Posts

Showing posts from May, 2023

हरिश्चंद्र सावंत मित्र परिवाराकडून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील व कर्मचारी यांचा सत्कार.

Image
हरिश्चंद्र सावंत मित्र परिवाराकडून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील व  कर्मचारी यांचा सत्कार. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  भारत देशामधील विविध राज्यांमधील केंद्र शासनाने घोषित केलेल्या  सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यामध्ये पुसेगाव पोलीस ठाणे महाराष्ट्रात प्रथम तर देशात पहिल्या दहा मध्ये आल्याबद्दल मा.हरिश्चंद्र सावंत मित्र समुहाच्या वतीने पुसेगाव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मा.बाळासाहेब लोंढे पाटील यांचा सत्कार विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत (चाचा )यांच्याकडून करण्यात आला यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले ,सुधाकर भोसले ,सचिन जगताप, आनंदा गंबरे ,विजय खाडे ,पुष्कर जाधव ,विपुल भोसले ,दौलत कुदळे, अशोक सरक ,व महिला पोलीस  पुष्पाताई पाटील, निकिता कुंभार, अश्विनी नलावडे हे कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला तर विसापूरचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत(भाऊ) यांचा सत्कार करण्यात आला व पुसेगाव पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचाऱ्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी युवा नेते हरिश्चंद्र सावंत माजी उपसरपंच मुरलीधर स...

स्व.विश्वनाथ लावंड यांचं सामाजिक कार्य अविस्मरणीय-प्रदीप विधाते.

Image
स्व.विश्वनाथ लावंड यांचं सामाजिक कार्य अविस्मरणीय-प्रदीप विधाते. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. खातगुण गावचे सुपुत्र स्वर्गीय वस्ताद विश्वनाथ लावंड(नरेकर) यांनी एस आर पी दलात सेवेत असताना प्रामाणिकपणे काम करून देशसेवेत पोलीस दलाची प्रतिमा उंचावर ठेवण्याचं काम केलं.अशा थोर व्यक्तीच्या स्मरणार्थ सुसज्ज प्रवेशद्वार कमान लावंड(नरेकर)कुटुंबियांनी उभारली असून कमानीला साजेसं काम स्वर्गीय विश्वनाथ लावंड(नरेकर) यांनी केलं आहे. त्यांनी केलेलं सामाजिक कार्य अविस्मरणीय असल्याचं भावोदगार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी काढले.स्वर्गीय वस्ताद विश्वनाथ लावंड यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई लावंड(नरेकर) आणि कुटुंबियांच्या वतीने खटाव पुसेगाव रस्त्यावर खातगुण येथे उभारण्यात आलेल्या प्रवेश कमानीच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात विधाते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धनाजीराव लावंड,सरपंच अमिनाबी सय्यद,उपसरपंच शिवाजी लावंड,विकास सेवा सोसायटी चेअरमन विजय लावंड,आनंदराव लावंड,मंदाकिनी लावंड, काजल जाधव,मनीषा माने,...

आध्यात्मिक व संस्कार शिबिरातून उद्याची सुजाण भावी पिढी घडेल ह .भ .प. धिरज महाराज शास्त्री.

Image
आध्यात्मिक व संस्कार शिबिरातून उद्याची सुजाण  भावी पिढी घडेल  ह .भ .प. धिरज महाराज शास्त्री. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कटगुण ता खटाव येथे ह भ प धिरज महाराज शास्त्री वलेकर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य वारकरी संस्कार शिबीर सुरू  आहे.हे शिबीर महात्मा जोतिबा फुले स्मारक परिसर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात 100 वारकरी विद्यार्थी वर्ग आहेत.या ठिकाणी वारकरी संस्कार मुलांना दिले जातात .हरिपाठ ,पखवाज वादन, हार्मोनियम वादन, तबला ,टाळ व वारकरी संप्रदायाचे ज्ञान दिले जात आहे .यावेळी बोलताना ह भ प  धिरज महाराज  शास्त्री वलेकर म्हणाले सध्या आपण समाजात पाहतो व्यसनांमुळे अनेक प्रपंच उध्वस्त होताना दिसत आहेत.वाढती व्यसनाधीनता ही खूप मोठी सामजिक समस्या आहे.मूल आई वडिलांचे ऐकत नाहीत.मुलांना मोबाईल चे वेड लागले आहे .नुसती भोतिक प्रगती होवून उपयोग नाही .तर ज्यावेळी समाजात अध्यात्मिक प्रगती होईल त्याच वेळी खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होईल .आज संस्काराचा विचार न करता अनेक पालक मुलांना उच्च शिक्षण देतात पण तीच मूल म्हातारपणी जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्र...

