Posts

Showing posts from September, 2024

पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. सातारा, दि. २९: पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी सहसंचालक उमेश पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे...

पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न.

Image
पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. सातारा दि.29-पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकर इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते. या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत 16 कोटी 25 लाख 56 हजार इतकी आहे. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे 135 लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत 110 मिमी ते 250 मिमी व्यासाची  38. 964 किमी. पाईपलाईन असणार आहे.  तर 4,442 घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत...

महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण.

Image
महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांच्या संकलपनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार  सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहि...

‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

Image
‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन  इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. नाशिक, दि. २८ :* नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांचे व 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भुमिपूजन झाले.भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर,माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि स...

गौरी सजावटीचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुंदरबन गार्डनमध्ये उत्साहात संपन्न.वनिताताई भंडारी यांचे विशेष योगदान.

Image
गौरी सजावटीचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुंदरबन गार्डनमध्ये उत्साहात संपन्न.वनिताताई भंडारी यांचे विशेष योगदान. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आदर्श रणरागिनी महिला ग्रुप सातारा यांच्या सौजन्य गौरी सजावट स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सोहळा सुंदरबन गजाली गार्डन येथे संपन्न गौरी सजावट विजेता प्रथम क्रमांक प्रणाली प्रभाकर शिंदे व द्वितीय क्रमांक माधुरी अरविंद जाधव तृतीय क्रमांक ज्योती संतोष अडसूळ व 4)वनिता विकास शिंदे5) सायली संजय सोलापुरे 6) शर्वरी शशांक जंगम) 7) सारिका सोमनाथ मिठारे 8) डॉ सविता वावरे 9) मोनाली संकेत बर्गे 10) रूपाली कैलास वाघमारे 11) वैष्णवी धुमाळ  12) अपर्णा सागर लोखंडे सर्व विजेता स्पर्धकांना प्रमाणपत्र व गिफ्ट स्वरूपात वस्तू देऊन अभिनंदन सत्कार सत्कार करण्यात1(प्रथम क्रमांक मानाची सोन्याची नथ प्रणाली शिंदे ब्रह्मचैतन ज्वेलर्स यांच्या सौजन्या द्वितीय क्रमांक२)माधुरी जाधव मानाची पैठणी वनिताताई भंडारे सौजन्य तृतीय क्रमांक ज्योती संतोष अडसूळ वनग्राम मनी मंगळसूत्र सुनिता शिंदे सौजन्य वनिता शिंदे मानाची पैठणी अमृता पाटील यांच्या सौज...

पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी.

Image
पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दि. २४- अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सच...

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी.

Image
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक पंढरपूरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद मुंबई, दि.  २४: राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. त्याप्रमाणे या तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. यासर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गूणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ...

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणेआपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं.

Image
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.   *महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन; तर एमएमआर महाराष्ट्राचे *-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*   *ठाणे दि.२१: -* महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन (Growth Engine) आहे. तर "आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे" असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत 'ठाणे विकास परिषद-२०२४' चे आयोजन करण्यात आले  होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे...

स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभसफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुंबई, दि. १९ : "देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान  प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण खूप कमी झाले आहे. याकामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे", असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले.स्वच्छता ही सेवा २०२४ (SHS)' या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी...

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

Image
पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात. अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन.  राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ. ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ. वर्धा, दि.२० : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री न...

औंध परिसरातील कॉलेजमधील मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियांची धिंड त्यांच्या गावातून काढली जाणार निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप.

Image
औंध परिसरातील कॉलेजमधील मुलींना त्रास देणाऱ्या रोड  रोमियांची धिंड त्यांच्या गावातून काढली जाणार  निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. औंध तालुका खटाव येथे निर्भया पथक क्रमांक 5 च्या वतीने राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना व मुलींना स्व-संरक्षण व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी मार्गदर्शनाचे आदेश दिला असून औंध महाविद्यालयांमध्ये निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना व  विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना महाविद्यालय परिसर किंवा एसटी स्टँड या परिसरामध्ये रोड रोमिओ फिरताना आढळल्यास त्यांची दिंड त्यांच्या गावातून काढली जाईल अशी स्तंभी दिली असून यापुढे कोणत्याही अशा इसमांना दया क्षमा असणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा देऊन रोड रोमियांनी वेळेतच स्वतःमध्ये सुधारणा करावी  मुलींच्या संरक्षणासाठी आमचे  निर्भया पथक 24 तास सदैव कार्यरत राहणार आहे व प्रत्येक मुलींनी महिलांनी मोबाईल नंबर मध्ये डा...

