Posts

Showing posts from November, 2022

तेजस कर्णे यांची राज्य आयकर निरीक्षक पदी निवड.

Image
तेजस कर्णे यांची राज्य आयकर निरीक्षक पदी निवड. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  डिस्कळ ता. खटाव येथील डिस्कळ गावचे सुपुत्र तेजस सुरेश कर्णे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य आयकर निरीक्षक पदी निवड झाली आहे त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण कर्जत (अहमदनगर) येथे झाले महाविद्यालय शिक्षण दादा पाटील कॉलेज कर्जत येथे झाले माळेगाव इंजीनियरिंग कॉलेजमधून बी. इ .पदवी विशेष श्रेणीतून मिळवल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला या त्यांच्या यशाबद्दल सरपंच डॉ. महेश पवार, उपसरपंच संदीप कर्णे, ग्रामस्थ, पत्रकार, विविध पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रेवलकरवाडी येथे आमदार महेश शिंदे गटाच्या ताकतीत वाढ युवानेते रामदास जगदाळे यांचा जाहीर प्रवेश.

Image
रेवलकरवाडी येथे आमदार महेश शिंदे गटाच्या  ताकतीत वाढ युवानेते रामदास जगदाळे यांचा जाहीर प्रवेश. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  रेवलकरवाडी .ता .खटाव येथील ,युवा नेते व शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख रामदास जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी विसापूर गावचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटकर ,पुसेगावचे युवा नेते सुसेन जाधव, रेवलकरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अधिक कदम ,प्रकाश कदम ,हणमंत कदम, मोहन कदम आदी ग्रामस्थ पदाधिकारी विविध मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रवेशामुळे रेवलकरवाडी गावामध्ये ,आमदार महेश शिंदे यांची ताकत वाढली असून येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वात जास्त मताधिक्य मिळवून देऊ व आमदारांचा विश्वास सार्थ करूनच दाखवू असे युवा नेते रामदास जगदाळे यांनी सातारा न्यूज ची बोलताना सांगितले. विसापूर परिसरामध्ये आमदार महेश शिंदे यांची लोकप्...

दिनेश सनस यांनी मुस्लिम कब्रस्तान ला दिले ठिबक सिंचन व फवारणी चे औषध.

Image
दिनेश सनस यांनी मुस्लिम कब्रस्तान ला दिले ठिबक सिंचन व फवारणी चे औषध. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक व दिलदार असे व्यक्तिमत्व असणारे श्री दिनेश जी सणस यांनी मुस्लिम समाजाचे कब्रस्तान मध्ये ठिबक सिंचन व औषधे दिली त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे कोरेगाव शहराध्यक्ष इरफान जमादार तसेच उपाध्यक्ष राजू मुल्ला खजिनदार वसीम शिकलगार सचिव राजू बेग मोसीन कागदी समीर हकीम मोसीन शेख आफजल कुरेशी रशीद शेख सिकंदर खलिफा बिलाल सय्यद असा मुस्लिम समाज उपस्थित होता. 

मोहसीन कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Image
मोहसीन कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला. सातारा रोड तालुका कोरेगाव येथील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे व मुस्लिम समाजाच्या वतीने सातार रोड येथे मोहसिन कुरेशी यांचा  वाढदिवस मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी मोहसिन कुरेशी यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी कोरेगाव विधानसभेचे लाडके आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांनी वेळात वेळ काढून सातार रोड येथे येऊन मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन कुरेशी यांना शुभेच्छा व आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक केले त्यावेळी मुस्लिम समाजाकडून रमजान कुरेशी फिरोज मोमीन, वसीम कुरेशी, रौफ शेख तसेच मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घाडगे तसेच मी वडार महाराष्ट्राचा तालुकाध्यक्ष श्री प्रसादजी फडतरे व वडार समाजाचे नेते रवींद्र घाडगे ,रणजीत फाळके, प्रसाद घाडगे, राजकुमार घाडगे, विनायक घाडगे, नाथा घाडगे ,विठ्ठल वडार , रोहन फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भूमाता युथ फाऊंडेशन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी (वर्धनगड) पवारवाडी ग्रामपंचाय तसरपंच श्री महेश पवार यांची निवड.

Image
भूमाता युथ फाऊंडेशन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी (वर्धनगड) पवारवाडी ग्रामपंचाय तसरपंच श्री महेश पवार यांची निवड.  पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम आज जलमंदिर पॅलेस सातारा येथे भूमाता युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हा पद नियुक्तीचा कार्यक्रम भूमाताचे आधारस्तंभ छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आला. या ठिकाणी भूमाता फाउंडेशनचे मार्गदर्शक कृषीभूषण, कृषिरत्न पुरस्कारित डॉ. बुधाजीराव मुळीक सर उपस्थित होते तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, उपाध्यक्ष रामदास बेडकुते, कार्याध्यक्ष कालिदास माने, सचिव निनाद पाटील, खजिनदार निलेश पवार, चिटणीस ॲड. गौरव भोसले उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्हा व साताऱ्यातील तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आदी पदांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी पवारवाडीचे सरपंच श्री महेश पवार यांची नेमणूक झाली. तसेच खटाव तालुका उपाध्यक्ष पदी वर्धनी स्टोन क्रशरचे मालक श्री अनिकेत फाळके यांची नियुक्ती झाली.मानतालुका अध्यक्ष पदी श्री वैभव शेलार, कार्याध्यक्ष पदी शिव नेटवर्कचे...