येस ग्रुप सोयाबीनला देणार 6500 रुपये तर घेवड्याला 8500 रुपये दर - येस ग्रुप संस्थापक संजय भगत यांची माहिती.

Image
येस ग्रुप सोयाबीनला देणार 6500 रुपये तर घेवड्याला 8500  रुपये दर -  येस ग्रुप संस्थापक संजय भगत यांची माहिती. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुपने जून 2023 या वर्षासाठी या खरीप हंगामातील सोयाबीनला 6100 ते 6500 तर घेवड्याला 7100ते 8500 रुपये प्रतिक्विंटल करार शेतीचे दर फिक्स केले असल्याची माहिती येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी दिली कोपर्डे ता. खंडाळा येथे झालेल्या करार शेती कार्यक्रमात येस ग्रुपचे संस्थापक श्री संजय भगत  मार्गदर्शन करत होते यावेळी सरपंच दीपक शिंदे, रामभाऊ शिंदे ,रमेश शिंदे ,शहाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती घेवडा सोयाबीन किंवा कोणताही शेतीमाल हा चांगल्या प्रकारे पिकवण्याची शेतकऱ्यांना आयडिया आली आहे मात्र दराची खात्री नसल्यामुळे शेतकरी कायम  कमी दराच्या दुष्टचक्रात  गुंतलेला आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी येस ग्रुपने करार शेतीचा प्रयोग चालू केला असून शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट देणे व शेतकऱ्यांना चांगले बियाणे पुरवठा करून त्यांना मोफत मार्गदर्शन करून 20 टक्के उत्पादन खर्च कमी करणे व 20 टक्...

आजारी असतानाही जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबारमध्ये आमदार महेश शिंदे यांनी लावली बाजी.

Image
आजारी असतानाही जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबारमध्ये आमदार महेश शिंदे यांनी लावली बाजी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कोरेगाव  विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी खटाव पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात खटाव तालुक्यातील कोरेगाव मतदार संघातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र आ. शिंदे यांना त्रास होऊ लागल्याने कार्यकर्त्याच्या सल्ल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्याकडे जावे लागले . आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक लोकांचे प्रश्न या दरबारात निकालात निघाले  वडूज येथील पंचायत समिती सभागृहातील या जनता दरबारास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, तहसीलदार किरण जमदाडे , सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव , भरत मुळे , सरपंच अभय घाटगे ,युवा नेते हरिश्चंद्र सावंत सह विविध शासकीय विभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.आ. महेश शिंदे यांची दोन दिवसा पासूनच तब्येत ठिक नव्हती तरी देखील या दरबारास उपस्थित राहणे आपले आद्य कर्तव्य समजून उपस्थिती लावली . सकाळ पासूनच कोरेगाव मतदार स...

बैलांच्या टकरीसाठी न्यायालयाच्या निकालात स्पष्ट उल्लेख नसल्याने पशुपालकात संभ्रम.

Image
बैलांच्या टकरीसाठी न्यायालयाच्या निकालात स्पष्ट उल्लेख नसल्याने पशुपालकात संभ्रम. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  बैलगाडी शर्यती संदर्भात तामिळनाडू महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी वरील संदर्भी केलेल्या सुधारणांवर सुप्रीम कोर्टाने शिक्का मोर्तब केले असल्याने आता जल्लीकट्ट बैलगाड्या शर्यत आणि कंम्बाला या म्हशींच्या शर्यतीचा मार्ग खुला झाला असला तरी न्यायालयाच्या निकालात बैलांच्या टकरी संदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने मराठवाड्यातील पशुपालकात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागात कासार शिरसी परिसरात दिवाळीच्या पाडव्यास व तुळशी विवाह निमित्त बैलांच्या टकरीचे आयोजन करण्यात येत होते ही शंभर वर्षाची परंपरा आहे पण इसवी सन 2011 पासून शासनाने पशुछळवाद कायद्यांतर्गत या प्रथेलात बंदी घातली होती याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने पशुपालकात समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी बैलांच्या टकरी बाबत न्यायालयाचे स्पष्ट संकेत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.जनावरांच्या इतर स्पर्धेपेक्षा बैलांच्या टकरी ह्या माणसांच्या कुस्ती परंपरेतील एक उदात्त भाग आहे ज...

