Posts

Showing posts from January, 2026

भारतीय पत्रकार संघ फलटण कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
भारतीय पत्रकार संघ फलटण कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. भारतीय पत्रकार संघाच्या फलटण येथील कार्यालयात आज मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महानंदा दूध संघाचे चेअरमन डि. के. पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमावेळी प्रा. विकास शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत भारतीय संविधान याच दिवशी लागू झाल्याची माहिती उपस्थितांना दिली. धर्मनिरपेक्ष ,सार्वभौम, लोकशाही ,प्रजासत्ताक राज्य ही आपली ताकत आहे. यानंतर भारतीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, जिल्हाउपाध्यक्ष विकास शिंदे, महात्मा फुले विचार अभियानाचे प्रमुख अजितकुमार जाधव , हल्ला कृती समितीचे प्रमुख आप्पासाहेब तांबे, कार्याध्यक्ष राजभाऊ बोंद्रे, फलटण तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, सचिव अमोल पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, सदस्य जुबेर कोतवाल, शकील सय्यद, सचिन खुडे यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या...

फलटण एज्युकेशन सोसायटी चे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
फलटण एज्युकेशन  सोसायटी चे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. श्रीमंत निर्मलादेवी बालक व  प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेमध्ये ७७ वा भारताचा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेच्या व्हा.चेअरमन मा.सौ.वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीगीत ,ध्वजगीत,राज्यगीत  विद्यार्थ्यांनी तालासुरात  म्हणत सौ.सुषमा गोसावी यांनी संविधान वाचन व साक्षरता शपथ वाचन केले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर देशमुख  सदस्या  मा.निर्मला रणवरे मॅडम  ,रणरागिणी बहुउद्देशीय  संस्था अध्यक्ष मा.श्री.इम्रान सय्यद  उपाध्यक्ष  मा.श्री. अतुल शहा उपस्थित होते. यावेळी   रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे व हिंदी जिल्हास्तरीय परीक्षेचे व बालक मंदिर च्या विविध  स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात...

वर्धनगड गाव की कचरा डेपो? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशांत शिवशरण:-रिपाइं (ए) आक्रमक.

Image
वर्धनगड गाव की कचरा डेपो? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशांत शिवशरण:-रिपाइं (ए) आक्रमक. ​ विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. वर्धनगड गावाला ऐतिहासिक वारसा असलेल्या तसेच हुतात्म्यांची भूमी, खटाव तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वर्धनगड गावातील मूलभूत सोयीसुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, सध्या गावाला कचऱ्याच्या साम्राज्याने वेढले आहे. दलित वस्तीकडे जाणारे रस्ते, बंदिस्त गटारांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर रिपाइं (ए) चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.​गटारांची समस्या आणि आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून ​मिळालेल्या माहितीनुसार, मातंग वस्तीपासून खाली जाणारे गटार रियाज शिकलगार आणि इलाही शिकलगार यांच्या घराजवळ येऊन उघडे सोडण्यात आले आहे. पूर्वी हे गटार एकाच ठिकाणी शोषखड्ड्याप्रमाणे एका जागेवर नियंत्रित होते. ते त्या ठिकाणावरून बंदिस्त केले मात्र आता ते या घरांपाशी...

वर्धनगडच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी; अक्षय सावंत यांची इंडिगो एअरलाईन्समध्ये 'पायलट' पदी निवड.

Image
वर्धनगडच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी; अक्षय सावंत यांची इंडिगो एअरलाईन्समध्ये 'पायलट' पदी निवड. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. ​ स्वप्न पाहण्याची जिद्द आणि ते पूर्ण करण्याची चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणे पडते, हे वर्धनगडच्या सुपुत्राने सिद्ध करून दाखवले आहे. खटाव तालुक्यातील वर्धनगड गावचे सुपुत्र अक्षय तानाजी सावंत यांची प्रतिष्ठित 'इंडिगो एअरलाईन्स'मध्ये पायलट (वैमाणिक) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिद्दीचा प्रवास: शिक्षणाचा टप्पा​अक्षय यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले स्वप्न प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून (TC College) त्यांनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. लहानपणापासूनच आकाशात झेपावण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अक्षय यांनी त्यानंतर वैमाणिक प्रशिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित केले.​कठोर परिश्रम आणि यश​अक्षय यांनी गुजरात येथील 'ब्ल्यू एव्हिएशन' (मैसाना) येथून वैमाणि...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा.

Image
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा. फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. फलटण दि.२१| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पालिका, मंगळवार पेठ  फलटण येथील प्रशालेत भारतीय संविधान दिन व पत्रकार दिन साजरा करण्यात आला. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. “वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून वाचन संस्कृती जपली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी पत्रकार प्रमोद सस्ते यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “भारतीय संविधान हा या देशाचा आत्मा असून लोकशाहीचा कणा आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार व कर्तव्य समजतात. विद्यार्थ्यांनी लहान वयातच संविधानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व...

पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव.

Image
पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव. पिपोडे बुद्रुक प्रतिनिधी,अज्जू मुल्ला. कोचीनपासून ते सुरतेपर्यत आपल्या प्रामाणिक सेवेने आणि विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा  नावलौकिक वाढवणाऱ्या श्री बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली, त्या प्रित्यर्थ  वसुंधरा पर्यावरण प्रेमी समूहमार्फत त्यांचा समूहाच्या परंपरेला साजेशा पद्धतीने  वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ,शाम कुलकर्णी, संतोष कुंभार, गणेश महाजन ,अभिजीत लेंभे, राजाराम दगडे सचिव , शिवाजी साळुंखे  सहसचिव , सुधीर गार्डी ,सुनील साळुंखे ,कदीर शेख  व समूहातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचे बलिदान अजरामर;सुलतानवाडी येथे बुधवारी पानिपत स्मृतीदिनाचा अकरावा वर्षपूर्ती सोहळा.

Image
पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचे बलिदान अजरामर; सुलतानवाडी येथे बुधवारी पानिपत स्मृतीदिनाचा अकरावा वर्षपूर्ती सोहळा. कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुला. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढ्याच्या स्मृती जतन करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील सुलतानवाडी येथे पानिपत स्मृतीदिन मोठ्या भावनिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुलतानवाडी येथे आयोजित या कार्यक्रमात पानिपत वीर श्रीमंत सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.इ.स. १७६१ मध्ये झालेला पानिपतचा तिसरा लढा हा मराठा साम्राज्य आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील निर्णायक संघर्ष होता. उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, तसेच श्रीमंत सरदार सुलतानजी तुंबाजी बर्गे यांच्यासह असंख्य सरदारांनी प्राणांची आहुती दिली. संख्येने व साधनसामग्रीने कमी असूनही मराठ्यांनी दाखवलेले शौर्य आजही इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. स्...