Posts

Showing posts from April, 2026

निधीअभावी रुग्णांची हेळसांड; फलटणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था.

Image
निधीअभावी रुग्णांची हेळसांड; फलटणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था. फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातील शंकर मार्केट परिसरात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून निधीअभावी येथे मूलभूत वैद्यकीय सेवा ठप्प झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आरोग्य केंद्राबाहेर “महालॅब मार्फत होणाऱ्या रक्त तपासण्या बंद आहेत” तसेच “टी.टी. इंजेक्शन उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय अधिकच वाढली आहे. याबाबत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, निधीअभावी मागील आठ दिवसांपासून रक्त तपासणी सेवा बंद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला जात असला, तरी प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य निदानासाठी रक्त तपासणी अत्यावश्यक असताना ही सेवा बंद असल्याने उपचार प्रक्रियेत विलंब होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा ...

भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा विजयताई कदम यांचा स्तुत्य उपक्रम.

Image
भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा विजयताई कदम यांचा स्तुत्य उपक्रम. फलटण शहर प्रतिनिधी : जुबेर कोतवाल.   महाराष्ट्र शासनामार्फत एस टी तिकीटात महिला वर्गाला ५०%सवलत असून शासनाच्या एस टी बस स्मार्ट कार्ड योजनेचा प्रभाग क्रमांक 13 आणि फलटण शहरातील सर्वसामान्य महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी भारतीय जनता पार्टी महिला शहर अध्यक्षा यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आलेले होते एस टी स्मार्ट कार्ड कॅम्पमध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 13 मधील आणि फलटण शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील 350 हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला  माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर ,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयाताई कदम यांनी या कॅम्प चे आयोजन केले होते.या योजनेचा सर्वसामान्य महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा प्रामुख्याने या मागचा उद्देश होता या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक 13 मधील महिलांनी आणि फलटण शहरातील महिलांनी त्य...

सरकारने हरभरा खरेदी मुदत 30 मे पर्यंत वाढवावी व दोन लाख टन खरेदी उद्दिष्ट द्या - राष्ट्रीय एफ.पी.सी. संस्थापक संजय भगत.

Image
सरकारने  हरभरा खरेदी मुदत 30 मे पर्यंत वाढवावी व दोन लाख टन खरेदी उद्दिष्ट द्या -  राष्ट्रीय एफ.पी.सी. संस्थापक संजय भगत.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  केंद्र शासनाच्या हमीभाव योजने  अंतर्गत राज्याचे हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे हरभरा खरेदी बंद आहे ती त्वरित सुरू करावी अशी मागणी  केंद्रीय कृषिमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे राष्ट्रीय एफ.पी.सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत यांनी  केली  आहे.महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सात लाख टनाचे हरभरा खरेदी उद्दिष्ट होते मात्र बाजारातील दर हे हमीभावापेक्षा 700 ते 900 रुपये कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा विक्री करण्यासाठी ची पहिली पसंती ही हमीभाव खरेदी केंद्र राहिली यामुळे हे उद्दिष्ट मुदती अगोदर 24 एप्रिलच्या  दरम्यान पूर्ण झाले यामुळे अचानक पोर्टल बंद करण्यात आले.हरभरा हमीभाव केंद्रात घालता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे व हमीभाव केंद्र चालवणाऱ्या संस्था,कंपन्या चालक यांची कोंडी झाली व शेतकऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागत असल्यामुळे कें...

मलठण प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांचा धडाका; कोट्यवधींच्या कामांना उत्साहात प्रारंभ.

Image
मलठण प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांचा धडाका; कोट्यवधींच्या कामांना उत्साहात प्रारंभ. फलटण शहर प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. शहरातील मलठण येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध विकासकामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रस्ते काँक्रीटीकरण, तसेच लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासारख्या अत्यावश्यक कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार आहे.या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. नरसिंह निकम यांची विशेष उपस्थिती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रास्ताविक करताना प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने आयोजित केलेली महिला आरोग्य तपासणी उत्साहत सपंन्न.

Image
रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने आयोजित केलेली महिला आरोग्य तपासणी उत्साहत सपंन्न.  फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने. ररणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था फलटण. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण कृषि महाविद्यालय फलटण श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल फलटण महिला आरोग्य तपासनी आयोजित करण्यातआले होती त्यावेळी महाविद्यालयाचे  दोन्ही प्राचार्य डॉ.श्री एस.डी.निंबाळकर( हॉर्टी कल्चर),प्राचार्य डॉ.श्री यू.डी.चव्हाण.(अँग्रीकलचर), सौ.सीमा शेडगे (रेक्टर मॅडम), श्री.जीवन शिंदे(अधीक्षक श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृह),शिक्षिका स्टाफ, आणि बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. श्री अभिजीत भालके  व डॉ. सौ श्रुती विक्रांत थिटे यांनी विद्यार्थिनींना व  शिक्षिका स्टाफ यांना आरोग्य व महिलेच्या समस्या या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सौ रझिया शेख, सचिव मारुती टकले.खजिनदार श्री.कैफ शेख,श्री राज चांदवडकर,संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख,  सौ. माया बनसोडे,सौ .प्रीती शाह. सो अनिसा...

