Posts

Showing posts from December, 2025

इंग्रजांना सुळोकी पळो करणाऱ्या क्रांतिकारी गावातून सख्खे भाऊ अथर्व नौदलात तर शंभूराज हवाई दलात बनले अधिकारी.

Image
इंग्रजांना सुळोकी पळो करणाऱ्या क्रांतिकारी गावातून   सख्खे भाऊ अथर्व नौदलात तर शंभूराज हवाई दलात बनले अधिकारी.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.  बुध. तालुका खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेले प्रकाश प्रल्हादराव  राजेघाटगे यांची अथर्व व शंभूराज ही दोन्ही मुले भारताच्या सैन्य दलात एअरमनपदी रुजू झाल्याने तरुणांसमोर एक वेगळा आदर्श उभा राहिला आहे. एकीकडे उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या नोकरीच्या शोधात भरकटणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असतानाच बुध गावच्या राजेघाटगे बंधूंनी मात्र आपल्या प्रचंड आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा  व जिद्दीच्या जोरावर आपल्या जीवनाचे स्वप्न अल्पावधीतच प्रत्यक्षात उतरवले आहे. योग्य दिशा, ध्येयनिश्चिती आणि त्यानुसार वाटचाल करण्याचे सातत्य असल्यावर आपल्याला ध्येय हमखास गाठता येतं, याचा वस्तूपाठच या दोन्हीही बंधूनी तरुणांसमोर निर्माण केला आहे.थोरला बंधू असलेला अथर्व प्रकाश घाटगे हा जून 2023 मध्ये भारतीय नौदलात एअरमन म्हणून दाखल झाला. सध्या तो विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असून त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शंभुराज प्रकाश राजेघाट...

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

Image
k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या परमपूज्य श्री.सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा मौजे पुसेगाव ता.खटाव जि.सातारा येथे दिनांक14/12/2025 रोजीपासून मोठया उत्साहात सुरुआहे.यात्रा शांततेत सुरु असतानाच k M कंपाणीच्या नावाने खटाव भागातील व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचाअनाधिकृतग्रुप तयार करुन गुन्हे करणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बचाराम मदने वय 21 वर्षे,रा.भवानी टेकखटाव ता.खटाव जि.सातारा यानेदिनांक22/12/2025 रोजी पुसेगाव यात्रेनिमीत्त शासकीयविदयानिकेतन जवळ यात्रा मैदानावर भरवलेल्या श्वान शर्यतीचे ठिकाणी त्याच्याग्रुप मधील गुन्हेगारांना पुसेगावात बोलावून घेतले.करण मदने व त्याचे साथीदार रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतिश जाधव सर्व रा.नवलेवाडी पोस्ट मलवडी ता.माण जि.सातारा तसेच शुभम शशिकांत जाधव रा.सिध्देश्वरकुरोली ता.खटावजि.सातारा वगैरे इसमग्रुप तयार करुन पुसेगाव यात्रा मैदानावर श्वानशर्यतठिकाणी आले होते. दिनांक 22/12/2025 रोजीचे दुपारी 3...

कोरेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; आमदार महेश शिंदेंची ग्वाही.

Image
कोरेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; आमदार महेश शिंदेंची ग्वाही. कोरेगाव | प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साहेब यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरात उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज खटाव येथील आमदार निवासस्थानी देण्यात आले. या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील, अशी ठाम ग्वाही दिली.निवेदन देण्यासाठी सुरेश बोतालजी, गोरख बोतालजी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश शिंदे साहेब म्हणाले, “आजअखेर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कोणताही अधिकृत प्रस्ताव माझ्याकडे आलेला नव्हता. त्यामुळे हा विषय आता माझ्यासाठी प्रथमच प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर आला आहे. मात्र, यापुढे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न १०० टक्के केले जातील.”ते पुढे म्हणाले की, कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. यासाठी योग्य त्या जागेची स्वतः पाहणी केली जाईल आणि सर्व संबंधित शासकीय ...

श्री.सेवागिरी महाराज पुण्यस्मरण निमित्त युवा महोत्सवाचे आयोजन.

Image
श्री.सेवागिरी महाराज पुण्यस्मरण निमित्त युवा महोत्सवाचे आयोजन.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  प.पू. ची श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक 20.12. 2025 रोजी सकाळी9.30 वाजता 12 व्या श्री सेवागिरी खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सातारा जिल्ह्यातील युवक युवती व शोकीकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवागिरी ट्रस्टीमार्फत करण्यात आले आहे.  या महोत्सवात लोकनृत्य,रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य  सुगम गायन, समुह गीत  याचे स्पर्धकांनी आयोजन करायचे आहे योग्य त्या विजयी गटाला बक्षीस,प्रमाणपत्र व चषक देण्यात येणारा आहे.या महोत्सवामध्ये नियम व अटी सेवागिरी ट्रस्टीने दिलेल्या नियमानुसार अटी बंधनकारक राहणार आहेत.युवा महोत्सव हे सेवागिरी कृषी प्रदर्शन स्टेज, पुसेगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये  भाग घ्यावा.  प्राध्यापक डॉ.संजय क्षीरसागर सचिव युवा महोत्सव कमिटी 94 23 80 44 61 , प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप उपप्राचार्य 94 23 80 44 51,  जे.बी.जा...

मंदार विश्वनाथ सूर्यवंशी याची महाराष्ट्र राखीव पोलीस दल ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.

Image
मंदार विश्वनाथ सूर्यवंशी याची महाराष्ट्र राखीव पोलीस दल ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. सोनवडी प्रतिनिधी,नाशिर शेख. मंदार विश्वनाथ सूर्यवंशी हा पोलीस दलाचे नऊ महिनेचे ट्रेनिंग पूर्ण करूनगावी प्रतलेने आजच सोनवडी येथे त्याचे स्वागत करण्यात आले.त्याच्या स्वागतासाठी त्याच्या पालकांनी डीजे लावून त्याची सोनवडी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.त्याचप्रमाणे श्री विश्वनाथ सूर्यवंशी त्याची आई वर्षा यांनी व त्यांच्या घरातील सर्व महिलांनी ओवाळणी करून त्याचे स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री.प्रकाश सूर्यवंशी. विश्वनाथ सूर्यवंशी.सर्व घरातील मंडळी सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.

सेवागिरी यात्रेनिमित्त वाहतूक रस्त्यामध्ये बदल वाहतुकीचे नियम पाळण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांचे आवाहन.

Image
सेवागिरी यात्रेनिमित्त वाहतूक रस्त्यामध्ये बदल वाहतुकीचे नियम पाळण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांचे आवाहन.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  पुसेगाव ता. खटाव येथे प पू श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि.१४ डिसेंबर ते दि. २४ या कालावधीत सलग अकरा दिवस भरणार आहे. महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून आठ ते नऊ लाख भाविक लोक या कालावधीत पुसेगावात येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दि.१८ डिसेबर असून या दिवशी प पु श्री सेवागिरी महाराज यांचा वार्षिक रथोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे पुसेगांव येथे वाहनांची गर्दी होवुन वाहतुक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.दिलेल्या माहितीनुसार पुसेगांव गावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीत दि. १४ ते दि.२४ डिसेंबर या कालावधीकरीता खालील प्रमाणे बदल केला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.प्रवेश बंद व नो पार्कींग खालीलप्रमाणे (दिनांक १४ ते द...