किल्ले वर्धनगड गावात आठवडा बाजार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते सुरू.

Image
किल्ले वर्धनगड गावात आठवडा बाजार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते सुरू.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. आज शनिवार वर्धनगड येथील आठवडा बाजारात प्रारंभ झाला असून विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे वर्धनगड चे सरपंच अर्जुन मोहिते यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ फोडून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  स्वातंत्र्याच्या काळापासून 75 वर्षानंतर वर्धनगड या ठिकाणी आज शनिवार आठवडा बाजार भरत असून या बाजारामध्ये व्यापारी व व्यावसायिकानी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तर भाजीपाला खरेदी करण्यासाठी वर्धनगड परिसरातील पवारवाडी पाचंगणी अळी, जाधव वस्ती शिंपी मळा चव्हाणवाडी, रामोशी वाडी,भाटमवाडी, तसेच भंडारमाची परिसरातील काही भागातील बाजार करून नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला खरेदी करण्यासाठी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर मानुबाई माता मंदिरामध्ये घेतलेल्या कार्यक्रमात  बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले" या गावोगावच्या बाजाराबरोबरच खटाव तालुक्यासाठी एमआयडीसीचा प्रकल्प तसेच वर्धनगड या ठिकाणी  तरुणांना रोजगार उपलब्धतेचे साठी या गोष्टीची गरज ...

राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड.

Image
राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड. कोरेगांव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे कोरेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते नुरुभाई पटवेकर यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नुरुभाई पटवेकर  कोरेगाव जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुल्ला ,जावेद उर्फ गोविंद शिकलगार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे कोरेगाव तालुका अध्यक्ष बबलू जमादार ,उपाध्यक्ष राजू मुल्ला ,दिलावर शिकलगार, रशीद भाई शेख ,राजू बेग हयुम शेख ,समीर हकीम ,भैया शिकलगार आयुब बागवान, वसीम शिकलगार ,पप्पू भाई मुल्ला व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

Image
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये 26/11 शहिद दिन व संविधान दिन अनुषंगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून संविधान दिना निमित्त शपथ घेणेत आली. यावेळी पुसेगाव पोलीस ठाणेचे  वतीने परिसरातील पारधी कुटुंबातील लहान मुलांना वही,अंकलिपी, पेन,पेन्सिल अशा शालेय वस्तूंचे व खाऊचे वाटप करण्यात आले  यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर पालकांनी मुलांना शाळेत पाठवून सक्षम बनवावे असे आव्हान पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी केले.

ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या वतीने मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती .

Image
ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या वतीने मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती . पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज बुधमध्ये ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या मार्फत मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण बाबतीत सुरक्षित राहण्यासाठी आपल्या अधिकाराबाबत माहिती, कौटुबिंक हिसांचार यासंदर्भात माहिती ग्रामपरिवर्तन संस्थेचे  सदस्य श्री प्रताप गोरे यानी जन जागृती केली . विद्यालयाचे प्राचार्य श्री टी .आर . फकीर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रकाश राजेघाटगे  उपस्थित होते. प्रताप गोरे व प्रकाश राजेघाटगे यांचे स्वागत केले . तसेच प्राचार्य फकीर सर यानी मनोगता मध्ये सांगितले की समाजातील घटकामधून लैंगिक शोषण , कौटुबिंक हिंसाचार यापासून जागृत होण्यासाठी शाषन  व सामाजिक संस्था यांच्या मार्फत विद्यार्थी प्रबोधन केले जाते. ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण हे सामाजिक बांधिलकी ठेऊन असे उपक्रम राबवित आहे त्याबद्दल कौतुक केले.अशा घटना घडू नये यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे तसेच अडचणीच्या वेळी रेड अलर्ट हेल्पलाईन 18...

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

Image
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये 26/11 शहिद दिन व संविधान दिन अनुषंगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून संविधान दिन शपथ घेणेत आली. त्याचबरोबर एक गाव एक गणपती व गणराया अवॉर्ड 2022 व दुर्गा उत्सव अवॉर्ड  मध्ये विविध गावांमध्ये गावांमधून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी व दुर्गा उत्सव यांना बक्षीस वितरण डॉ. ओंकार हिंदरे व पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांचे हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमास पोलीस कर्मचारी विविध गावचे पोलीस पाटील  व गणेश मंडळे ,नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुसेगाव पोलीस ठाणेचे  वतीने परिसरातील पारधी कुटुंबातील लहान मुलांना वही,अंकलिपी, पेन,पेन्सिल अशा शालेय वस्तूंचे वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले  यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर पालकांना मुलांना शिक्षण द्या व शाळेत पाठवा असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे म्हणाल...

मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती .

Image
मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती . पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज बुधमध्ये ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या मार्फत मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण बाबतीत सुरक्षित राहण्यासाठी आपल्या अधिकाराबाबत माहिती, कौटुबिंक हिसांचार यासंदर्भात माहिती ग्रामपरिवर्तन संस्थेचे  सदस्य श्री प्रताप गोरे यानी जन जागृती केली . विद्यालयाचे प्राचार्य श्री टी .आर . फकीर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रकाश राजेघाटगे  उपस्थित होते. प्रताप गोरे व प्रकाश राजेघाटगे यांचे स्वागत केले . तसेच प्राचार्य फकीर सर यानी मनोगता मध्ये सांगितले की समाजातील घटकामधून लैंगिक शोषण , कौटुबिंक हिंसाचार यापासून जागृत होण्यासाठी शाषन  व सामाजिक संस्था यांच्या मार्फत विद्यार्थी प्रबोधन केले जाते. ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण हे सामाजिक बांधिलकी ठेऊन असे उपक्रम राबवित आहे त्याबद्दल कौतुक केले अशा घटना घडू नये यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे तसेच अडचणीच्या वेळी रेड अलर्ट हेल्पलाईन 18004198588 यावर संपर्क साधावा किंवा पोलीस ...

सेवागिरीच्या जयघोषात पुसेगाव सुवर्णनगरी दुमदुमली.

Image
सेवागिरीच्या जयघोषात पुसेगाव सुवर्णनगरी दुमदुमली. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त ट्रस्टमार्फत साजरा होत असलेला अमृत महोत्सव सोहळ्यास सुरू झाला या कार्यक्रमाची शोभायात्रेने सुरुवात झाली सकाळी साडेअकरा वाजता सेवागिरी मंदिरात कोल्हापूर करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विद्यानृरसिंह भारतजी, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज ,ट्रस्टीचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव ,संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ सुरेश जाधव रणधीरशेठ जाधव ,व मान्यवरांच्या हस्ते पादुका आणि प्रतिमेचे विधिवत पूजन करून मंदिराच्या प्रांगणापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.  l

निढळ येथील शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू करण्याची मागणी.

Image
निढळ येथील शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू करण्याची मागणी.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. निढळ. ता .खटाव येथील ग्रामस्थांचे  महावितरण अधिकारी यांना निवेदन  निढळ व निढळ परिसरात शेती मध्ये पिकांना पाणी देण्याचे काम बळीराजा करत आहे .काही शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी कामगार लावले आहेत .विहरित पाणी असूनही केवळ वीज पुरवठा नियमित नसलेमुळे   विविध पिके पाण्या वाचून करपू लागली आहेत तर कामगारांना काम न करता सुद्धा शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत आहे. शेतात पाणी सोडले की शेतीपंपाची  वीज जात आहे .एकतर बळीराजा पुढे अनेक प्रश्न आहेत .पण पाणी असूनही केवळ वीज पुरवठा नसलेमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे .त्यामुळे शुक्रवारी निढळ ग्रामपंचायत समोर शेतकरी ग्रामस्थ जमा होऊन . पुसेगाव येथील महावितरणाच्या ऑफिसमध्ये आपल्या मागण्याचे   निवेदन दिले .तसेच थंडी चे दिवस असलेमुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली . पीक पाण्याला आले आहे त्याला पाण्याची गरज आहे अशा वेळी केवळ वीज बिल भरले नाही म्हणून सध्या तरी कोणत्याही शेतकऱ्यांची वीजपुरवठा तोडू नये अशी विनंती केली आह...

कोरेगाव नगरीचे आराध्यदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
कोरेगाव नगरीचे आराध्यदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  कोरेगांव नगरीचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा वार्षिक रथोत्सव आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी ज्योती ताई पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून रथोत्सवात सुरुवात करण्यात आली त्यावेळी उपस्थित प्रांत अधिकारी ज्योतीताई पाटील तहसीलदार अमोल कदम कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विजया घाडगे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष दिपाली बर्गे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवात सुरुवात करण्यात आली रथोत्सवास कोरेगाव नगरीच्या हजारो नागरिक उपस्थित होते. 

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव.

Image
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कलेढोण तालुका खटाव येथील तात्यासाहेब साळुंखे सामाजिक प्रतिष्ठान व हणमंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल (भाऊ) देसाई यांना समाजभूषण हणमंतराव साळुंखे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले नुकत्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे , माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मायणीगावचे सरपंच सचिन गुदगे ,माजी सभापती रघुनाथ घाडगे, अंकुशराव गोरे , मोहनराव देशमुख , खानापूरचे सभापती प्रल्हाद बागल , मानसिंगराव माळवे यांच्या प्रमुख उपस्थिती समाजभूषण हणमंतराव साळुंखे पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात अँड राजेंद्र साळुंखे ,संजयभाऊ साळुंखे, मिलिंद साळुंखे ,यांनी स्वागत केले प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर सयाजी पवार यांनी आभार मानले . या कार्यक्रमात सुरेशराव शिंदे, मोहनराव पाटील, राजेंद्र कणसे ,संजय टकले ,मजनू मुलानी, गुलमहमंद  शिकलगार, राजेंद्र नायकवडी, संतोष ढोकळे ,सयाजी पाटील, राजेंद्र लोखंडे, सानप सर यांच...

