उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिस्कळ गावचे सुपुत्र शामराव मदने समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिस्कळ गावचे सुपुत्र शामराव मदने समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
डिस्कळ गावचे सुपुत्र ,जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जय मल्हार संघटनेचे च्या वतीने भिवडी ता पुरंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , भटके विमुक्त जाती जमाती मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते आमदार गोपीचंद पडळकर व संघटनेचे संस्थापक दौलत उमाजी शितोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कोअर कमेटी अध्यक्ष रामदास धनवटे,अंकुशराव जाधव, रोहिल मद्ने हनुमंत भांडवलकर, प्रविण नाईक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment