Posts

Showing posts from September, 2025

गांजा तस्करी करणारे सराईत गुन्हेगारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

Image
गांजा तस्करी करणारे सराईत गुन्हेगारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.  पुसेगाव पोलिसांकडून माहिती अशी साताराबाजूने पुसेगाव कडे येणाऱ्या सराईत गुन्हेगार यांना दिनांक 25 रोजी 8.45 वाजता विसापूर फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान सातारा बाजूकडून पुसेगाव कडे जाणारी एक्टिवा स्कुटी क्रमांक एम.एच.11  डी.एस 78 93 या स्कुटी वरून गांजा तस्करी करत असताना विनोद गुलाब कदम. समाधान दिलीप खरात. विधान सुनील दास. यांना पुसेगाव पोलिसांनी थांबून त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पुसेगाव पोलीस यांना शंका आल्याने स्कुटीची डिकी खुली करून अधिक तपास केला असता 8 किलो 250 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पाने फुले व बिज असलेला उग्र वासाचा थोडासा ओलसर असलेला गांजा अंदाजे रक्कम साडेतीन लाख रुपये किमतीचा मिळून आला. या सराईत गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे.1) विनोद गुलाब कदम वय वर्ष 32 राहणार.पांढरवाडी. विसापूर तालुका. खटाव जिल्हा.सातारा 2) समाधान दिलीप खरात वय वर्ष 22 राहणार.मलवडी तालुका.माण जिल्हा. सातारा 3) विधान सुन...

एकता क्रांती दल संघटनेच्या मागणीची दखल घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

Image
एकता क्रांती दल संघटनेच्या मागणीची दखल घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकणासह मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे पिके, फळबागा नष्ट झाली, काही ठिकाणी जमीन खरपूस झाली, तर अनेक जनावरे आणि काही लोकांचा जीवही गेला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी बुधवारी नुकसान पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि आश्वासन दिले की, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल.दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी ई मेल व्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाध...

of श्रीमंत संजीव राजांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजे गटाने निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडून सुरवात करणार.

Image
 of श्रीमंत संजीव राजांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजे गटाने निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडून सुरवात. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. 20 सप्टेंबर आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचा मावळे सातारा जिल्हा परिषदेचे आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड प्रशाला नारळ सातारा जिल्हा परिषद संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या ११ व्या वाढदिवसाच्या आमदार रामराजे निंबाळकर यांची यांनी नुकतीच संजीव राजे यांचा वाढदिवस अत्यंत भविष्यात साजरा करण्याची संकेत दिली आहेत गोविंद मिल्क अँड प्रॉडक्टच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी घोषणा केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार या सोहळ्यात फलटण तालुक्यात सायकल वाटप आणि महिलांना साडी वाटप करण्याचे उपक्रम राबवले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणु...

गिरवी भागात नवरात्र उत्सव तयारीची लगबग.

Image
गिरवी भागात नवरात्र उत्सव तयारीची लगबग. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण तालुक्यातील गिरवी परिसरातील गिरवी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी बोडकेवाडी सासकल दुधेबावी तिरकवाडी जावली आंदरुड मिरढे सोनवडी विचुंर्णी मांडवखडक वडले दालवडी ताथवडा उपळवे वेळोशी सावंतवाडी ढवळ वाखरी या ग्रामीण भागातील महिलांची नवरात्र उत्सव तयारीची लगबग सुरु झाली आहे.घरातील साफसफाई स्वच्छता कपडे,वाकळी, लेपटी,सतरंजी, अंथरून, पांघरून यांची धुण्यासाठी ओढे नाले यावर व तलावाच्या काठावर कपडे धुण्यासाठी गर्दी झालेली दिसून येते आहे.महिलांना गडी माणसं मदत करताना दिसत आहेत.नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खेडेगावात घरादाराची साफसफाई व स्वच्छता करणेचा रिवाज हा नवरात्र उत्सवाच्या प्रथा परंपरा चाली रितीचा पगडा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.शेतकरी गाई गुरांच्या गोठ्याची साफसफाई व स्वच्छता करतात. गिरवी तिरकवाडी धुमाळवाडी निरगुडी बोडकेवाडी सासकल भाडळी दुधेबावी या आठ गावांची भवानीमाता डोंगरावर भवानीमाता मंदिर येथे नवरात्र उत्सव धार्मिक सांस्कृतिक वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात येतो.गिरवी गावातून गेली पंचवीस वर्षांपूर्वी...

पुसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत नवरात्री उत्सव व गणराया अवॉर्ड वितरण व बैठकीचे आयोज.

Image
पुसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत नवरात्री उत्सव  व गणराया अवॉर्ड वितरण व बैठकीचे आयोज.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.  पुसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुवार दिनांक 18.9.2025 रोजी सायंकाळी पाच वाजता नवरात्र उत्सव निमित्ताने बैठक व गणराया 2025 सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव अवॉर्ड देण्यात आहे.पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगामी नवरात्रउत्सव नियोजनाबद्दल, सुव्यवस्थित, शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सर्व गावातीलसरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ,सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष,पोलीस पाटील, पोलीस मित्र,शांतता कमिटी,दुर्गामाता मंडळाचे पदाधिकारी,अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन सेवागिरी मंगल कार्यालयात केली असून या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे आवाहन पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केली असून या बैठकीस मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव   अजित टिके. हे अधिकारी मार्गदर्शन करणारा असून या बैठकीस पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व दुर...

अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर.