वर्णे गावातील येस ग्रुपचा करारशेती प्रयोग शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग ठरेल - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

Image
वर्णे गावातील येस ग्रुपचा करारशेती प्रयोग शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग ठरेल - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   शेतकऱ्यांना रास्तभावा पेक्षा जास्तभाव देण्याची करार शेती योजना येस ग्रुप ने तयार केली असून याच्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आहे असे प्रतिपादन संजय भगत यांनी वर्णे ता. सातारा येथे शेतकरी बैठकीत केले. वर्णे ता. सातारा येथे फुले राजमा, फुले वरून, सोयाबीन च्या करार शेतीच्या बियाणे  व औषधे वाटप प्रसंगी येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते यावेळी 'आमची माती आमची माणसं ' फेम मानसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे तंत्र अवगत झाले असून निघणाऱ्या शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते किंबहुना कमी दराने माल खरेदी करून दलालांच्याकडून शेतकऱ्याची लूट होते याच्यातून मार्ग काढण्यासाठी येस ग्रुपने जो करार शेतीचा पॅटर्न तयार केला आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे असेही संजय भगत म्हणाले ते पुढे म्हणाले शेतीमाल खरे...

त्रिपुटी येथे मी वडार महाराष्ट्राचा या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

Image
त्रिपुटी येथे मी वडार महाराष्ट्राचा या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.  कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला. त्रिपुटी तालुका कोरेगाव येथे मी वडार महाराष्ट्राचा  या शाखेचे उद्घाटन मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री प्रसाद फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री अनिल पिसाळ सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री विलास उर्फ पप्पू घाडगे तसेच कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री प्रसाद फडतरे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष श्री मल्लेश बनपट्टे व कोरेगाव तालुका संघटक विठ्ठल उर्फ माऊली वड्डर त्रिपुटी शाखा अध्यक्ष अक्षय चव्हाण उपाध्यक्ष अनिल देवकर कार्याध्यक्ष गणेश देवकर चंद्रकांत चव्हाण रमेश चव्हाण गणेश घोडके हनुमान चव्हाण गोविंद देवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुसेगाव येथे रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुसेगाव येथे रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पुसेगाव तालुका खटाव येथे छत्रपती शिवाजी चौकामध्ये  विविध पक्ष -संघटना, विविध गणेश मंडळ ,दुर्गा उत्सव  मंडळाचे अध्यक्ष सभासद यांचेवतीने एकत्रित रस्ता रोको जनआंदोलन करण्यात आले  सातारा -टेबुर्णी-लातुर (NH-548-E ) या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली 2/3वर्षे अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे यामुळे प्रत्येक गावच्या गावठाण हद्दीत नागरिकांना कच्च्या रोडच्या धुळीचा त्रास होवुन रस्त्याकडील दुकानदारांच्या दुकानांमध्ये  धूळ वस्तूंवर बसल्यामुळे त्या वस्तू खराब होत असून या धुळीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तसेच वारंवार वाहतुक कोंडी होवुन ग्रामस्थाना नाहक त्रास होत आहे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा RCC गटरचा प्रश्न प्रलंबित असुन पाऊसाचे पाणी रोडलगत नागरिकांच्या घरात कॉम्प्लेक्स- (मार्केट)मध्ये घुसुन व्यापारी व ग्रामस्थ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच दुतर्फा गटर अस्तित्वात नसलेने नागरीवस्तीतील सांडपाणी रोडनेच वाहत असलेने मोठ्या प्रमा...

चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहेे डॉ. सुरेशराव जाधव.

Image
चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहेे डॉ.  सुरेशराव जाधव.                            पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहय परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्याकरता श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने फाउंडेशन कोर्सेस लवकरच सुरु होणार आहेत . सदर कोर्सेस मधून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धांक चांगला असून त्यास योग्य दिशा व मार्गदर्शन दिल्यास अनेक चांगले अधिकारी  घडतील .याकरता संस्था प्रयत्नशील आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडू नयेत तसेच ध्येय पूर्ण होईपर्यत हार मानू नये " असे विचार राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संस्था सचिव डॉ श्री सुरेशराव जाधव यांनी श्री हनुमानगिरी    हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसेगाव येथील पालक शिक्षक सभेत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे प्रा . गणेश कुमठेकर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  म्हणाले " विद्यार्थ्यांनी परीक्षांचा आनंद घ्यावा . क्रमीक पुस्तकांचा अभ...

ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवी पतसंस्था निवड बिनविरोध.

Image
ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवी पतसंस्था निवड बिनविरोध. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवी पतसंस्था मर्यादित ल्हासुर्णे बँकेची पंचवार्षिक निवडणुक ही  सर्वांनुमते बिनविरोधच करण्यात आली श्री सुरेश रघुनाथ जाधव व व्हा चेअरमन पदी श्री सुनील जगन्नाथ सावंत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली .तसेच संचालक पदी भगवान कोंडीबा घाडगे, डॉ .नितीन हणमंत सावंत, विठ्ठल हरिबा गुरव ,निवृत्ती हणमंत घाडगे, अनिल बाळकृष्ण चव्हाण ,गौतम नामदेव इंगळे यांची निवड करण्यात आली .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा  शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ल्हासुर्णे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नूतन पतसंस्थेतील संचालकांचा तसेच विकास सेवा सोसायटीतील नूतन संचालकांचा सत्कार कोरेगाव तालुक्याचे आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला ल्हासुर्णे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रमेश उबाळे यांचा र...