डीजेवर पैसे उडवण्यापेक्षा संविधानाचा सन्मान करणे आम्हाला जास्त महत्त्वाचे.

Image
डीजेवर पैसे उडवण्यापेक्षा संविधानाचा सन्मान करणे आम्हाला जास्त महत्त्वाचे. फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. महाराष्ट्रभर सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. मात्र, केवळ डीजेच्या तालावर नाचून किंवा अवाढव्य खर्च करून मिरवणुका काढण्यापेक्षा, गावाच्या वैभवात भर घालणारा आणि येणाऱ्या पिढीला दिशा देणारा उपक्रम सरडे बंगला (ता. फलटण ) येथील तरुण वर्गाने राबविला आहे. ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या तरुणांनी गावात भव्य संविधान स्तंभ' उभारून संपूर्ण जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. डीजेच्या खर्चाला फाटा, देऊन सरडे बंगला येते संविधान स्तंभ बांधून 'संविधान चौक' नाव दिले.आजकाल जयंती उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची वर्गणी गोळा करून ती केवळ डीजे आणि क्षणिक डामडौलावर खर्च केली जाते. परंतु, सरडे बंगला मोरे वस्ती येथील तरुणांनी या परंपरेला छेद दिला आहे. "जयंती नाचून नव्हे, तर वाचून साजरी करा" हा संदेश केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी कृतीतून उतरवला आहे. लाखो रुपये खर्च स्वतः करून गावातील मुख्य चौकाचे सुशोभीकरण के...

हिरव्यागार जंगलावर वनखात्याची कुऱ्हाड.

Image
     हिरव्यागार जंगलावर वनखात्याची कुऱ्हाड. फलटण शहर प्रतिनिधी :- जुबेरभाई कोतवाल. फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. कालांतराने ही झाडे चांगली वाढून परिसर हिरवागार झाला होता. मात्र, अलीकडेच या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही माहिती समजताच घटनास्थळी भेट दिली असता, परिसरातील अनेक झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे झाडे तोडण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.स्थळावरील काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी कोणतरी नवीन प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकल्पासाठीच झाडांची तोड करण्यात आली का, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वन विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. त्यातील अनेक झाडे टिकत नाहीत, मात्र काही झा...

पत्रकारांसाठी भक्कम आधार:-रवींद्र बेडकिहाळ.

Image
पत्रकारांसाठी भक्कम आधार:-रवींद्र बेडकिहाळ. फलटण शहर प्रतिनिधी :⁠-जुबेरभाई कोतवाल. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ५० वर्षांहून अधिक पत्रकारितेत लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जात असून पत्रकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित होत आहे. *पत्रकारांसाठी भक्कम आधार* राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्र संपादकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. अधिस्वीकृती, पेन्शन, आर्थिक मदत, पत्रकार भवन आणि जाहिरात दरवाढ यांसारख्या प्रश्नांवर जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी सातत्याने भूमिका घेतली. पत्रकारांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा संदेश त्यांनी कायम दिला. *संघटनेच्या माध्यमातून लढा* सन १९८१ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून बेडकिहाळ यांनी संपादकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. *जाहिरात धोरण आणि आर्थि...

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत संधी.

Image
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत संधी. फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, यापूर्वी कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत २० एप्रिल २०२६ होती. मात्र, पालकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच काही तांत्रिक कारणांचा विचार करून ही मुदत २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान वाढविण्यात आली आहे.आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत लॉटरीद्वारे निवड झालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या वाढीव कालावधीत आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.दरम्यान, वाढीव मुदतीच्या पार्श्वभूमीवर आरटीई पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश एनआयसी, पुणे यांना...

शाळा गुणवत्ता मुल्यांकनात सातारा राज्यात प्रथम.

Image
शाळा गुणवत्ता मुल्यांकनात सातारा राज्यात प्रथम. फलटण प्रतिनिधी: जुबेर कोतवाल. शाळांच्या शैक्षणिक आणि सातारा,भौतिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी राबवण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (एसक्यूएएफ) मूल्यांकन प्रक्रियेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यातील ८७ टक्के शाळांनी या आराखड्यात आपली माहिती पारदर्शकपणे भरली आहे.शाळेची भौतिक, आर्थिक तसेच गुणवत्तापूर्ण माहिती राज्याकडे सादर केल्यानंतर त्या शाळांना गुणांकन दिले जाते. शिक्षण प्रक्रियेत या आराखड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळांनी हे मूल्यांकन पूर्ण केल्याने सलग तीन आठवडे जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. समग्र शिक्षा अभियान व पीएमसी शाळा खर्च करण्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर राहिला आहे.शाळा गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीचा आढावा घेऊन सुधारणा उपाय सुचवले जातात. अध्यापन, शालेय वातावरण, सुरक्षितता, पालकांचा सहभाग व नेतृत्व सुधारल्याने शाळेचा कारभार गुणवत्ताप...

