शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रणजितसिंह भोसले तर महिला जिल्हासंघटकपदी शारदाताई जाधव यांची निवड.
शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रणजितसिंह भोसले तर महिला जिल्हासंघटकपदी शारदाताई जाधव यांची निवड.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी नुकताच प्रवेश झालेले रणजितसिंह भोसले व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौं शारदाताई जाधव यांनी प्रवेश केला व लगेचच काही दिवसात त्यांची शिंदे गटाने फेर निवड करण्यात आली यावेळी त्यांना सातारा जिल्हाचे अधिकृत पत्र पक्षाचे सचिव श्री संजयजी मोरे सचिव श्री किरण पावसकर पक्ष प्रवक्त्या व उपनेत्या शीतलताई म्हात्रे सातारा संपर्क प्रमुख श्री शरदजी कणसे यांच्या उपस्थितीत दिले.
या वेळी रणजीतसिंह भोसले म्हणाले
मी शिवसेनेतच आहे फक्त नेतृत्व आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायेत त्यांच्या सोबत जावुन बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात वाचवायचं काम मी आता हाती घेतलय. शेवसेनेत काम करणारी आमची ही दुसरी पिढी आहे.माझ्या वडीलांनी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलं यामुळे मी लहानपणापासुन शिवसेनेच्या विचारांच बाळकडु पिलेला माणुस आहे मी शिवसेनेत राहुन अनेक समाजकार्य केलीत त्यात जिल्हात युवकांचे मोठे संघटन करून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हाती घेऊन ऊस उत्पादकान साठी मोठे आंदोलन उभे केले रस्ता रोको, मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव, आत्मदहन असे अनेक आंदोलन उभी केली गोरगरीबांना कपडे वाटप असेल महिलांच्या हक्कासाठी त्यांच संघटन करुन त्याचे प्रश्न शासन दरबारी मांडली आहेत वयोव्रधानसाठी आरोग्य शिबीर घेऊन गरजूना ऑपरेशन साठी मदतीचा हात दिला आहे वीज प्रश्नासाठी हजारो युवकांचा मोर्चा काढला आहे या सर्वसाठी शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार घरो घरी पोचवले मात्र एकनाथ शिंदे यांनी जसा शिवसेना वाचवण्याचा पवित्रा घेतला तशीच भुमिका घेत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा पाईक असलेले एकानाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न केले याच प्रयत्नामध्ये माझा खारीचा वाटा असवा म्हणुन मी एकनाथ शिंदे साहेबांच्या भुमिकेला पाठींबा देत त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी सातारा जिल्हा संघटिका शारदाताई जाधव म्हणाल्या मी जिल्हा संघटिका म्हणून गेले नऊ वर्ष सक्रिय कार्यरत आहे बऱ्याच वेळी मी महिलांचे अनेक कार्यक्रम राबवले त्या मध्ये महिलांचे आरोग्य शिबीर, महिलांचे रक्तदान शिबिर ,भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, महिला बचत गट ,मिळावे हळदी कुंकू प्रशिक्षण शिबीर ,युवकांसाठी रोजगार मेळावा पुरग्रस्थाना मदत व अत्यआवश्यक वस्तूंचे वाटप कोरोना योद्धा सत्कार, महिलांना मदत व मार्गदर्शन संजय गांधी निराधार योजना ठीक ठिकाणी राबवून लाभार्त्याना लाभ मिळवून देणे अनेक आंदोलने संघटनेच्या माध्यमातून राबवली व गरीब लोकांची व महिलांची संघटनात्मक बांधणी केलीआता आम्ही मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबाना पाठिंबा देत त्यांच्या सोबत काम करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं यावेळी कॅबेनेट मंत्री शंभूराज देसाई कोरेगाव खटाव चे लोकप्रिय आमदार महेशजी शिंदे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव ,जिल्हा प्रमुख जयवांतजी शेलार, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव व जेष्ठ शिवसैनिक वासुदेव माने यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केली असून या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते .
Comments
Post a Comment