खेळाच्या माध्यमातूनही करियर घडवता येते-रमेश उबाळे.

Image
खेळाच्या माध्यमातूनही करियर घडवता येते-रमेश उबाळे.  कोरेगाव/प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.  शिक्षणाबरोबर खेळाच्या माध्यमातून आपले करियर घडवून  देशाचे नाव मोठे करा असा संदेश जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी विद्यार्थ्यांना दिला बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने   सातारा येथील  मेरी इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी रमेश उबाळे बोलत होते.रमेश उबाळे पुढे म्हणाले,  केवळ शिक्षण घेऊन करियर घडत नाही शिक्षणाच्या जोडीला विद्यार्थ्यांनी खेळाला महत्व देऊन आपले करियर घडविले पाहिजे खेळाच्या माध्यमातून आपण आपल्याबरोबर देशाचाही नावलौकिक वाढवू शकतो.  आपल्या मातीतील  खेळाला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगून रमेश उबाळे पुढे म्हणाले,  कुस्ती,कबड्डी, खो-खो आदी आपले मैदानी खेळ आहेत हे खेळ आपण नेहमी खेळले पाहिजेत. कुस्ती सारख्या खेळात आपणास यश मिळाल्यास आपले व आपल्या देशाचे नाव संपूर्ण विश्वास चमकू शकते. असेही ते म्हणाले.यावेळी पाटण  तालुका राष्ट्रवादी सा...

कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धा.

Image
कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धा. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 10/11/2022 पासून सुरु होत असुन स्पर्धेचे ठिकाण डि.पी भोसले कौलेजच्या समोरील मैदान मध्ये होत असून उद्धाटन प्रसंगी निमंत्रित कोरेगाव येथील डी. वाय. एस. पी गणेशजी क्रिंदे साहेब यांच्या हस्ते उद्धाटन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली स्पर्धेचे प्रथम क्रमांक नगरसेवक  व युवा नेते संतोष बर्गे यांच्या तर्फे रुपये 25 हजार व  द्वितीय क्रमांक माजी प्रथम नगराध्यक्ष व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या तर्फे २० हजार रुपये तसेच तृतीय क्रमांक उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्याकडून रुपये 15 हजार तर चतुर्थ  क्रमांक अजित बर्गे अमोल बर्गे , व आपले शु मार्ट यांच्याकडून 10 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच विजेता संघास चषक ( ट्रॉपी ) नगरसेवक व युवा नेते प्रितम आनंदराव बर्गे यांच्याकडून देण्यात येणार आहे व Man of the Match चे 51 पारितोषिक हॉटेल अन्नपुर्णां व Man ...

ग्रामसभेकडे मलवडी तालुका फलटण येथील नागरिकांनी फिरवली पाठ.

Image
ग्रामसभेकडे मलवडी तालुका फलटण येथील नागरिकांनी फिरवली पाठ. सातारा 24 तास न्यूज  मलवडी प्रतिनिधी: शकील सय्यद. दिनांक 10 /11/ 2022 रोजी ग्रामपंचायत मलवडी तालुका फलटण यांनी विविध विषयांवरती ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु 90 टक्के नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित न राहणे हेच पसंत केले. नागरिक ग्रामसभेत उपस्थित न राहण्यास कारण म्हणजे पाठीमागील ग्रामसभा भरल्यानंतर सरपंच हे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत नाहीत. नागरिक प्रश्न विचारायला लागले असता ग्रामसभा संपली असे अचानक जाहीर करतात. ग्रामसभेमध्ये काही माहिती विचारली असता नागरिकांना माहिती मिळत नाही.  या कारणांमुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेस न जाणे हेच पसंत केले. सातारा 24 तास न्यूज प्रतिनिधी यांच्याशी बोलताना माजी सरपंच श्री कृष्णात तरडे, श्री रज्जाक सय्यद, अक्षय तरडे ,श्री भगवान तरडे, देवदास बागाव , हिम्मत सूळ, श्री रामभाऊ सुळ, श्री सर्जेराव तरडे, श्री पोपट तरडे तसेच ग्रामस्थ मलवडी यांनी या विषयांवरती प्रशासन लक्ष घालून सर्वसामान्यांना न्याय देणार का असा सवाल विचारला. 

तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा व निवृत्त शिक्षकांचा नेटका स्नेहमेळावा उत्साहात.