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन.

Image
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. ररणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था फलटण. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्यावतीने 1000 हजार राजमुद्रा (शिवमुद्रा)बंधन वाटप करण्यात आले .अतिशय उत्साहने कार्यक्रम पारपडला. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. श्री.इम्रान सिकंदर सय्यद .श्री. अतुल शाह खजिनदार श्री.कैफ शेख सचिव श्री.मारुती टकले पी आय श्री.काळे साहेब व पोलीस कर्मचारी  संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ.रझिया शेख, सौ. माया बनसोडे, उपशिक्षक सौ . सीमा हिंदुराव मुळीक  सौ .सविता शिंदे,सौ.प्रीती शाह, सौ.हिना सय्यद,डिजिटल मिडिया संस्थाचे  अध्यक्ष उपध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते .सर्वांचे सहकार्य लाभले. खूप खूप ध्यानवाद

एसटी बस स्मार्ट कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८०० महिलांना लाभ.

Image
एसटी बस स्मार्ट कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८०० महिलांना लाभ. फलटण शहर प्रतिनिधी :- जुबेरभाई कोतवाल. माऊली फाउंडेशन व नगरसेविका कुमारी सिद्धली अनुप शहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एसटी बससाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्ड कॅम्पला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याबाबतची माहिती नगरसेविका कुमारी सिद्धली अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना, एसटी बस स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागू नये, या उद्देशाने हा कॅम्प त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे वॉर्डमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.या कॅम्पमध्ये सुमारे ८०० महिलांनी सहभाग घेत स्मार्ट कार्ड काढून घेतले. अल्पावधीत मोठ्या संख्येने महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आयोजकांना यश आले. कॅम्पचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने प्रक्रिया जलद व सुरळीत पार पडली.सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या सिद्धली शहा यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे स...

फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील आडमुठ्या अधिकाऱ्यांमुळे महावितरणची कामे ठप्प.

Image
फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील आडमुठ्या अधिकाऱ्यांमुळे महावितरणची कामे ठप्प. नागरिक त्रस्त; विविध शासकीय योजनांवर परिणाम, वरिष्ठांकडून तातडीच्या कारवाईची मागणी फलटण शहर प्रतिनिधी : जुबेरभाई कोतवाल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या फलटण विभागीय कार्यालयातील एका अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या व निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील वीज संबंधित विकासकामांना अक्षरशः खीळ बसली आहे. प्रशासनातील दुर्लक्ष, दिरंगाई आणि समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक महत्त्वाच्या शासकीय योजना रखडल्याचे वास्तव समोर येत आहे.फलटण विभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडे उपकार्यकारी अभियंता पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, या दुहेरी जबाबदारीचे प्रभावी नियोजन करण्यात अपयश आल्याने कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याची तक्रार नागरिक आणि ठेकेदारांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांला त्यांच्या पदाची जबाबदारी व गांभीर्याची जाणीव नसल्याचा आरोपही होत आहे. परिणामी, फलटण तसेच खंडाळा तालुक्यातील विविध वीज ...

मुधोजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Image
मुधोजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. फलटण एज्युकेशन, सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम व मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रा.फिरोज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ  व राज्यघटनाकर होते. त्यांच्या संविधानात्मक कामाचा अनेक राष्ट्राने आदर्श घेऊन आपल्या राष्ट्रांचे संविधान तयार केले. कोलंबिया विद्यापीठांमध्ये त्यांच्या संशोधनामुळे त्यांची प्रतिमा मोठ्या डौलात तेथे लावलेली आपणाला पाहायला मिळते, जागतिक स्तरावरील अनेक उपेक्षित, वंचित समूहानी त्यांच्या मानवमूलभूत हक्क व अधिकारांच्या मानवतावादी लढ्याचा आदर्श घेऊन गुलामगिरीतुन मुक्तता...

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू.

Image
पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू.   फलटण :  माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे.जशी माणसात माणुसकी आवश्यक आहे, तशीच झाडांमधली ‘झाडूसकी’ जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरवा श्वास देणाऱ्या निसर्गाची आणि झाडांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रभावी प्रतिपादन वाई परिक्षेत्राचे नियतक्षेत्र वनाधिकारी तथा रानकवी राहुल निकम यांनी केले.पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित ‘महापुरुषांच्या जयंती’ कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दै. लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी प्रा. विकास शिंदे यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा मंच खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारा मंच आहे. येथे सर्व महापुरुषांच्या जयंती एकाच व्यासपीठावर साजऱ्या केल्या जातात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. समता, शिक्षण आणि संविधानाचे मूल्य यांची शिकवण या मंचावरून दिली जाते. ही प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचावी,” असे ते म्हणाले. यावेळी वनाधिकारी, रानकवी राहुल निक...

पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांतचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

Image
पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांतचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांत यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. याच प्रसंगी फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या तांबे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविताना उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाला सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुम...

फलटण पंचायत समितीची पहिली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरण संपन्न.

Image
फलटण पंचायत समितीची पहिली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरण संपन्न. फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.  पंचायत समिती फलटण ची पहिली मासिक सभा दि. १३/०४/२०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पंचायत समिती फलटणच्या सभागृहामध्ये सभापती कु. शिवांजली भोसले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या सभेत सर्व प्रथम पाठीमागील कालावधीत निधन पावलेल्या मान्यवरांस श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पद्मविभूषण लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबाबत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन,एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प फलटण, इत्यादी विभागांचा आढावा घेण्यात आला.रस्ते आणि स्वच्छता या मुलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक गावापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेऊन काम करण्यावर भर देण्याची चर्चा प्रामुख्याने सभागृहात झाली.शासन निर्णय ६ ऑगस्ट ...

रनरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.

Image
रनरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.  फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने. रणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था फलटण. यांच्या वतीन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती. निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेने च्यावतीने पाणी वाटप करण्यात आले .अतिशय उत्साहने कार्यक्रम पारपडला. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. श्री.इम्रान सिकंदर सय्यद .श्री. अतुल शाह खजिनदार सचिव मारुती टकले.श्री.कैफ शेख संचालिका श्रीमती. शाहीन शेख, सौ.रझिया शेख, सौ. माया बनसोडे, सौ. अनिसा सय्यद, सो. प्रीती शाह, सो. हिना सय्यद, सो.मंगल जाधव,सर्व पत्रकार परिषद डिजिटल मिडिया परिषद , भारतीय बौद्ध महा सभा संस्थाचे  अध्यक्ष उपध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते .सर्वांचे सहकार्य लाभले. खूप खूप ध्यानवाद

मुधोजी हायस्कूलमध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी.

Image
मुधोजी हायस्कूलमध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी. फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.  फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य मा श्री वसंतराव कृष्णा शेडगे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री आर एस नाळे, पर्यवेक्षक श्री आर बी निंबाळकर, यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक कार्य , शैक्षणिक कार्य , याच्यावर प्रकाश टाकला तसेच या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थी व मान्यवर मंडळींची क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या कार्याविषयी व त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानाविषयी त्यांचे कार्य आपल्या भाषणातून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . वनित...

डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण.

Image
डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने गोवा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली ही संघटना आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सात राज्यांत विस्तारलेल्या या संघटनेचे तब्बल १५ हजारांहून अधिक सक्रिय सभासद आहेत. संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन पणजी (गोवा) येथे पार पडणार असून, या अधिवेशनासाठी प्रमुख मान्यवरांपैकी एक म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सहसचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ वाघमोडे, मा...

महात्मा फुले समता परिषदेतर्फे जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण.

Image
महात्मा फुले समता परिषदेतर्फे जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण. फलटण प्रतिनिधी:  जुबेरभाई कोतवाल. राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने फलटण येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे डॉक्टर मयूर शिंदे - वैद्यकीय, कु. समशेर शिंदे - क्रीडा, विकास शिंदे- पत्रकारिता, सागर चव्हाण - पत्रकारिता, ज.तू. गार्डे - साहित्यिक, शुभांगी बोबडे- शिक्षण, शशिकांत सोनवलकर - शिक्षण, डॉ.वैशाली शिंदे- शिक्षण, किरण दंडिले - उद्योजक, आदित्य शिंदे, तुकाराम कोकाटे- साहित्यिक, अजय शेंडे- कृषी, नाजनीन तांबोळी, डॉ. अमित मोरे - लेखक व दिग्दर्शक आणि फुलेंची शाळा टीम यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हास्तरीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. “सत्यक्रांती दर्शन” या यूट्यूब चॅनेलवर “फुलेंची शाळा” या लघुचित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच बहु आयामी महात्मा ज्योतिबा फुले हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात...

2 लाख 25 हजारची सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे संतोष यादव यांनी केली परत.

Image
2 लाख 25 हजारची सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे संतोष यादव यांनी केली परत.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. रणसिंगवाडी तालुका खटाव येथे गावांमध्ये  ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी हे एक जागृत देवस्थान असून येथे गावातील सर्व मंडळी भैरवनाथ जोगेश्वरीची मनापासून सेवा करतात भैरवनाथाची यात्रा अष्टमीला धुमधडाक्यात होते या यात्रेनिमित्त भैरवनाथाची जोगेश्वरीची पालखी गावामधून मिरवणूक निघते यावेळी विठ्ठल बबन जाधव यांची लेझीम खेळताना दीड तोळ्याची सोन्याची चैन खाली पडली होती ती सोन्याची चैन   संतोष विलास यादव यांना सापडल्यानंतर त्यांनी ती सोन्याची चैन यात्रा कमिटीतील सदस्याजवळ दिली व ज्याची आहे त्यांना द्या असं ते म्हणाले येथील गावकऱ्यांची एक परंपरा आहे कष्टाने खाईन परंतु फुकटच खाणार नाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गावातील प्रतिष्ठित लोकांना मला एक वस्तू सापडलेली आहे. ती कोणाची आहे ती चौकशी करा विश्वास पाटील यानंतर ती त्यांना देऊन टाका असं सांगितलं संतोष यादव हे सामान्य कुटुंबातील असून ते मिस्त्री चे काम करतात परंतु कोणताही स्वार्थ न दाखवता भैरवनाथाच्या पालख...

समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव.

Image
समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव.  फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. अखिल भारतीय समता परिषद, लक्ष सातारा यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, साहित्य, पत्रकारिता व संशोधन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यात दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा सन्मान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत समाजहितासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभापती सौ. लता कर्णे, मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. प...

दौंड तालुक्यातील पत्रकार अक्षय देवडे यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान.

Image
दौंड तालुक्यातील पत्रकार अक्षय देवडे यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान. कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुल्ला. दौंड तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागाशी निगडीत विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आणि सातत्याने लेखन करणारे पत्रकार अक्षय देवडे यांना ‘ग्रामीण पत्रकारिता संघनायक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. ग्रामीण पत्रकारितेला बळ देणारे आणि समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या देवडे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मूकनायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेअर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ९९ व्या वर्षपूर्ती निमित्त तसेच साप्ताहिक संघनायकच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय देवडे यांनी मागील १२ वर्षांपासून दैनिक वृत्तपत्रात क...

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

Image
रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.  सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण .यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले .यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले .यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री .अतुल शहा श्री .इम्रान सय्यद अध्यक्ष बाळासाहेेे ननवरे.श्री.खजिनदार श्री.कैफ शेख सचिव श्री.मारुती टकले संचालिका माया बनसोडे सौ. प्रीती शहा सौ.रझिया शेख सौ. अनिसा सय्यद यावेळी उपस्थित होते.

मानव–बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी फलटण आणि कऱ्हाड च्या तरुणांनी बनवलेल्या उपकरणाला पेटंट.

Image
मानव–बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी फलटण आणि कऱ्हाड च्या तरुणांनी बनवलेल्या उपकरणाला पेटंट. फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. मोशन सेन्सिंग स्प्रे तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेला नवे बळ महाराष्ट्रातील फलटण येथील तीन तर कऱ्हाड येथील एका तरुण संशोधकांच्या टीमने मानव–बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी विकसित केलेल्या अभिनव उपकरणाचे  पेटंट अधिकृतरीत्या प्रकाशित झाले आहे.मोशन सेन्सिंग स्प्रे तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेला नवे बळ मिळाले असून  मानव बिबट्या संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने  विकसित करण्यात आलेले हे उपकरण ग्रामीण भाग, शेती परिसर तसेच जंगलालगतच्या वस्तीमध्ये बिबट्यांच्या वावरामुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.या उपकरणासाठी फलटण येथील चार तरुणांनी कऱ्हाड येथील मित्राच्या बरोबर पेटंट अर्ज दाखल केला होता. या अर्जाची नोंदणी ७ जानेवारी २०२६ रोजी झाली असून आता त्याचे अधिकृत पेटंट प्रकाशन झाले आहे.सातारा जिल्ह्यातील तरुण संशोधकांचा पुढाकार या संशोधनात सहभागी असलेले संशोधक हे सातारा जिल्ह्यातील वाठार निंबाळकर, आदर्की, भ...

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने मधुजी ज्युनिअर कॉलेज, हायस्कूल फलटण येथे अनेक विषयावर मार्गदर्शन.

Image
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने मधुजी ज्युनिअर कॉलेज, हायस्कूल फलटण येथे अनेक विषयावर मार्गदर्शन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. दिनांक 07/04/2026 रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या शाळेमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने  मार्गदर्शन आरोग्य , संस्कार व मोबाईलचे दुष्परिणाम ,याविषयी इयत्ता सातवी व आठवी विद्यार्थी - मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मधोजी हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे उपप्राचार्य माध्यमिक श्री .ए .वाय. ननावरे. उपप्राचार्य ज्युनिअर विभाग  श्री .सोमनाथ माने  ,पर्यवेक्षक श्री. रवींद्र नाळे ,पर्यवेक्षक सौ .पूजा पाटील ,पर्यवेक्षक श्री .आर बी निंबाळकर HOD सौ एच .यु .बुचडे .सौ हेमलता कदम .सौ कांचन शिंदे शालेय आरोग्य विभाग प्रमुख .यावेळी उपस्थित होते तसेच रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने, माजी प्रिन्सिपल सौ शाहीन शेख संचालिका कुमारी डॉक्टर सायली बगाडे .सौ रझिया शेख संचालिका  तसेच सचिव मारुती टकले .इमरान सय...

