इरफान जमादार व राजू मुल्ला यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कोरेगाव राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड.

इरफान जमादार व राजू मुल्ला यांच्या  सामाजिक कार्याची दखल घेत कोरेगाव राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग कोरेगाव शहर अध्यक्षपदी इरफान सलीम जमादार यांची राष्ट्रवादी काँग्रेस  अल्पसंख्यांक अध्यक्ष शफिक शेख यांनी निवड करून आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. इरफान जमादार व राजू मुल्ला यांचे असलेले समाजातील कार्य तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांचे योगदान हे लाख मोलाचे असून वेळोवेळी त्यांनी कोरेगाव शहर अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून शशिकांत शिंदे साहेबांची पाठ राखण केली आहे. तसेच समाजातील त्यांचे असलेले स्थान  व त्यांच्या पाठीमागे असलेले लोकमत हे खरोखरीच उल्लेखनीय असून  एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समाजाच्या असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची सर्वानुमते कोरेगाव शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी अनेक अल्पसंख्याक समाजातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संजय पिसाळ, सचिन बर्गे, गफ्फार कुरेशी, निसार खान, फरदीन मुजावर, उपस्थित होते अल्पसंख्यांक कोरेगाव शहर उपाध्यक्षपदी राजू मुल्ला, खजिनदार वसीम शिकलगार, सचिव पदी राजू बेग  यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस, तालुका अध्यक्ष जावेद शेख,तालुका सरचिटणीस समीर पटवेकर , अफजल कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मोहिनी कागदी गफ्फार कुरेशी ,मुजम्मिल कुरेशी, वाहिद शेख, मुदस्सिर कुरेशी, आसिफ कुरेशी इतर मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.