उत्पन्न याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम यावर चर्चा झाली. केळी ...

खामगावयेथे कृषीदुतांकडून गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक.

Image
खामगावयेथे कृषीदुतांकडून गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण तालुक्यातील खामगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी सलग्र व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृर्षा महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.उत्पादन क्षमता वाढवण्यासाटी गांडूळ खत निर्मितीची गरज आहे - गांडूळ खत हे पूर्णपने नैसर्गिक असून सेंद्रिय आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तसेच मृदा भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकांची योग्य वाढ होते, सूक्ष्मजीव व गांडुळांची हालचाल वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते, पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते, औद्योगिक व कृषी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते असे फायदे पटवून देण्यात आले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा पालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. नीतिषा पंडित, प्रा.नीलिमा धालपे , मृदाशास्त्र व कृषी रसायन तज्ञ प्रा. जी. एस...

पाडेगाव येथे शेतकरी दिनानिमित्त कृषीदुतांनी काढली वृक्षदिंडी.

Image
पाडेगाव येथे शेतकरी दिनानिमित्त कृषीदुतांनी काढली वृक्षदिंडी. सोनवडी प्रतिनिधी, नासीर शेख. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला. संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय शेतकरी दीन म्हणून 23 डिसेंबर साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाडेगाव त येथे वृक्ष दिंडी आयोजित केली होती.या कार्यक्रमा अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा, पाडेगाव येथील मुख्याध्यापक श्री रविंद्र गायकवाड सर यांच्या मार्गद्शनाखाली वृक्षारोपण करून वृक्षदिंडी काढण्यात आली त्यावेळीं दिंडी मधे विद्यार्थी,  विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन शेतकरी वेशभूषा व फेटे परिधान करून दिंडीच्या स्वरूपामध्ये रोपट्यांची  मिरवणूक काढून शोभायात्रा काढली या मधे वृक्ष लावा घरोघरी, समृद्धी येई तुमच्या दारी, झाडे लावा घरोघरी, निरोगी राही परिसर, एक झाड एक मुल , वृक्ष लावून करा तिचे रक्षण यांसह विविध घोषणा, प्र...

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पाडेगाव फार्म येथे कृषी दुतांकडून वृक्षारोपण.

Image
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पाडेगाव फार्म येथे कृषी दुतांकडून वृक्षारोपण. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण ता. 23 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी हे पाडेगाव फार्म तालुका फलटण या गावात ग्रामीण जागरूकता व कृषी कार्यानुभव या कार्यक्रमासाठी गावात आलेले आहेत.  आज दिनांक 23 राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी दुतांनी न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव फार्म या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तरी या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अहीवळे सर, शिक्षक फडतरे सर व इतर सहकारी उपस्थित होते. यावेळी कृषी विद्यालय फलटणच्या कृषी दुतांनी विद्यार्थ्यांना शेतीचे व शेतकऱ्यांचे महत्त्व समजून सांगितले व वृक्षारोपण ही कशी काळाची गरज आहे यावरती त्यांना मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर धायगुडे सर यांच्या मार...

रावडी बु. येथे कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी दुतांकडून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा.

Image
रावडी बु. येथे कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी दुतांकडून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण तालुक्यातील रावडी बु.येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा साजरा केला.  संपूर्ण देशामध्ये भारताचे ५ वे पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. या  दिवसाचे औचित्य साधून  रावडी बु. येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस आयोजित केला होता.यावेळी कृषी दुतांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमीन चे आरोग्य चांगले रहण्यास मदत होणार असून विषमुक्त शेतमाल तयार करण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांना अहवान केले.या कार्यक्रमात कृषी दुतांनी नैसर्गिक शेती गट योजना मध्ये शेतकऱ्यानी सहभागी होऊन सेंद्रिय शेती च्या माध्यमातून सेंद्रिय शेती माल उत्पादन करणे बाबत आव्हान केले. पुढच्या प...

मुरूम येथे शेतकरी दिवस उत्साहात साजरा.

Image
मुरूम येथे शेतकरी दिवस उत्साहात साजरा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.२३/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये  शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरिफा शेख (कृषी सहाय्यक साखरवाडी ता.फलटण )यांनी उपस्थित राहून  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व विविध कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली व सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुरूम गावचे उपसरपंच संतोष बोंद्रे यांच्या सहकार्याने मुरूम गावातील सर्व ग्रामस्थ, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल  भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्...

ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

Image
ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. फलटण प्रतिनिधी, निशिकांत अहिवळे  नागपूर, दि. २० :-* ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत.महाराष्ट्र आता थांबणार नाही:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत. महाराष्ट्र आता थांबणार नाही:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोनवडी ख्रू, नासिर शेख. लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणार, शेतकऱ्यांना वीज बील नाही. नागपूर, दि. 19 :- राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. *महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख...

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे. बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली *परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार ;पोलीस अधिकारी निलंबित* *बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत*नागपूर, दि. 20:-बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.  बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीड मध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.  बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरो...

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल.कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोनवडी "ब्रु"प्रतिनिधी,दिलावर शेख. नागपूर, दि. २० - कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद  नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्...

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर.विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासह समतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर. विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासह समतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. नागपूर, दि. २१ : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासास...

विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधणार:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधणार:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपसंपादक, नितीन घोरपडे. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार.गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार.विदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनपर्यटन, जलपर्यटन.मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार.पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकारांची सखोल चौकशी.नागपूर, दि. २१:- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीट प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या तीन वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांन...

राजे गटाला डावलून कोळकितील बबलू निंबाळकर यांच्या सह ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश.

Image
राजे गटाला डावलून कोळकितील बबलू निंबाळकर सह ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश. सोनवडी प्रतिनिधी, नासीर शेख. कोळकितील विकासकामाला निधी कमी पडुन देणार नाहि.असे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आमदार मा.सचिन पाटील यानी आव्हान दिलेने कोळकीतील युवा नेते बबलू निंबाळकर सह कोळकी ग्रामस्थांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने राजे गटाला खिंडार पडलेचे दिसून येत आहे. माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी युवा नेत्यांचे व ग्रामस्थ यांचे स्वागत केले.गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला राजे गटाने बबलू निंबाळकर यांना तिकीट दिले नव्हते.त्यामुळे बबलू निंबाळकर यांनी स्वतःच्या आईला अपक्ष निवडून आणले यामुळे त्यांचा राग मनामध्ये राहून गेलने ग्रामस्थ व बबलू निंबाळकर यांच्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष राजन खिलारे.निरंजन निंबाळकर.यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.यावेळी अभिजीत निंबाळकर.जयकुमार शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

हनुमान विद्यालय निढळ येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला समारोप.

Image
हनुमान विद्यालय निढळ येथील  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला समारोप. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.     निढळ येथे १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत तीन दिवस सलग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रयत शिक्षण संस्थेचे, हनुमान विद्यालय, निढळ, ता खटाव, जि सातारा. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती खटाव (वडूज) यांचे संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार श्री महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक शाळांनी उस्फुर्तपणे सहभागा दर्शवला ,तीन दिवस सुरु असलेल्या प्रदर्शनामध्ये बा १० उपकरण या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहीले. तीन दिवस गावातील लोकांचा व त्याच बरोबर पंचक्रोशीतील शाळांचा सहभाग होता. या प्रदर्शनाची सांगता १४ डिसेंबर रोजी  रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख , तसेच श्री. नवनाथ जगदाळे (विभागीय अधिकारी मध्य विभाग) यांच्या उपस्...

रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या विपणनासाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

Image
रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या विपणनासाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. फलटण तालुक्यातील रावडी बु.येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी-विक्रीबद्दलच्या आधुनिक तंत्रज्ञानची ओळख करून दिली.शेतकऱ्यांना पिकवलेला शेतीमाल  विक्रीची कला आणि वेळ नसल्याने दर्जेदार शेतीमाल असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते. त्यासाठी ॲप्स उपलब्ध आहेत. शेतमाल विक्री ॲपद्वारे शेतकरी आपला शेतमाल मोबाईलद्वारेच विक्री करू शकतात. विविध बाजारपेठांच्या बाजारभावाची माहिती, हवामान अंदाज, बियाणे याबद्दल सहजरित्या माहिती मिळवू शकतात. कृषीदूतांनी शेतकऱ्यांना याबद्दल मार्गदर्शन केले. यासंबंधित ॲप्सचे महत्त्व सांगितले. ऍग्रो स्टार, ॲग्री सेंट्रल, भारत ॲग्री, ...

बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.  सोनवडी,,ब्रु,,दिलावर शेख. नागपूर, दि. 16 : मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाता़ची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक (रॅन्डम) पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली असून त्या लवकरच बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत. बेस्ट बसेसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ‘बेस्ट’ प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या पीठासीन अधिकारी होत्या.

हिवाळी अधिवेशनात २० विधेयके मांडण्यात येणार महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
हिवाळी अधिवेशनात २० विधेयके मांडण्यात येणार महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपसंपादक, नितीन घोरपडे. नागपूर, दि. १५ (शिबिर कार्यालय) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या ...

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. पुणे,दि.१४:- समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासोबतच समाजातील मूल्ये जीवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशाप्रकारच्या पुस्तक महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे, हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन कॉलेज येथील मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अमित गोरखे, आमदार हेमंत रासने, आमदार शंकर जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्...

अरिहंत टी. व्ही. एस. फलटण यांच्या वतीने दसरा दिवाळीचे दि.12/12/2024 रोजी सजाई गार्डन येथे लकी ड्रॉ वितरण सोहळा संपन्न.

Image
अरिहंत टी. व्ही. एस. फलटण यांच्या वतीने दसरा दिवाळीचे दि.12/12/2024 रोजी सजाई गार्डन येथे लकी ड्रॉ वितरण सोहळा संपन्न. सोनवडी खु,,प्रतिनिधी, नाशिर शेख. फलटण अरिहंत टी.व्ही.एस.फलटण यांच्या वतीने दसरा व दिवाळी निमित्त भंपर लकी ड्रॉ आयोजीत करण्यात आला होता.त्या मधील विजेते यांना दि.12/12/2024 रोजी फलटण येथील सजाई गार्डन मध्ये पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रम दरम्यान वीरेंद्र केंजळे साज सातारा यांचा जुन्या व नव्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.यामध्ये पहिले पारितोषिक लकी ड्रॉ मधील प्रथम क्रमांकाचे विजेते श्री तावरे साहेब यांना एक लाख चौधा हजार रु. किमतीची आय क्यूब स्वीच मोटारसायकल मा. पत्रकार मेहता साहेब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे विजेते श्री महीपती चव्हाण यांना एक लाख त्रेपन्न हजार रु. किमतीची आय क्यूब डबल बेट्री असणारी मोटासायकल मा. अरिहंत टी. व्ही. एस. फलटणचे मालक मा. जोशी साहेब यांचे हस्ते मोटारसायकल डबल पारितोषिक किम्मत हि चेक द्वारे वितरण करून पारितोषिक सोळा संपन्न झाला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या वतीने पाडेगावं महिलांना कुल्पी तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण.

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या वतीने पाडेगावं महिलांना कुल्पी तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण. प्रतिनिधी, नाशीर शेख. पाडेगाव ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी विध्यालय फलटण येथील आठव्या सत्रातील कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25 कार्यक्रमातर्गत पडेगावं ता. खंडाळा येथील महिलांना  यामध्ये कुल्फी कशी तयार करावी, किती दुधासाठी किती साखर वापरावी आणि कुल्फी तयार करताना काय काय करावे,काळजी कोणती घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती कृषीदुतानी महिलांना दिली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीशा पंडित व प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत इंगोले धनंजय,केसकर राहुल, रनवरे शिवतेज, काटकर सौरभ, धुमाळ श्रीजीत,कांबळे रोहन, गोडसे आदित्य यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

रोपवाटिका व्यवस्थापन" या विषयावर रावडी बु. येथे व्याख्यान आयोजित.

Image
रोपवाटिका व्यवस्थापन" या विषयावर रावडी बु. येथे व्याख्यान आयोजित. साखरवाडी प्रतिनिधी, ताजुदिन आत्तार. रावडी बु, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील  कृषीदूत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत रावडी बु. येथे "रोपवाटिका व्यवस्थापन" आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.                            रोपवाटिका व्यवस्थापन आधारित व्याख्यान देण्यासाठी  श्री समर्थ नर्सरी,  सुखेड, ता. खंडाळा, जि. सातारा चे सर्वेसर्वा डॉ.बापूराव चोपडे सर, कृषी सहाय्यक मा. आदेश करे साहेब, सरपंच दिलीप ताकवले, चेअरमन, सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. चोपडे सरांनी सुरुवातीला रोपवाटिकेसाठी निवडण्याची योग्य जागा, पाण्याचे व्यवस्थापन, रोपांचे महत्त्व, खात्रीशीर रोपे तयार करणे व रोपवाटिकेचे व्यवस्थापन या विषयी माहिती दिली.  त्यानंतर फळबागांचे महत्त्व, जमिनीची निवड, फळांवरील र...