पणजी गोवा येथे डिजिटल मीडियाच्या 4 मे रोजी महाअधिवेशनाच्या तयारीची राष्ट्रीय अध्यक्ष :- राजा माने यांनी केली पाहणी.

Image
पणजी गोवा येथे डिजिटल मीडियाच्या 4 मे रोजी  महाअधिवेशनाच्या तयारीची राष्ट्रीय अध्यक्ष :- राजा माने यांनी केली पाहणी.  पुसेगांव प्रतिनिधी, पंकज कदम.  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल  पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन ...

प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर योगेश साळुंखे यांचे कौतुकास्पद कार्य.

Image
प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर योगेश साळुंखे यांचे कौतुकास्पद कार्य. फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. फलटणच्या घोडा यात्रेनिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या घोडा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला घोडा यात्रेदरम्यान कोणतीही आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने हे शिबिर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आले.या उपक्रमाचे नेतृत्व प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. योगेश साळुंखे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत वैद्यकीय पथकाने शिस्तबद्ध आणि तत्परतेने सेवा देत समाजाप्रती आपली निष्ठा आणि बांधिलकी अधोरेखित केली.वैद्यकीय तपासणी शिबिरादरम्यान सर्व सहभागींची प्रथम नोंदणी करण्यात आली. त्यानंतर रक्तदाब, शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके यांची तपासणी करण्यात आली. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य लक्षणांची सखोल तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांवर त्वरित औषधोपचार करण्यात आले.विशेष म्...

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा अजब कारभार.फलटण-तांबमाळ येथिल पालखी मार्गाचा ओढ्यातून काढलेला रस्ता धोकादायक

Image
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा अजब कारभार. फलटण-तांबमाळ येथिल पालखी मार्गाचा ओढ्यातून काढलेला रस्ता धोकादायक फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे–पंढरपूर पालखी महामार्ग प्रकल्पातील कामांबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पुणे कडून फलटण शहरात येणाऱ्या मार्गावर तांबमाळ येथील ओढ्यावर करण्यात आलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. ओढ्याला जास्त पाणी आल्यास हा रस्ता पाण्याखाली जाणार असून यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.तांबमाळ परिसरात ओढ्यावर असलेल्या पुलाखालून थेट रस्ता काढण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्याची रचना अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुण्याकडून फलटणमध्ये प्रवेश करताना प्रथम अचानक वळण, त्यानंतर ओढ्यातून जाणारा मार्ग आणि लगेच पुन्हा दोन वळणे अशी रचना असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.स्थानिकांच्या मते, या ठिकाणी सरळ आणि सुरक्षित मार्गाची आवश्यकता असताना अनावश्यक वळणे देऊन रस्ता काढण्यात आला आहे. ना...

राज्य संघटनेची सभा शिक्षक भवन पुणे येथे संपन्न.

Image
राज्य संघटनेची सभा शिक्षक भवन पुणे येथे संपन्न. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची सर्वसाधारण सभा व राज्य कार्यकारिणीची मिटींग पुणे येथे राज्यअध्यक्ष मधुकर जंगम यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.नेहमीप्रमाणे सर्वाच्यांच सोईच्या ठिकाणी शिक्षक भवन येथे घेण्यात आली.यावेळी अनेक ठराव करण्यात आले.ते याप्रमाणे सेवानिवृतांचे अधिवेशन एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात घेणे,प्रमुख पाहुणे ठरविणे,मुख्यमंत्री यानी सर्व जि.प.ला आपल्या संघटनेच्या मागणीनुसार मुबलक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदन ठराव, राज्यअध्यक्ष यानी सदर रक्कम उपलब्ध होण्यासाठी दिलेले योगदानाची नोंद घेवून त्यांचा अभिनंदन ठराव, लक्षमण दावणकर यांचे उत्कृष्ट स्मरणिका कामकाज करीत असल्याबद्दल अभिनंदन ठराव,सेवानिवृत पुरस्कार, राज्य कार्यकारिणी बाबत ठराव, स्मरणिका समिचीचे कामकाज,हायकोर्ट आढावा, गटविमा कामकाज,मनपा, नपाच्या समस्या यासह अनेक मुद्यांवर खेळीमेळीत चर्चा झाली व ठराव झाले. यावेळी राज्य सरचिटणीस गजानन नावकर,चंद्रपूरचे नेते विजय भोगेकर, राज्य उपाध्यक्ष लि...

योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती : हभप सुरेश महाराज सुळ.