Image
तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली  पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा व निवृत्त शिक्षकांचा नेटका स्नेहमेळावा उत्साहात. सातारा 24 तास न्यूज  पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  ‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती' याप्रमाणे येथील सेवागिरी विद्यालयात चाळीस वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी दि. 6 रोजी आयोजित केला होता. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधीपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळय़ात 1981-1982 बॅचचे  विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठय़ा हीरारीने सहभागी झाले होते.   पुणे येथील संस्कृती प्रकाशनच्या संस्थापिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, आदर्श कामगार पुरस्कार विजेते सोमनाथ उर्फ राजेंद्र कोरे, सातारा येथील बांधकाम व्यावसायीक अनिल मुगुटराव जाधव, केतन काटकर, विठ्ठलराव तोडकर, संजय शंकर जाधव, जयश्री कदम, उषा क्षिरसागर, छाया कुंभार, राजेंद्र तारळकर, नामदेव जाधव, इत्यादी विद्यार्थी तसेच सेवाग...

उसात लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला.

Image
उसात लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला.  सातारा 24 तास न्यूज  अकबर भालदार.  पुसेगाव, ता. ८ : पुसेगावसह परिसरातील बहुतांश शेतशिवरात उसाच्या उभ्या पिकात वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारा मधोमध लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतापले आहेत.  सध्या उसाचे पीक तोडणीस आल्याने उसाची पाने वाळू लागली आहेत. बहुतांश शेतात मधोमध लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा उसाच्या उभ्या पिकाला टेकल्या आहेत. त्यामुळे वादळ-वाऱ्यात तारांच्या घर्षणाने वाळलेल्या पाचटीला आग लागून उसाचे फड जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.  वीज वितरण कंपनीची येथील वीज वितरण व्यवस्था अनेक वर्षांची जुनाट आहे. वारे, पाऊस यामुळे शेतातील अनेक ठिकाणचे खांब कललेले आहेत. शिवाय जीर्ण झालेले विद्युत खांबही तुटून पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वीज वाहक तारांचे आयुष्...

सोमनाथ कोरेंना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार.

Image
सोमनाथ कोरेंना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार. सातारा 24 तास न्यूज.  नितिन घोरपडे.  साप्ताहिक पिंपरी चिंचवड पवनेचा प्रवाह व पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पुणे यांच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सोमनाथ कोरे यांना पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योगपती  रामदास माने, कामगार नेते नगरसेवक यशवंत भोसले, ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.सोमनाथ कोरे हे खटाव तालुक्यातील पुसेगावचे रहिवाशी असून सध्या पिंपरी पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीत काम करत आहेत. तसेच सांगवीतील सातारा मित्र मंडळाचे ते विद्यमान खजिनदार आहेत. त्यांचे सामाजिक काम हे उलेखनिय असून सातारा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. याबाबत अनेक संस्थांनी त्याना पुरस्कृत केले असून त्याना यापूर्वी सन 2014 साली महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे.   यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के...

‘स्वराज्य’ शिक्षक संघाचा सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा.

Image
पुसेगाव सभासद परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देताना चंद्रकांत जाधव व सभासद. ‘स्वराज्य’ शिक्षक संघाचा सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा. सातारा 24 तास न्यूज.  अकबर भालदार.  पुसेगाव, ता. ११ : सभासदांना कायमच गृहीत धरणं आणि प्रत्येक वेळी सभासदांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणं, असा निष्क्रीय कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या या निवडणुकीत ‘सभासद परिवर्तन पॅनेल’ स्थापन होऊन सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. आत्तपर्यंत सभासदांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ‘परिवर्तन’ पॅनेलच्या या प्रयत्नांना स्वराज्य शिक्षक संघाचा (आश्रमशाळा विभाग) जाहीर पाठिंबा असल्याची महिती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.पुसेगाव येथे आयोजित शिक्षक समिती आणि स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे राज्याचे अध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान, शिवरायांची प्रेरणा घेत सभासद परिवर्तन पॅनेल बँकेचा कार...

युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर.

Image
युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.   पिंपोडे बुद्रूक ता कोरेगाव येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व सर्कलवाडी येथील रणजीत बागडे  यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपोडे बुद्रुक येथे मंगळवार दिं 8,नोव्हेंबर,रोजी, सकाळी ९. वाजता  स्थळ. ग्रामीण रूग्णालय पिंपोडे बुद्रक येथे  छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महिती अधिकार कार्यकर्ते महासंघ,व आर्ट आँफ लिव्हिंग परिवार सर्कलवाडी याच्या संयुक्त विद्यामाने वतीने भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांचे वतीने प्रत्येक  रक्तदात्यास पाण्याचा जार भेट देण्यात आले.त्यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.त्यावेळी उपस्थित पिंपोडे ग्रामीण रुग्णालयातील डॉ सुर्यकांत बा...

येस ग्रुप करार शेतीच्या माध्यमातून सोयाबीनला देणार 8100 रुपये दर :- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

Image
येस ग्रुप करार शेतीच्या माध्यमातून सोयाबीनला देणार  8100 रुपये दर :- येस ग्रुप संस्थापक संजय भगत. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. शेतीमालाला  काय दर मिळेल याची होमी नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन कर्जबाजारी होत आहे म्हणूनच येस ग्रुपच्या करार शेतीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी रास्ता नव्हे जास्त दर मिळवून घ्यावा असे  अवाहन  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी बोंबाळे ता. खटाव  येथे केले.बोंबाळे ता खटाव  येथे करार शेती बाबत  आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती नाना पुजारी हे होते यावेळी राजेंद्र निंबाळकर, धनाजी निंबाळकर, अमृत निंबाळकर, मारुती फडतरे ,अविनाश निंबाळकर, गजानन घोरपडे ,अतुल देशमुख, तानाजी कुदळे प्रमुख उपस्थिती होती       शेतकरी उत्पादन वाढवण्यात सक्षम झाला मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य व अपेक्षित दर  मिळत नाही यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे याचा विचार करून करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुप व मदर...