निढळच्या विकासकामांचा साक्षीदार होणं हा आनंद मोठा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रतिपादन.

Image
निढळच्या विकासकामांचा साक्षीदार होणं हा आनंद मोठा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रतिपादन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  शासनाच्या गावांसाठी असंख्य योजना कागदावर आखल्या जातात. मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर त्या योजनांना काही अर्थ उरत नाही.श्री.  चंद्रकांत दळवी यांच्यामुळे कागदावरील योजना प्रयत्नपूर्वक निढळ गावामध्ये राबवल्या व त्याला ग्रामस्थांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली आणि गावाचा कायापालट केला. मला आज हे प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता आलं, चांगल्या कामांचा साक्षीदार होता आलं, हा खूप मोठा आनंद आहे. चंद्रकांत दळवी यांना आणि त्यांच्यासोबत उभ्या राहणाऱ्या समस्त निढळकरांना सलाम”, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नाना पाटेकर यांनी निढळकरांचे कौतुक केले. आदर्शगाव निढळ (जि. सातारा) येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी श्री. पाटेकर, नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, श्री. मल्हार नाना पाटेकर, नाम फाउंडेशनचे सदस्य यांचा विशेष दौरा मंगळवारी (दि. १६) निढळमध्ये आयोजित करण्यात आला होता. निढळच्या विकासकामांची सुमारे...

आमदार महेशजी शिंदे यांचा गुरवार दिनांक 18 मे रोजी वडूज येथे जनता दरबार.

Image
आमदार महेशजी शिंदे यांचा गुरवार दिनांक 18 मे रोजी वडूज येथे जनता दरबार. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. खटाव आणि पुसेगाव गटातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी १० वाजता वडूज पंचायत समितीच्या बचत सभागृह येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे, यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,तालूका वैद्यकीय अधिकारी,कृषी अधिकारी,पोलिस अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापल्या प्रलंबित असलेल्या समस्या अर्जावर लिहून संबंधित कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. अशी माहिती युवा नेते व सरपंच अभयसिंह  राजेघाटगे यांनी दिली आहे.

मृत्युंजय शंभुराजे हे अजिंक्य योद्धा होते - शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी.

Image
मृत्युंजय शंभुराजे हे अजिंक्य योद्धा होते - शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य शिवपुत्र संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या जोरावरती वाढवले टिकवले प्रसंगी बलिदान यातनादायी मरण स्वीकारले पण स्वराज्याची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. मृत्यू वरती विजय मिळवणारे मृत्युंजय संभाजी हे अजिंक्य योद्धा होते असे मत शिवव्याख्याते विशाल यांनी व्यक्त केले.छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान,  डंगिरेवाडी आयोजित संभाजी राजे जयंती उत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी म्हणाले संभाजीराजे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सर्व शास्त्रांमध्ये निपुण होते. संभाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास समाजापुढे येणे गरजेचे आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये तब्बल १२० लढाईचे नेतृत्व स्वतः संभाजी महाराजांनी केले. रणधुरंदर या युद्धाने एकाही लढाईमध्ये पराभव पहिला नाही.बहादूर खानाचा बीमोड करत बहादूरगड स्वराज्यात घेताना विलक्षण युद्ध कौशल्य दाखवले. औरंग्याच्या डोक्यातील मुकुटमणी असणारे ब्रहाणपूर लुटले, कातरखानास कै...

महिमानगड येथे भरली 29 वर्षानी माझी विदयार्थाची एक दिवशीय शाळा.