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा मुंबई, दि. १५:- धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे  यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, आदिवासी विकास विभागाचे  सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थि...

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 16 इसम तडीपार.

Image
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 16  इसम तडीपार. पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाणे कडून कार्यवाही करण्यात आली आहे.सण/उत्सव काळात गुन्हे केलेल्या समाजकंटकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 163 प्रमाणे 16  इसम यांना गणेशोत्सव/ईद अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतून हद्दपार/ तडीपार करण्यात आले आहे.ज्यांचेवर चालू वर्षात मारामारी/शासनाने दिले आदेश न जुमानने अशा इसमाचे चांगले वर्तणुकीचे बाँड घेण्यासाठी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 126 प्रमाणे 30 प्रस्ताव मा.तहसीलदार खटाव यांचेकडे सादर केले आहेत गणेश मंडळाना मिरवणुका कोणतेही वाद न करता सलोख्याचे वातावरणात पार पाडावेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 168 प्रमाणे 150 नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तसेच सर्व गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकी जपून मिरवणुका वेळेत पार पाडण्याचे आवाहन करून पोलीस ठाणे कडून बंदोबस्तासाठी 2 अधिकारी, 35 पोलीस, 24 होमगार्ड, 1 एस आर पी सेक्शन, 1 स्ट्रायकिंग टीम तसेच डॉल्बी ध्वनीमापक यंत्रणा स्कॉड अस...

छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

Image
छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि, १३: मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री श्री. केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली. वेरूळ येथील शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबत...

आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन.

Image
आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. राहुल गांधीनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले, भारतीय जनता पार्टीने राज्यभर राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे विरोधात आंदोलन केले, आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा आणि इंडी आघाडीचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे. आरक्षण रद्द करून संविधानावर गदा आणू पाहणाऱ्या या विकृत मानसिकतेचा, साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम च्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.आंदोलनाच्या सुरुवातीलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी "भारत माता की जय", "भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो", अशा घोषणा देण्यात आल्या.

मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा. श्र्वाब मुंबई, दि. १२ : -  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी - सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला 'जागतिक आर्थिक केंद्र' म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करण्...

प्रशांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उद्योग विभाग सरचिटणीस पदी निवड.

Image
प्रशांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  महाराष्ट्र राज्य  प्रदेश उद्योग विभाग  सरचिटणीस पदी निवड.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. निढळ ता खटाव चे सुपुत्र . प्रशांत खुस्पे   पाटील (बाबा) यांची  राष्ट्रवादी काँगेस पार्टी   महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (उद्योग) विभाग पदी निवड झाली .तसे  नियुक्ती पत्र  त्यानां सुभाष मालपाणी (प्रदेश अध्यक्ष उद्योग विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि . सागर भोगावकर ( राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष) यांनी दिले .त्यानां राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे अध्यक्ष अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष प्रत्येका पर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेल .या पक्ष वाढी साठी  मी सर्वोत्तम योगदान देणार आहे असे पाटील यांनी सांगितले.त्यानां निढळ ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या .

डॉल्बी आढळून आल्यास जप्त करण्यात येणार:- ए पी आय संदीप पोमण.

Image
डॉल्बी आढळून आल्यास जप्त करण्यात येणार:- ए पी आय संदीप पोमण.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.  पुसेगाव. ता. खटाव पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये  गणेश उत्सव अनुषंगाने सदरचे सन उत्सव शांततेत, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडावेत यासाठी पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची मीटिंग घेण्यात आली त्यावेळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी बोलत असताना साऊंड सिस्टीम बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सदर मीटिंगमध्ये गणेश उत्सव मंडळाने एक गाव एक गणपती , सामाजिक उपक्रम राबवावे, रक्तदान शिबिर आयोजित करावे, गाव स्वच्छता अभियान राबवावे, महिलांचे सन्मान करणारे उपक्रम घ्यावेत. तसेच मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी उंच भरारी हा कार्यक्रम घेतलेला असून तो सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण सर्वांनी पोहोचवा असे आवाहन केले. प्रत्येक गावाने आपल्या गणेश मंडळांना आवाहन करून एक दिवस गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येवून गावासाठी स्वच्छ्ता उपक्रम राबवावा, तसेच पुसेगा...

