Posts

फलटण पासून 60 कि.मी.परीघातील सर्व वाहनांना टोल पास लागू करण्याबाबत ऑड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी.

Image
फलटण पासून 60 कि.मी.परीघातील सर्व वाहनांना टोल पास लागू करण्याबाबत ऑड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. “फलटण एस.टी. स्टँडपासून ६० कि.मी. परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील सर्व वाहनांना विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.                       फलटण हे सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. फलटण शहर हे विविध दिशांनी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.फलटण शहरातून किंवा फलटण तालुक्यातून—. १). फलटण–पंढरपूर(राजुरी २०- २५ कि.मी.), २). फलटण–पुणे/जेजुरी(५०-६०),  ३). फलटण–इंदापूर/बारामती -काठेवाडी पुढे (३५-४० कि.मी. काम चालू आहे), ४) फलटण–दहिवडी (मोगराळे २० कि.मि. काम चालू आहे),  ५) फलटण–लोणंद–शिरवळ,(ठिकाण अद्याप निश्चित नाही)… अशा विविध दिशांनी रस्ते विकसित होत आहेत.          ...

महिलांसाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन

Image
महिलांसाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. गणेशोत्सवानिमित्त पुसेगावमध्ये महिलांसाठी ‘गौरी गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव व पंचायत समिती सदस्या स्नेहल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकास फ्रिज, द्वितीय क्रमांकास टीव्ही, तृतीय क्रमांकास वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकास वॉटर प्युरिफायर आणि पाचव्या क्रमांकास मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२६ असून, पुसेगावातील विविध वॉर्डनिहाय संपर्क क्रमांकांवर नोंदणी करता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.गणेशोत्सवातील महिलांचा सहभाग वाढविणे तसेच पारंपरिक गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चौकट :  गौरी-गणपती सजावटीतून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ गणेशोत्सव हा आपल्या...

फलटण येथे वेफ्लेवर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशन ची माहिती व प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

Image
फलटण येथे वेफ्लेवर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशन ची माहिती व प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण येथील फलटण तालुका ग्राम विकास अधिकारी भवन लक्ष्मी नगर येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशनची माहिती व प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये फाउंडेशनची उद्दिष्टे, कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम तसेच आगामी काळातील नियोजन याबाबत उपस्थितांना सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष माननीय श्री. सचिन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे कार्य फलटण तालुक्यात अधिक जोमाने व प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फलटण तालुका महिला अध्यक्ष, विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख यांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. फलटण तालुक्यात फाउंडेशनचे कार्य प्रथमच सुरू होत असल्याने जिल्हाध्यक्ष श्री. सचिन साबळे यांनी उपस्थित महिला व पदाधिकाऱ्यांना फाउंडेशनच्या कार्याची सखोल माहिती देत समाजातील विविध घटकांपर्यंत फाउंडेशनचे कार्य...

उंबरमळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार सुरु ग्रामस्थांनी याचा फायदा घ्यावा युवा नेते नवनाथ वलेकर.

Image
उंबरमळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार सुरु ग्रामस्थांनी  याचा फायदा घ्यावा  युवा नेते नवनाथ वलेकर.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. उंबरमळे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील पाण्याच्या टाकीजवळ आठवडी बाजाराची  बुधवारी सुरवात झाली. यामुळे येथील व पंचक्रोशी मधील ग्रामस्थांना ताजा भाजीपाला  उपलब्ध होणार आहे. येथील शेतकऱ्यांना जवळची बाजार पेठ उपलब्ध होणार आहे. येथे आठवडी बाजार व्हावा ही येथील शेतकऱ्यांची अनेक वर्ष मागणी होती.सरपंच .संतोष वलेकर यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले.  माजी सरपंच अध्यक्ष खटाव तालुका भाजपा नवनाथ वलेकर, ग्रामपंचायत सदस्य, बाबुराव इनामदार, शिवाजी गोरे, बाबासो लावंड, विठ्ठल पाटोळे, धनाजी पाटोळे, संभाजी वलेकर, विठ्ठल वलेकर, रमेश कदम व पंचक्रोशीतील व्यापारी मंडळी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी या आठवडी बाजाराबद्दल गावातील आणि पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी, व्यापार बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन नवनाथ  वलेकर यांनी केले. गावातील वयस्कर लोकांना पुसेगावला जाण्यापेक्षा गावामध्ये बाजार केला खऱ्या अर्थाने त्यांना ...