Image
महिमानगड येथे भरली 29 वर्षानी माझी विदयार्थाची एक दिवशीय शाळा. पुसेगांव प्रतिनीधी पंकज कदम. महिमानगड ता माण येथे  न्यू इंग्लिश स्कुल या हायस्कूलमध्ये तब्बल 29 वर्षानंतर 1994 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी वर्गाचे  स्नेहसंमेलन  झाले .सदर स्नेहसंमेलनाकरिता 29 विद्यार्थी विद्यार्थिनी व उपस्थित होते. तसेच या बॅचचे शिक्षक  आसमे सर, मोहिते ,शंकरराव खुस्पे सर  उपस्थित राहिले.त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन  केले. उपस्थित सर्व जणांनी आपले मनोगत व्यक्त केले तब्बल 29 वर्षानंतर भेटून बोलत असताना भावना व्यक्त करताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले व कंठ दाटून आला. शिक्षक वृंदास  भेटून सर्वजण भारावून गेले.. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करीत असताना आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या 45 वर्षाच्या प्रवासातील आजचा सर्वात आनंदाचा दिवस आहे असे मनोगत व्यक्त करताना मत मांडले. त्यानंतर स्नेह भोजनाचा आनंद सामुहिकरीत्या सर्वांनी पंक्तीमध्ये बसून घेतला. महीमानगड हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम   करण्यासाठी  56000/-रुपये मदतनिधी या शाळेला दिल...

भारत देशामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचा टॉप 10 मध्ये समाविष्ट व महाराष्ट्र राज्यात नंबर 1.

Image
भारत देशामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचा टॉप 10 मध्ये समाविष्ट व महाराष्ट्र राज्यात नंबर 1. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पोलीस स्टेशनचा केंद्राच्या पाहणीनुसार सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून राज्यात प्रथम तर भारत देशात दहा पोलीस स्टेशन मध्ये क्रमांक आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या व पुसेगाव नगरीच्या नावात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्राच्या पाहणीनुसार पोलीस महासंचालक पोलीस, महानिरीक्षक परिषद 2022 मध्ये देशातील  सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान पुसेगावला देण्यात आला. पोलीस ठाण्याचा क्राईम डेट गुन्ह्यांची तपासणी ऑनलाईन कामाची पद्धत वेळेत कामकाज पूर्ण करणे लोक भिमुख कार्य चारित्र्याचे दाखले अशाअनेक अटी व शर्ती पास करत  हा बहुमान मिळवला. यासाठी स्पर्धा सुरू होणार त्यापासून ची सर्व अधिकारी कर्मचारी पुसेगाव,खटाव,सह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्व जनता लोकप्रतिनिधी,विविध मंडळांचे अध्यक्ष, विविध दैनिकांचे पत्रकार, इलेक्ट्रिकल डिजिटल मीडिया, पदाधिकारी ,कार्यकर्ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे...

कटगूणच्या मलंगबाबा दर्गाहचा सोमवारपासून उरुस सुरु.

Image
कटगूणच्या मलंगबाबा दर्गाहचा सोमवारपासून उरुस सुरु.   पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.   हिंदू मुस्लिम ऐक्याबरोबर मानव एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील कटगूण येथील हजरत मलंगबाबा दर्गाहचा ३८ वा उरुस येत्या शुक्रवार (दि. १२), शनिवारी (दि.१३) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उरुसानिमित्ताने धार्मिक, वक्तृत्व, रक्तदान शिबिरासह मानव एकताचे संमेलन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.कटगूण येथील हजरत सय्यदशाह जलालउद्दीन कादरी (रहे.) अलमारुफ मोहब्बतशाह मलंग बाबा दर्गाहचा दरवर्षी १२ आणि १३ मे या दरम्यान उरुस साजरा करण्यात येतो. गेल्या ३८ वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी मलंगबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत.दर अमावस्येला या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. येत्या शुक्रवारी (दि. १२मे) हजरत मलंगबाबा दर्गाहचा संदलनिमित्ताने खटाव गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या मिरवणुकीत दर्गाहचे उत्तराधिकारी (मठाधिपती) हजरत रहमानशाह बाबा आणि हजरत शफीक बाबा हे नेतृत्व करणार आहेत. स...

विसापूर येथे बैलगाडा जंगी शर्यत 11 मे रोजी आयोजनकोण होणार विसापूर नामदार केसरीचा मानकरी.