खातगुण येथील लोकवस्ती मधील मोबाईल टॉवर बंद करा:- वंचित बहुजन आघाडीचं तहसीलदार साहेब यांना निवेदन.

Image
खातगुण येथील लोकवस्ती मधील मोबाईल टॉवर बंद करा:- वंचित बहुजन आघाडीचं तहसीलदार साहेब यांना  निवेदन. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. खटाव तालुक्यातील खातगुण येथील गट नं ५९ मध्ये भरवस्ती मध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे.संबंधित लोकवस्ती पासून सुमारे ३०फुटांवर हा टॉवर आहे.येथील रहिवासी प्रवीण यादव व ग्रामस्थांनी सण २०१९-२० पासून हा टॉवर लोकवस्ती पासून दूर लावावा,असं निवेदन ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिलं होतं. मात्र त्या निवेदनाची दखल न घेता,उलट तो टॉवर नियमानुसार असल्याचं महसूल विभागाने सांगितले आहे. भरवस्ती मध्ये असणाऱ्या या टॉवर मुळे सभोवताली असलेल्या मनुष्य, पाळीव पशु पक्षी यांना रेडिएशनचा धोका निर्माण होणार आहे. तरी हा टॉवर इतर ठिकाणी हलवावा,अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष साजिद मुल्ला,दादासाहेब कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी वंचित बहुजन चे जिल्हा अध्यक्ष भीमराव घोरपडे,अरविंद आढाव,आनंदराव निकाळजे,विश्वास जगताप, सचिन यादव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री सेवगिरी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार.

Image
श्री सेवगिरी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. सातारा 24 तास न्यूज.  अकबर भालदार.  पुसेगाव, ता. ६ : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त डिसेंबर २०२२ मध्ये पार पडणाऱ्या वार्षिक यात्रेतील सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचा एकमुखी निर्धार श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला. श्री सेवागिरी मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्त निवास हॉल येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सरपंच विजय मसणे, माजी चेअरमन ॲड. विजयराव जाधव, सुनीलशेठ जाधव, शिवाजीराव जाधव, जगनशेठ जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला फार मोठी चांगली परंपरा आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात्रा बंद होत्या. मात्र या वर्षीच्या यात्रेला भाविकांची गर्दी होणार आहे. यात्रेतील सर्व कार्यक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू असे मत विश्वस्त डॉ...

पत्रकार अनिल गायकवाड यांचे निधन.

Image
          पत्रकार अनिल गायकवाड यांचे निधन. पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  पुसेगाव ता खटाव येथील जेष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त शिक्षक अनिल गायकवाड यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा व मुलगी,भाऊ  असा परिवार आहे.गेले ३२ वर्षे त्यांनी दै ऐक्य, केसरी,तरुण भारत,,लोकमत,मुक्तगिरी ,पुण्यनगरी,ग्रामोद्धार अशा विविध दैनिकात पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी पुसेगाव येथे जिज्ञासा क्लासेस च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला व येथील  श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुसेगाव, जांब,जाखणगाव रणसिंगवाडी येथील शाखेत गणिताचे शिक्षक म्हणून सेवा केली.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते.ते उत्कृष्ट क्रिकेट बॉलर म्हणूनही ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र रविवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी खटाव तालुक्यातील विवि...

चंदन वंदन( बनवडी) यात्रे निमित्त ज्यादा बस सोडाव्या : इरफान जमादार.

Image
चंदन वंदन( बनवडी) यात्रे निमित्त ज्यादा बस सोडाव्या : इरफान जमादार. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. बनवडी तालुका कोरगाव येथील हजरत पीर दस्तगीर दर्गाहमध्ये होणाऱ्या 6 ते 7 नोव्हेंबर या काळात संदल व ऊरुसाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जिल्ह्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात कोरोना च्या पश्चात तब्बल 3 वर्षानी मोठ्या प्रमाणावर उरुस साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह असल्याने दिनीक 6 रोजी व दिनांक रोजी उरुस असल्याने हजारो भाविक उरुसासाठी बनवडी या गावात येत असतात तरी त्या निमित्ताने कोरेगाव येथील आगार प्रमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगाव शहर अल्पसंख्यांक विभागचे कोरेगाव शहर अध्यक्ष इरफान जमादार यांनी निवेदनाद्वारे ज्यादा बसेस सोडून येणाऱ्या भाविकांची सोय करण्यात यावी अशी विनंती केली त्यावेळी उपस्थित राष्ट्वादी अल्पसंख्याक सेलचे कोरेशीव शहर अध्यक्ष ईरफान जमादार व अल्पसंख्याक सेलचे कोरेगाव उपाध्यक्ष राजू मुल्ला खजिनदार वसीम शिकलगार सचीव राजू बेग , दस्तगीर सय्यद , अबु बागवान , अफजल कुरेशी मोसीन शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त व यात्रा प्रदर्शनाच्या नियोजना बद्दल रविवारी ग्रामसभेचे आयोजन.