Image
योगीराज हे संत चरित्र म्हणजे आनंदाची अनुभूती : हभप सुरेश महाराज सुळ. फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. सद्गुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या २०६ व्या समाधी सोहळ्या निमित्त त्यांच्या चंदना सारख्या कार्याची त्यांच्या गुणांची व सामर्थ्याची यथार्थ गाथा योगीराज या चरित्र ग्रंथातून मोठ्या अभ्यासातून व परिश्रमातून संत साहित्यिक रवींद्र वेदपाठक यांनी मांडली आहे संत चरित्रांनी समाजाला दिशा मिळते संत साहित्य म्हणजे आनंदाची अनुभूती असते असे प्रतिपादन ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांनी पिंपळवाडी ता फलटण येथे योगीराज या संत चरित्राचे प्रकाशन करताना सांगितले या कार्यक्रमासजेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे  साहित्यिक संपतराव टेंबरे प्रा अब्दागिरे  ,  साहित्यिक विकास ,सातारा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पुरी , हजारो भाविकांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना सुळ महाराज पुढे म्हणाले भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे महाराष्ट्रात तर संतांची मोठी परंपरा आहे संत या शब्दाचा अर्थ सत या शब्दापासून आलेला आहे सत् या शब्दाच...

फलटण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.आ.सचिन पाटील यांनी बांधावर जाऊन केली पाहणी पंचनामे करण्याचा प्रशासनाला दिले आदेश.

Image
फलटण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.आ.सचिन पाटील यांनी बांधावर जाऊन केली पाहणी पंचनामे करण्याचा प्रशासनाला दिले आदेश. फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फलटण तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्राचा आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी दौरा करून शेतीच्या नुकसानीची  प्रत्यक्ष पाहणी केली. फलटण तालुक्यातील तरडगाव, कापडगाव, चांभारवाडी, हिंगणगाव परिसराला शुक्रवारी (दि. ३) दुपारी अवकाळी पावसाने झोडपले. त्यावेळी झालेल्या गारपिटीमुळे ऊस, मका, कांदा, गहू या पिकांसह  फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती समजताच आमदार सचिन पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राचा दौरा करून, नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात आमदार पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांना धीर दिला.यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मंडलाधिकारी खाडे, धेंडे आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ...

डॉ. वैशाली शिंदे यांना 'राष्ट्रीय अशोक सन्मान' प्रदान.

Image
डॉ. वैशाली शिंदे यांना 'राष्ट्रीय अशोक सन्मान' प्रदान. 'वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन'च्या नॅशनल प्रेसिडेंटपदी नियुक्ती फलटण शहर प्रतिनिधी: -जुबेरभाई कोतवाल.  देशाच्या राजधानीतील सोहळ्यात फलटणच्या शैक्षणिक क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या व फलटण' च्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांचा त्यांच्या अष्टपैलू कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा असा  'राष्ट्रीय अशोक सन्मान' देऊन गौरव करण्यात आला. 'भारत गौरव रत्न श्री सन्मान अवॉर्ड - कौन्सिल'द्वारे आयोजित या 'ग्रँड सेमिनार 'मध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत - उपस्थित होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा आणि हरियाणाचे माजी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत डॉ. सौ. वैशाली शिंदे यांना हा - मानाचा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी डॉ. सौ. शिंदे यांच्या प्रदीर्घअनुभवाची आणि समाजहिताप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत त्यांची 'वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या...

महानुभाव पंथाच्या काशी असणाऱ्या फलटणमधील घोड्याच्या यात्रेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी.

Image
महानुभाव पंथाच्या काशी असणाऱ्या फलटणमधील घोड्याच्या यात्रेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. फलटण शहर प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. फलटण शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महानुभाव पंथाच्या पारंपरिक घोड्यांच्या यात्रेनिमित्त आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय महानुभाव भोपे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील ब. मठपती यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे या निवेदनानुसार, फलटण येथे महानुभाव पंथाची यात्रा दिनांक २ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली असून ९ एप्रिल २०२६ रोजी समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान देवाची पालखी आबा साहेब मंदिर, दगडी पूल, श्रीकृष्ण मंदिर आदी मार्गांवरून फलटण शहरातून काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल होत असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था, विजेची व्यवस्थाअसेल,त्याचबरोबर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने यात्रामार्गांच्या रस्त्याची दुरुस्ती असेल, पिण्याच्या पाण्याची सु...

बरड येथील जियो पेट्रोल पंपासमोरील अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू.

Image
बरड येथील जियो पेट्रोल पंपासमोरील अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू. फलटण प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल.  फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 03/04/2026 रोजी दुपारी 1.15 वा. बरड येथील जियो पेट्रोल पंपच्या समोर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला पाठीमागून मोटर सायकलची धडक झाली या भीषण अपघातात मोटारसायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना फलटणच्या सरकारी दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.तरी दि. 03/04/2026 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण जि. सातारा येथे सोपान गुलाबराव कदम वय वर्षे६४ रा.गुरसाळे ता माळशिरस जि सोलापूर यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चांगण करीत आहेत.

फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 25% पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या:- राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत.