बिबट्याच्या नावाने अफवा पसरवाल तर थेट जेलची हवा! वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा.

Image
बिबट्याच्या नावाने अफवा पसरवाल तर थेट जेलची हवा! वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा. फलटण प्रतिनिधी:जुबेर कोतवाल. सध्या AI च्या माध्यमातून बनावट फोटो तसेच व्हिडिओ करून व्हायरल करण्यात येत आहे फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की AI किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचे बनावट फोटो एडिट करून सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. तसेच बिबट्याबाबत अफवा पसरवणे, खोटी माहिती प्रसारित करणे किंवा नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा व्हिडिओ शेअर करू नयेत. वनविभागाच्या माहितीनुसार, अशा प्रकारची कृत्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार प्रतिबंधित असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संबंधित व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कारावास तसेच १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी सत्यता तपासा ! बिबट्या दिसल्याची किंवा हल्ल्याची माहिती मिळाल्यास नागरिक...

सपोनी नागनाथ खुणे यांच्या तत्परतेमुळे मनोरुग्ण पुढील उपचारासाठी यशोधन ट्रस्टीकडे सुपूर्त.

Image
सपोनी नागनाथ खुणे यांच्या तत्परतेमुळे  मनोरुग्ण पुढील उपचारासाठी  यशोधन ट्रस्टीकडे सुपूर्त.  पुसेगाव प्रतिनिधी  पंकज कदम. पुसेगाव ता. खटाव जि.सातारा येथील भवानीनगर परिसरात काही महिन्यांपासून फिरणाऱ्या एका बेवारस आणि निराधार मनोरुग्णाला पुसेगाव पोलिस,व सामाजिक संस्थेच्या मदतीने सुरक्षित आश्रय मिळवून दिला. मागील अनेक दिवसापासून मनोरुग्ण फिरत असल्याची माहिती सपोनी  नागनाथ खुणे  यांना मिळताच वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली मी तात्काळ आपली टीम रावणा करत सदरच्या व्यक्तीचा शोध घेतला. मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याची ओळख पटवण्यात अडचण येत होती.त्यामुळे पोलिसांनी 'युवा संकल्प सोशल फाउंडेशन'चे अध्यक्ष योगेश जाधव आणि 'सदिच्छा सोशल फाउंडेशन'चे डॉ. संतोष मोरे यांच्याशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीची स्वच्छता करून त्याला पुसेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले.यानंतर सातारा पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेने, या रुग्णाला पुढील उपचारासाठी वाई येथील श्री. रवी बोडके यांच्या 'यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट'मध्ये सुपूर्द करण्यात आले. या संवेदनशील...

पुसेगावमध्ये रस्त्यासाठी कडकडीत बंद ! मुख्य बाजारपेठेतूनच मार्ग हवा ; तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

Image
पुसेगावमध्ये रस्त्यासाठी कडकडीत बंद ! मुख्य बाजारपेठेतूनच मार्ग हवा ; तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुसेगांव प्रतिनिधी,पंकज कदम. पुसेगाव, ता. खटाव येथील प्रस्तावित रस्ता बाह्यवळणाने न नेहता मुख्य बाजारपेठेतूनच जावा, या मागणीसाठी पुसेगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलन केले. या आंदोलनाला सर्व पक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. मुख्य बाजारपेठेतून रस्ता व्हावा, या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा बंद व विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने यावेळी ग्रामस्थ व व्यापारी आक्रमक झाले. यावेळी उपस्थितांनी “मुख्य बाजारपेठेतूनच रस्ता झाला पाहिजे”, अशी ठाम भूमिका मांडत प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. या रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा निघाला नाही, तर यापुढील काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला. पुसेगाव पोलीस ठाणयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव नागनाथ खुणे यांनी सातारा मुख्यालयातुन पोलीस फौज मागवून...