Posts

Showing posts from February, 2024

विसापूर येथील शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे शौर्य चक्र पदक सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द.

Image
विसापूर येथील शहीद  सुभेदार श्रीरंग सावंत  यांचे शौर्य चक्र पदक  सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. विसापूर .ता. खटाव येथील स्व.सुबेदार श्रीरंग तात्याबा सावंत, शौर्य चक्र,  ( 269  ER ) बॉम्बे इंजिनीअर ग्रुप ( पुणे ) मूळ गाव. विसापूर. ता. खटाव. जि. सातारा. यांना भारताच्या राष्ट्रपतीकडुन मानाचे शौर्य चक्र पदक मिळाले होते.  त्यांनी भारतीय सेनेत कार्यरत असताना जिल्हा कोटा राजस्थान येथे जुलै 1986 अतिवृष्टी पाऊस आणि पूरग्रस्त जनतेला वाचवून सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी सैनिकी मदत कार्यात उल्लेखनीय साहस करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.  भारताच्या राष्ट्रपतीनी त्यांना एप्रिल 1988 मध्ये मरणोपरांत "शौर्य चक्र " बहाल करून गौरव केला. महाराष्ट्र सरकारने मे 1990 मध्ये " त्याना  महाराष्ट्र गौरव पुरस्कार " देऊन सन्मानित केले. 31 जानेवारी रोजी तेच शौर्य चक्र पदक ( मेडल ) भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे COAS  आणि  बॉम्बे इंजिनीअर ग्रुप चे कर्नल कमाडंट यांच्याकडे शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे...

माळशिरस येथील विध्यार्थ्यांचे गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश.

Image
माळशिरस येथील विध्यार्थ्यांचे गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश. माळशिरस प्रतिनिधी, अमर वाघेला  किंग फायटर कराटे क्लब माळशिरस येथील विद्यार्थ्यांचे गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन केले.शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित अकरावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा मापसा गोवा येथे पार पडली या स्पर्धेत किंग फायटर कराटे क्लब च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामध्ये. आर्यन केंगार सुवर्णपदक, राजवीर वाघेला सुवर्णपदक ,शाहिद गुंडेवाडेकर सुवर्णपदक, कु.खुशी पवार सुवर्णपदक, मंथन भोसले सिल्वर मेडल, धनराज पवार सिल्वर मेडल, यथार्थ गुजरे सिल्वर मेडल, कु. ईश्वरी सिद सिल्वर मेडल, या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने माढा मतदारसंघाचे खासदार मा. श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व खेळाडू प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना मास्टर सुहास सिद सर यांनी अभिनंदन केले मार्गदर्शक प्रशिक्षक सचिन केंगार व विद्या केंगार मॅडम हे लाभले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहरअध्यक्षपदी प्रमोद सुभाषराव निंबाळकर यांची निवड.

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहरअध्यक्षपदी प्रमोद सुभाषराव निंबाळकर यांची निवड. फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने नुकत्याच फलटण तालुक्याच्या निवडी जाहीर करण्यात आली तालुकाध्यक्षपदी जयकुमार इंगळे व शहराध्यक्षपदी प्रमोद अण्णा निंबाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडीचे पत्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी सभापती,विधान परिषद,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.यावेळी दत्ता अनपट, राहुलभैय्या निंबाळकर, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, महादेव माने,फिरोज बागवान,अमोल भोईटे,तुषार नाईक निंबाळकर, राजेंद्र कापसे ,बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवारी ना. महेश शिंदे यांचा नागरी सत्कार; विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण.

Image
कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवारी ना. महेश शिंदे यांचा नागरी सत्कार; विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण. कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. कोरेगाव शहर तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी भूषणावह अशा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन आमदार महेश शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल समस्त कोरेगावकर नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरासमोर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊमधील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण ना. महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व माजी उपसरपंच तथा विद्यमान नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली.ना.महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची सूत्रे हाती घेतल्यापासून कोरेगाव शहराचा पूर्णपणे विकासाभिमुख कायापालट झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ठोस आणि दर्जेदार विकासकाम झाले असून ट्री...

रेवलकरवाडी येथे प्राथमिक शाळेच्या बाल बाजारात ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद.

Image
रेवलकरवाडी येथे प्राथमिक शाळेच्या बाल बाजारात ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. रेवलकरवाडी. ता .खटाव येथे जिल्हा प्राथमिक शाळेचा बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीमती प्रतिभा भराडे गटशिक्षणअधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सावंत ,उपसरपंच महादेव लोंढे ,विस्तार अधिकारी संगीता गायकवाड ,विस्तार अधिकारी सोनाली विभुते , शिवाजी जाधव केंद्रप्रमुख, केंद्र समूह जाखणगावचे तानाजी जगदाळे, रेवलकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गोरे, उपशिक्षक प्रकाश पवार, उपशिक्षक सागर कांबळे, विजय  बिटले ,संजीत मोरे ,सचिन फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या बाल बाजाराला विविध मंडळांचे पदाधिकारी, क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती, महिला, पालक यांनी या बाल बाजाराचा आनंद घेत मोठी उत्साहात खरेदी केली या बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळभाज्या ,विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभे केले होते गावातील सर्व लोकांनी या बाल बाजाराला भेट देऊन भरपूर खरेदीचा आनंद लुटला याबद्दल मुख्याध्यापक श्री हरिचंद्र गोरे य...

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहणार : अध्यक्ष फिरोजभाई बागवान, कोरेगाव येथे अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद यशस्वी.

Image
मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहणार : अध्यक्ष फिरोजभाई बागवान, कोरेगाव येथे अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद यशस्वी. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक विकास परिषद कार्यरत राहील. समाज बांधवांचे सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांशी समन्वय साधून निर्णय घेतले जातील. एकूणच मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष फिरोजभाई शफिक बागवान यांनी दिली. कोरेगावच्या मार्केट यार्डमधील गीताई मंगल कार्यालयात अल्पसंख्यांक विकास परिषदेची पहिली परिषद शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी फिरोजभाई शफिक बागवान यांची तर खजिनदारपदी इरफानभाई उर्फ बबलूभाई सलीम जमादार यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर समाज बांधव व परिषदेच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना बागवान बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी शाहरुख शेख,  परिषदेचे सचिव मोहसीन रमजान कागदी यावेळी उपस्थित होते. दि...