Image
फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 25% पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या:- राष्ट्रीय एफ. पी.सी.  फेडरेशन संस्थापक संजय भगत.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर केल्या आहेत मात्र त्यांना व्यवस्थित व्यवसाय नसल्यामुळे त्या तोट्यात जाऊ लागल्या आहेत म्हणूनच आर्थिक प्राप्तीचा स्रोत म्हणून  देशात 25% इंधन पंप त्याबरोबरच गॅस एजन्सी आरक्षित कोटा फार्मर प्रोडूसर कंपनी यांना द्यावा अशी मागणी राष्ट्रीय एफ. पी. सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत यांनी  केली आहे.राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन ची स्थापना ही शेतकरी उत्पादक कंपनी ना आर्थिक आधार देणे, आर्थिक लाभाच्या दृष्टीने त्या कंपन्यांना विविध स्तरावर प्रशिक्षण देणे योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच वेगवेगळ्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देणे यासाठी करण्यात आली आहे असे संजय भगत यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारने आवाहन केल्या नंतर मागील पाच सात वर्षात मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोडूसर कंपन्यांची (एफ. पी. सी.) निर्मिती झाली व रजिस्ट्रेशन झाले मात्र क...

सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाचे राजकारण पुढे नेऊ:-उपसभापती अमोल सस्ते.

Image
सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाचे राजकारण पुढे नेऊ:-उपसभापती अमोल सस्ते.  फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व  राजे गटातील सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाचा राजकारण कायम चालू ठेवलं जाईल. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजे गटाने आजपर्यंत काम केले आहे ते मी पुढे घेऊन जाईन असे आश्वासन फलटण पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांनी पदभार स्वीकारताना दिले.यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना निंबाळकर , फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरआप्पा माडकर ,जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर , सह्याद्रीभैय्या  कदम , वैशाली कांबळे ,रूपाली सरगर , ज्योती मोरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. फलटण पंचायत समितीत शिवसेनेचा उपसभापती प्रथमच निवडला गेल्याने उपसभापती यांचा पदग्रहण सोहळ्यास शिवसेनेचे कार्य...

तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा.वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन.

Image
तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा.वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी  घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन. फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. फलटण:  फलटण वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीवरून काल रात्री सोनगाव सरडे गावच्या हद्दीतील  सोनगाव बंगला येथील श्री. शहा यांच्या बाहुबली फॉर्म हाऊस मधील पाळीव कुत्रा संशयित मृत अवस्थेत आढळून आला असता मा.वनक्षेत्रपाल फलटण श्रीमती एन. आर. बोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता त्यांनी असे अनुमान लावले की सदरचा हल्ला हा बिबट्याकडून झालेला दिसून येत आहे. तरी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सतर्क रहावे.घाबरून जाऊ नये असे आवाहन फलटण  वन विभागाचे वनपाल नितीन जगदाळे यांनी केले आहे.तसेच संशयित काही आढळल्यास  वन विभागाशी संपर्क साधावा. जगदाळे- 9665503999.यावेळी त्यांच्या समवेत  विशाल शिंदे वनरक्षक फलटण,ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे  सचिन जाधव व टीम उपस्थित होती.

दांभिकतेच्या उन्मदावर लेखणीच्या अस्वस्थ मनांचा हुंकार : फलटणला ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये लेखकांचा सूर.

Image
दांभिकतेच्या उन्मदावर  लेखणीच्या अस्वस्थ मनांचा हुंकार : फलटणला ३७ व्या  साहित्यिक संवाद मध्ये लेखकांचा सूर. फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.            ज्योतिबाच्या डोंगरावर पुजाऱ्यांनी भक्ताला लाथा बुक्यांनी तुडवल ,नाईकबा डोंगरावर नेमकं काय घडलं एकीकडं अंधश्रद्धेच्या दरबारात राजकीय नेते एका दहावी पास भोंदूबाबाचे पाय धुवू लागलेले. दुसरीकडं श्रद्धेच्या प्रांगणात अर्थात चक्क मंदिरात भक्ताला लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात पुजारी रमलेले. मंत्रोच्चाराची वाणी शिव्यांची लाखोली वाहू लागलेली.या दांभिक उन्मादाबद्दल लोकमत कोल्हापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी दांभिकतेचा उन्माद आपल्या लेखणीतून मांडला हाच दांभिकतेचा उन्माद विषयावर फलटण येथील ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये विचारमंथन करण्यात आले.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व जेष्ठ विचारवंत डॉ सुधीर इंगळे यांनी समाजात खरात सारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या शिक्षित आणि आर्थिक सक्षम घटकांवर ताशेरे ओढत याला आपली दांभिक मानसिकता जबाबदार असल्याचे सांगत लोकमत मधील लेखाचा दाखला देत आप...

महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रम; आमदार सचिन पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिवादन.

Image
महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रम; आमदार सचिन पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिवादन. फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल. भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी येथील महावीर स्तंभास भेट देत भगवान महावीरांना विनम्र अभिवादन केले.यावेळी जैन समाज बांधव, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी महावीर स्तंभावर पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व उपस्थितांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर असून त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये वैशाली येथे झाला. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली आणि सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य व अस्तेय या पंचमहाव्रतांचा संदेश दिला. “जगा आणि जगू द्या” हा त्यांचा मह...