Image
सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त व यात्रा प्रदर्शनाच्या नियोजना बद्दल रविवारी ग्रामसभेचे आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव मधील श्री सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्यस्मरण निमित्त यात्रा प्रदर्शन डिसेंबर 2022 मध्ये येत आहे सदरची यात्रा प्रदर्शनाच्या नियोजनाविषयी व कमिट्या स्थापन करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 6. 11 .2022 रोजी सकाळी दहा वाजता सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प .पू नारायणगिरी महाराज भक्त निवास हॉल येथे ग्रामसभेचे आयोजन केले आहे तरी पुसेगाव परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या सभेसाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सेवागिरी देवस्थान  ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

मैत्रीचे स्नेहसंमेलन म्हणजे मैत्रीचा आनंदोत्सव. मा. विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब .

Image
मैत्रीचे स्नेहसंमेलन म्हणजे मैत्रीचा आनंदोत्सव.   मा. विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब . पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात पण शाळे मध्ये जे आपले मित्र असतात त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. या मैत्रीचे संमेलन  म्हणजे एक आनंदोत्सव. असे दळवी साहेब म्हणाले ते  निढळ तालुका खटाव येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वेळेत बोलत होते.  मी निढळ च्या शाळेत  शिकलो आणि  विभागीय आयुक्त पदा पर्यंत पोचलो .त्यामुळे ग्रामीण भागातील शाळे मध्ये  शिक्षण घेणारा तीव्र इच्छा असेल तर मोठ्या पदावर पोहचू शकतो. असे निढळ येथे सन 1995/96 च्या दहावी च्या बॅच  च्या स्नेह संमेलन कार्यक्रमात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले .पुढे ते म्हणाले मी वयाच्या 24 वर्षा पासून निढळ च्या विकासासाठी काम करत आहे .सध्या सत्व फाउंडेशन च्या माध्यमातून  इतर गाव सुध्दा विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपल्या वर ऋण असते  त्यामुळे  माजी विद्यार्थी  यांनी आपल्या शाळे  च्या विक...

पुसेगाव बुध रस्त्यावर दु-चाकी ची समोरासमोर धडक एक ठार तीन जखमी.

Image
पुसेगाव बुध रस्त्यावर दु-चाकी ची समोरासमोर धडक एक ठार तीन जखमी.     पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव बुध रोड पेट्रोल  पंपा नजीक समोरासमोर झालेल्या  दुचाकी अपघातामध्ये एक जण ठार तर तीन  जण जखमी झाले असून या अपघाताची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झालेली आहे. सदर या अपघाताची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशन मधून मिळालेली अशी काल सायंकाळी साडेसहा वाजता पुसेगाव ते बुध रोडवर पेट्रोल पंपा पासून थोड्या अंतरावर प्लेटिना कंपनीची दुचाकी गाडी क्रमांक एम एच 11 ए एच  93 20 यावरील तीन जण स्वार असलेले हे भरधाव वेगाने उतारावरून चालले होते त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून प्रमोद विश्वनाथ रणपिसे वय 49 वर्ष राहणार पुसेगाव हे त्याचे ताब्यातील गाडी हिरो होंडा क्रमांक एम एच 11 क्यू 29 32 पूर्व बाजूने शेतातील रस्त्यावरून रस्त्याचे साईड पट्टीवरून पुसेगाव बाजूकडे जात असताना त्यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून मृत्यूस तसेच दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून प्लॅटिना क्रमांक एम एच 11 ए एच 93 20 यावरील चालका  विरुद्ध फिर्यादी सयाजी विश्वनाथ र...

सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा:-युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी.

Image
सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा:-युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी. सातारा 24 तास न्यूज.  नितीन घोरपडे.  विसापूर तालुका खटाव येथील शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांनी विसापूर व खातगुण हद्दीवर महारकी शिवारातील किमान दोन एकरातील काढलेले सोयाबीन गंज लावून मळणीसाठी ठेवले होते ते सोयाबीन अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले त्याचा शोध पोलिसांनी घेऊन अशा प्रवृत्तीला आळा घालावा असे विसापूर येथील युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी मागणी केली आहे.  यावेळी हरिश्चंद्र सावंत (चाचा), व श्रीरंग (आबा)साळुंखे यांनी  महारकी शिवारात जाऊन शेतीमधील जळीत पिकाची पाहणी केली व आमदार महेश शिंदे यांना फोन करून ही घटना सांगितली यानंतर आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांचे सात्वन केले व आम्ही या दुःखात सामील असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सूचना  केल्या आहेत असे सांगितले यावेळी हरिश्चंद्र सावंत यांनी मी व माझ्या पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असे सांगितले व या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पंचनामा त्वरित...