Image
अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण च्या वतीने विविध प्रश्नांवर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून आज लोकशाही दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा फलटणचा वतीने तहसीलदार फलटण कार्यालयांमध्ये नागरिकांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पलटण व सर्व खात्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये  पंचायती कडे आलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आला.व प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधित खात्याला तहसील कार्यालयामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या. या बैठकीला आरोग्य,परिवहन, बांधकाम, वाहतूक,कृषी, भूमी अभिलेख विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष तानाजी सोडमिसे, राजन भोसले जिल्हा सदस्य, मारूती मोहिते तालुका सचिव, कृष्णात कुंभार तालुका सदस्य तसेच तालुका सदस्य उपस्थित होते.अधिकारी स्तरावर अभिजित जाधव तहसील यांचे वतीने सोनवणे साहेब,गुंजवटे साहेब नायब तहसीलदार फलटण, धनंजय कोकरे उपअभियंता उजवा कालवा, सोनवलकर एस एस उप अ...

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठीआरक्षण जाहीर.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठीआरक्षण जाहीर. गिरवी प्रतिनिधी,अनिलकुमार कदम. ग्रामविकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या अधिसुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यामधील सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) – 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण प्रवर्ग-4, सर्वसाधारण महिला-3 या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत 15 सप्टेंबर रोजी विशेष बैठक.उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन.

Image
सोशल मीडिया  इन्फ्लुएन्सर्स सोबत 15 सप्टेंबर रोजी विशेष बैठक.उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम.  'सेवा पंधरवडा' यांचा प्रभावी प्रसार करण्यासाठी आणि सातारा जिल्यात महसूल विभागाच्या विविध जनहितकारी उपक्रमांचा प्रसार आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असलेल्या इन्फ्लुएन्सर्स यांची  विशेष बैठक सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सातारा जिल्ह्यातील सोशल मीडिया  इन्फ्लुएन्सर्स यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी संवादाचे माध्यम बनले आहे. या माध्यमाचा उपयोग करून महसूल विभागाच्या उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचवणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना या बैठकीस उप...

सी. पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सी पी राधाकृष्णन यांना शुभेच्छा.

Image
सी. पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सी पी राधाकृष्णन यांना शुभेच्छा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुंबई दि. ९:- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.श्री. राधाकृष्णन यांच्या विजयाची घोषणा होत असताना त्यांचा उल्लेख मुंबईचे, महाराष्ट्राचे  म्हणून केला गेला. त्याअर्थाने महाराष्ट्राची एक व्यक्ती या पदावर आसिन झाली याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ' श्री. राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचे शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील  योगदान प्रेरणादायी आहे. राधाकृष्णन यांचा अनुभव आणि दूरदृष्टीचा अनेकांना लाभ होईल. त्यातून भारत नवी उंची गाठेल आणि जागतिक स्त...

महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथे जोरदार निदर्शन.

Image
 महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथे जोरदार निदर्शन. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. इंडिया आघाडी सातारा.राज्यातील विद्यमान महायुती सरकार ने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ विधीमंडळाच्या आदिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजुर केले आहे. हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असुन जणतेच्या मुलभूत हक्कावर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथील पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.रणजितसिंह देशमुख. जिल्हाअध्यक्ष- सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण.

Image
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या अंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांना ₹1892.61 कोटींच्या 7व्या हप्त्याचे वितरण केले. केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पीएम – किसान)'च्या धर्तीवर राज्य शासनाने 'नमो शेतकरी महासन्मान किसान योजना' राबवली असून, पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत शेती खर्चाला हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीतील अनुदानाचा समावेश असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी ₹6000 अनुदान दिले जाते. त्यामध्ये राज्य शासनाकडून नमो शेतकरी म...

शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा:-केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.

Image
शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा:-केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी  केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या  रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावे व राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ  महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा  अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि,  सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग कमी रहदारीचा असल्याने तोट्यात चाललेला आहे.भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकार या महामार्गाचे  रूंदीकरण  करण्यास कोणतीही अडचण नसून सध्या या महामार्गावर ब-याच ठिकाणी सहा पदरी व आठ पदरीच्या अनुषंगाने जमीन संपादनही झालेले आहे. केंद्र सरकारने लगेचच या महामार्गाचे सहापदरी किंवा आठ पदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार असल्याची माहिती केंद्रीय  मंत्री गडकरी यांनी दिली.राज्य ...

कृषी व महसूल खात्याच्या उदासीनतेमुळे;शेतकरी फार्मर आयडी,ई पिक पाहणी,पिक विमा योजना पासून वंचित.

कृषी व महसूल खात्याच्या उदासीनतेमुळे;शेतकरी फार्मर आयडी,ई पिक पाहणी,पिक विमा योजना पासून वंचित. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गरजवंत शेतकरी यांना आधुनिक तंत्रज्ञान व  स्मार्ट मोबाईल नसल्याने आणि कृषी महसूल खात्याच्या उदासीनतेमुळे शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित आहेत अशी विदारक वास्तव वस्तुस्थिती दिसून येते आहे. शासन निर्णय व परिपत्रके शासनाच्या धोरणानुसार कृषी अधिकारी व कर्मचारी, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन गरजू शेतकऱ्यांना फार्मर आयडी,ई पिक पाहणी,पिक विमा योजना काढण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी वंचित आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बावनकुळे कृषी मंत्री यांनी शासनाच्या धोरणानुसार योजना राबवण्यासाठी गावपातळीवर कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना सहकार्य व मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी भूमिका घेतली आहे.तथापी कृषी अधिकारी व कृषी खात्यातील कर्मचारी कृषी सहायक मंडल अधिकारी, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्...