Image
विसापूर येथे बैलगाडा जंगी शर्यत 11 मे रोजी आयोजन कोण होणार विसापूर नामदार केसरीचा मानकरी. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. विसापूर तालुका खटाव येथे दि. 11मे रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या भव्य ओपन मैदान बैलगाडा जंगी शर्यती स्पर्धेमध्ये एक ते सहा नंबर साठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती पिंटू साळुंखे यांनी दिली असून या शर्यतिमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे.  विसापूर तालुका खटाव येथे दिनांक 28 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे अवकाळी व वादळी पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या तर 11 मे गुरुवार रोजी  सकाळी नऊ वाजता माननीय नामदार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व प्रमुख पाहुणे मा. खासदार छ. उदयनराजे भोसले यांचे उपस्थितीमध्ये होणार आहेत. सदर या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी 1लाख रुपये, द्वितीय 51 हजार रुपये, तृतीय 25 हजार रुपये, पंधरा  हजार, दहा हजार, पाच हजार,रुपये अशी राहणार आहेत.प्रवेश फी पंधराशे रुपये राहील,स्पर्धा शासनाच्या नियमाप्रमाणे घेतल्या जातील,अकरानंतर येण्याऱ्या स्पर्धकांच्या गाडी नोंद केल...

सातारा येथील ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे "चैतन्य भूषण 'पुरस्काराने सन्मानित .

Image
सातारा येथील ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे "चैतन्य भूषण 'पुरस्काराने सन्मानित . पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  रत्नागिरी येथील चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे दिला जाणारा चैतन्य भूषण पुरस्कार सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ,सातारा  याचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती डॉक्टर विकास खिलारे यांना जाहीर झाला असून दिनांक सात मे रोजी एक दिवशीय ज्योतिष संमेलनात साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे नुकताच प्रदान करण्यात आला .पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मान चिन्ह, पंचवीसे एक रुपया, राजमुद्रा, शाल, श्रीफळ असे होते हा पुरस्कार हा पुरस्कार चैतन्य ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मुळे व ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते तसेच एडवोकेट मालती शर्मा, कुलगुरू श्री विजय शास्त्री संग मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .  डॉक्टर विकास खिलारे यांनी 2012 मध्ये वैद्यकीय व्यवसाय सोडून ज्योतिष शास्त्र या विषयात संशोधन केले असून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे ते गेली १४ वर्ष विवाह विषयक मार्गर्दर्शक  व समुपदेशक...

मायणी बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी; ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे.

Image
मायणी बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी; ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे.  पुसेगांव प्रतिनिधी  - पंकज कदम.   मायणी  ता खटाव येथील बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी दर अर्ध्या तासाला होत असून या पेठेतून जड वाहने जात असल्याने वाहनधारक पूर्णपणे वैतागले आहेत याबाबत अधिक माहिती अशी मल्हारपेठ पंढरपूर रस्ता हा मायणी बाजारपेठेतून जातो रस्ता रुंदीकरण 2022 मध्ये अकरा मीटरने झाले असले तरी वाहतुकीची कोंडी मात्र कायम आहे याचे प्रमुख कारण म्हणजे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात तसेच छोटे दुकानदार देखील आपली वाहने दिवसभर रस्त्याच्या कडेला उभी करतातच याच मार्गावर एसटी बस स्थानक बँका पतसंस्था असल्याने अनेक दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांनी डिसेंबर 2022 मध्ये सम विषम पार्किंग झोन तयार करून पाठवला होता परंतु तो लागू झाला नाही तरी ग्रामपंचायतीने सम विषम पार्किंग झोन तयार करून वाहनधारकांना या वाहतुकीच्या कोंडीतून दिलासा द्यावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. 

अजिंक्य सोशल फौंडेशन मार्फत मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण.

Image
अजिंक्य सोशल फौंडेशन मार्फत मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. अजिंक्य सोशल फौंडेशन मार्फत मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसवडे या गावी निबंध स्पर्धा आणि वकुत्व स्पर्धा ही १९ फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित्ताने साजरी करण्यात आली होती. मुलांना त्यांच्यातील कौशल्यवुद्धी अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती. १० ते १२ वयोगटातील मुलांनी सहभागी झाले होते. मुलांना एक संभाषण कौशल्य आत्मसात होईल त्याच बरोबर अभ्यासाची गोडी निर्माण होईल. या उद्देशाने हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निबंध व वकुत्व स्पर्धात प्रथम, दूतीय, तीसरा क्रमांक आणि उत्तेजार्थ असे बक्षीस होते. विद्यार्थीचा उत्साह मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष सचिन पवार, बाळा राठोड,संगीता भालेराव ,आदित्य पवार, समाधान नलावडे, स्वप्नील भोसले ,  प्राचार्य  नारायण  बागल, तानाजी  सराटेसर, राणी भोसले,राजेंद्र दशरथ लोखंडेसर गावातील ग्रामस्थ अजय यादव,सुशिल यादव,अॅड.लखन जगताप,महेश गुरव,उपस्थित होते.स्वप्नील भोसले यांनी कार...