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. *वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ* मुंबई, दि.१३: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ  वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बिकेसी, वांद्रे येथे दि.13 ते 15 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड हिन्दू  इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, या परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.यावेळी माजी मंत्री तथा आमदार मंगल प्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू  इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री  टी. व्...

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रतिनिधी, दिलावर शेख. मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात,' डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे. विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाचे विविध उपक्रम.

Image
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाचे विविध उपक्रम. उपसंपादक, नितीन घोरपडे. गुंतवणूकदारांना मदतीसाठी 'कंट्री डेस्क' विशेष कक्ष. जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी "कंट्री डेस्क" या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.राज्य सरकार व प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य...

फलटण (मलटण )मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी राजेंद्र मदने यांच्या मातोश्री कै. कलावती लालासो मदने यांचे प्रथम पुण्यतिथी.

Image
फलटण (मलटण )मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी राजेंद्र मदने यांच्या मातोश्री कै. कलावती लालासो मदने यांचे प्रथम पुण्यतिथी. फलटण प्रतिनिधी, निशिकांत अहिवळे. उद्या मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी आपल्या मानवाधिकार कमिटीतील जनरल सेक्रेटरी / सातारा 24 तास न्यूज चॅनेलचे फलटण तालुका संपर्क प्रमुख/ प्रतिनिधी श्री.राजाभाऊ मदने यांच्या मातोश्री कै.कलावती लालासो मदने यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुण्यतिथी आहे. तरी आपल्या कमिटीतील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सदस्य त्याच बरोबर मित्र मंडळी पाहुणेमंडळी यांनी उद्या श्री.राजाभाऊ मदने यांच्या राहत्या घरी मलटण काळूबाई नगर येथे सकाळी 11.30 वाजता फुले वाहण्या साठी आपणा सर्वांची उपस्थित प्रार्थनीय आहे.

मुरूम गहू बीज प्रक्रिया विषयावर प्रात्यक्षिक.

Image
मुरूम गहू बीज प्रक्रिया विषयावर प्रात्यक्षिक. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.१२/१२/२०२४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिकांवरील वाढत्या  रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी   बीजप्रक्रियांबाबत प्रात्यक्षिकाद्वारे  माहिती दिली.या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना  गहू उत्पादन वाढवण्यासाठी बीज - प्रक्रिया कशी करावी, याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात बीजप्रक्रियेचे विविध फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी संजय बोंद्रे , आकाश गायकवाड, मांढरे , धीरज कणसे व शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. नवी दिल्ली, ११ डिसेंबर:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. *पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राचा गौरव* मुंबई, दि. ११: 'पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे.शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कारांमध्ये जगभरातील सहा मान्यवरांच्या यादीत डॉ गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरणे हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरस्वापद आहे. यातून डॉ गाडगीळ यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे. पर्यावरण, जैवविविधतेचे रक्षण हा त्यांचा ध्यास राहीला आहे. त्याला त्यांनी जीवनकार्य मानले आहे. यातूनच ते गेली अनेक दशके या क्षेत्रात ...

हनुमान विद्यालय निढळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन.

Image
हनुमान विद्यालय निढळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. निढळ तालुका खटाव येथे हनुमान विद्यालय,निढळ मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक 12/12/2024 ते शनिवार दिनांक 14/12/2024 या कालावधीत निढळ येथे संपन्न होत आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 12/12/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता मा.आ.महेश शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनास मा.आ.जयकुमार गोरे भाऊ,मा.आ.मनोज घोरपडे,मा.डॉ.जस्मीन शेख,(गटविकास अधिकारी,)  मा.श्रीमती.शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी प्राथमिक)थ श्रीमती.प्रभावती कोळेकर(शिक्षणाधिकारी माध्यमिक)श्रीमती.सोनाली विभुते(गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खटाव. )सौ.रेखा घाडगे(सरपंच ग्रामपंचायत निढळ) चेअरमन. भिमराव माने ,खटाव तालुका विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.संदिप त्रिंबके,उपाध्यक्ष श्री.दिलीप साबळे उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांसाठी निॅबध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजुषा,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.समारोप व पारितोषिक वितरण समारंभ...