आमदार अमित गोरखे यांचा सातारा नगरीमध्ये भव्य सत्कार समारंभ व मातंग समाज मेळाव्याचे आयोजन.

Image
आमदार अमित गोरखे यांचा सातारा नगरीमध्ये भव्य सत्कार समारंभ व मातंग समाज मेळाव्याचे आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सकल मातंग समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह जि.म.सह.बँक सातारा या सभागृहात झालेल्या ऐतिहासिक "मातंग समाज मेळावा" व विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मा.आ.अमित गोरखे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.आ.महेश शिंदे,मा.अण्णा वायदंडे ,मा.सत्यवान कमाने,मा.संदिप शिंदे मा.मनोज घोरपडे,मा.राज सोनवले, मा.कांतीलाल कांबळे, मा.पप्पू कांबळे,मा.राजेंद्र सकटे, मा.किशोर गालफाडे,मा.सचिन कांबळे, मा.महादेव सकट, मा.मोहन अवघडे,मा.उमेश खंडूझोडे,मा.विशाल सपकाळ, मा.अमोल पाटोळे,मा.अनिल लोंढे ,मा.नितीन तुपे,मा.बाबासाहेब जाधव, मा.प्रमोद लोखंडे,मा.अमीत भिसे,मा.गणेश लोखंडे, मा.महेंद्र अवघडे, प्रवीण , मारुती बोभाटे,माधवराव साठे,व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते  पुणे येथील शाहीर बापू पवार यांचा कार्यक्रम भाषणे झाल्यावर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन मा.रामभाऊ सातपुते यांन...

महिला संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे:-सौ सुनीता राजे पवार.

Image
महिला संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे:-सौ सुनीता राजे पवार. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, कानोपात्रा ,जनाई ,मुक्ताई, सावित्रीबाई फुले आणि अगदी अलीकडच्या काळातील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाचा वारसा आपण जपला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह व संस्कृती प्रकाशनच्या सुनिता राजे पवार यांनी केले. येथील श्री सेवागिरी व्याख्यानमालीचे चुकते पुष्प गुंफत असताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज, देवस्थानचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख ,गौरव जाधव आणि नवोदित लेखक दिनेश फडतरे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनिता राजे पवार पुढे म्हणाल्या... एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येणारा महिला संस्कृतीचा वारसा हाच आपल्या भारतीय लोकशाहीचा मुलाधार आहे. राष्ट्र निर्मितीचा मंत्र देणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करणाऱ्या सावित्रीबाई फुले, लढाऊ बाणा सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई तसेच पहिल्या आ...

मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून आर्वीचे 70 मोतीबिंदू पेशंट पुण्याला ऑपरेशनसाठी रवाना.

Image
मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून आर्वीचे 70  मोतीबिंदू पेशंट पुण्याला ऑपरेशनसाठी रवाना. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. आर्वी (वाठार कि.) कराड उत्तर भाजपा नेते आणि विधानसभा निवडणूक प्रमुख  मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून  आर्वी ता. कोरेगांव जि. सातारा येथे घेण्यात आले होते मोतीबिंदू  शिबीरामधील 70 मोतीबिंदू पेशंटला घेऊन 2 बस मोफत ऑपरेशनसाठीपुणे एच. व्ही. देसाई हॉस्पिटलकडे रवाना झाली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री. विकास राऊत, उपसरपंच श्री. प्रकाश पाटील, उपसरपंच श्री. पंकज पवार, श्री. संजय पाटील, सोसायटी संचालक श्री. विकास जाधव,श्री. दिलीप जाधव, श्री. सतीश यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय माने, ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश जाधव, माजी उपसरपंच सोमनाथ पवार, श्री. श्रीकांत माळी, कल्याण जाधव जयंत जाधव मनोजदादा युवा मंचचे सुधीर शेळके सरपंच, एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे श्री. लक्ष्मण देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.