ब्राह्मण महासंघाची सभा खेळीमेळी व उत्साही वातावरणात पार.

Image
ब्राह्मण महासंघाची सभा खेळीमेळी  व उत्साही वातावरणात पार. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  सातारा येथील अखिल ब्राह्मण महासंघाची विशेष सभा खेळीमेळीत व उत्साही वातावरणात पार पडली सुपनेकर हॉलमध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राज माजगावकर होते यावेळी एडवोकेट श्रीराम देव भास्कर मेहेंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन व परशुराम प्रतिमा पूजनाने बैठकीस प्रारंभ झाला यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्ताविकास सभा बोलवण्याचा उद्देश स्पष्ट केला. सभेस उपस्थित असलेल्या अध्यक्ष राज माजगावकर  लांडगे संदीप कुलकर्णी श्री वेलणकर श्री विजय जोशी श्री करंबेळकर डॉक्टर श्याम बडवे जगन्नाथ मेंहदळे नितीन जोशी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर श्याम बडवे यांनी व्रत्तबंद संस्काराविषयी माहिती दिली 22 मे रोजी महासंघाकडून सामुदायिक मौजी बंधन होणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली यावेळी एडवोकेट श्री रामदेव यांनी आपले मनोगत व्यक्त केले महासंगाकडून  दोन वर्षापासून सामुदायिक प्रतिबंध मेळावा घेण्यात येतो तरी दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करावी त्यानंत...

कोरेगावच्या सुभाषनगर परिसरात गुरुवारी दि. ४ मे रोजी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण.

Image
कोरेगावच्या सुभाषनगर परिसरात गुरुवारी दि. ४  मे रोजी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण. कोरेगाव प्रतिनिधी.. अज्जू मुल्ला.  कोरेगाव शहरातील सुभाषनगर उपनगरामध्ये सुमारे दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कोरेगाव विकास आघाडी व नगरपंचायतीतर्फे देण्यात आली. खंडाळा जयसिंगपूर राज्य मार्गाचे (कोरेगाव ते रहिमतपूर रस्ता) कोरेगाव जुना मोटार स्टँड ते डी. पी. भोसले कॉलेज दरम्यान सुशोभिकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ यावेळी केला जाणार आहे.  त्याचबरोबर सुभाषनगर प्रभागांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात येणार आहे.आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे ...

विसापूर येथे तळुपाळी देवीच्या मंदिराचा कलशारोहण समारंभ बुधवारी आयोजन.

Image
विसापूर येथे तळुपाळी देवीच्या मंदिराचा कलशारोहण  समारंभ बुधवारी आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. विसापूर तालुका खटाव येथील जाधववस्ती येथील तळुपाळी देवीच्या कलशारोहनचा समारंभ बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी दुपारी 1 वा.ता आयोजित केला असून या कार्यक्रमाचे प.पू .कालिदास उर्फ आझादगिरी महाराज (दाजीपूर )आजीवन मठाधिपती त्रंबकेश्वर यांच्या हस्ते होणार असून विसापूर व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 9 वा.ता गणपती पूजन, 1O वा.ता स्वस्तिक पुण्यहवनवाचन , 11 वा.ता अग्निस्थापना, देवतास्थापना, होमहवन, पूर्णाहुती, दुपारी 1 वा .ता कलाशारोहन व त्यानंतर महाआरती, दुपारी 3 नंतर महाप्रसाद आयोजित केला आहे या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संयोजकांनी सांगितले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्याबाई पुरस्काराने पत्रकार नम्रता भोसले सन्मानित.

Image
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्याबाई  पुरस्काराने पत्रकार नम्रता भोसले सन्मानित. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सो नम्रता भोसले यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ तसेच दहा हजार रुपये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी रुचेत जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जयवंत गलांडे, निवासी जिल्हाधिकारी प्रशांत आवटे ,मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर खिलारे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांची प्रमुख उपस्थिती होती या पुरस्काराने खटाव तालुक्यातील लोकांनी अभिनंदन केले  असून विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय अधिकारी वर्ग पत्रकार ,वकील ,पोलीस, शिक्षिका ,महिला वर्ग, समाजसेवक यांनी अभिनंदन केले आहे.