बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर केलेल्या हल्लेखोरांना अटक ; विश्वास मोरे.

बनवडी इब्राहिम फाटा येथील पारधी समाजावर केलेल्या हल्लेखोरांना अटक ; विश्वास मोरे.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


बनवडी (इब्राहिमपूर) तालुका कोरेगाव येथे राहणाऱ्या पारधी समाजावर दुधनवाढीतील काही समाजकंटकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली. व जीवना  आवश्यक वस्तूंची नासधूस  करून असणाऱ्या घराची तोडफोड करून पारधी समाजावर अन्याय केला होता. या हल्ल्याबाबत पारधी समाजाच्या वतीने अन्याय केलेल्या समाजकंटकांना अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी  पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्याकडे केली होती  सदर या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली होती 
, वाठार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार व पारधी समाजाची महिला .  निर्मला विनोद भोसले वय 45 वर्ष, यांनी  दिलेल्या जबाबात म्हटले होते मोटार सायकलच्या अपघाताच्या कारणावरून, नावे पूर्ण माहित नसल्याने,दुधनवाडीतील काही समाजकंटक व गाव गुंडांनी बनवडी,इब्राहिम फाटा तालुका कोरेगाव येथे आम्ही राहात असलेल्या ,माझ्यासह पारधी समाजावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला करून येथील महिला व मुलांना जबर मारहाण केली, तसेच समाज उपयोगी साहित्याची मोडतोड धान्यधुन्याची व घराची नासाडी व मोडतोड करून वित्तीय हानी केली होती, सदर या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून, सदर दुधनवाडी येथील या समाजकंटकावर कारवाई करून, पारधी समाजाच्या महिला, मुलावर, लोकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दुधनवाडीतील या समाजकंटकावर पोलीस ठाणे वाठार  येथे तक्रार करण्यात आलेली होती सदर या पारधी समाजास न्याय मिळावा  यासाठी  दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी कोरेगाव गणेश केंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे याबाबत मागणी केली होती त्यास अनुसरून पारधी समाजावर व महिला मुलावर अन्याय करणाऱ्या व त्या गुन्ह्यात समाविष्ट असणाऱ्या आरोपींना अटक केल्याने, पारधी समाजाने आज कोरेगाव येथे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे साहेब यांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे दलित पॅंथरचे अध्यक्ष  मोरे, कार्यकर्ते, तसेच पारधी वर्ग उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.