कराड शहरांमध्ये वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार.सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले.
कराड शहरांमध्ये वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार.सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विद्यानगर कॉलेज परिसरात वाहतूक शाखेने अचानक विशेष मोहीम राबवली दरम्यान प्रामुख्याने ट्रिपल सीट, लायसन्स जवळ न बाळगणे, फॅन्सी नंबर प्लेट ,गाडी चालवताना मोबाईल वरून बोलणे , रैश ड्रायव्हिंग व सीट बेल्ट न लावणे व इतर वाहतूक नियम भंग करणे बाबत एकूण 79 केसेस करण्यात आल्या व त्यांच्याकडून तडजोड 70 हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आला आहे तसेच पाच फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री चेतन मछले यांनी दिली तर या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, तसेच सह फौजदार राजेंद्र घाडगे, पोलीस हवलदार संतोष पाटणकर, प्रशांत शेवाळे ,मनोज शिंदे ,विक्रम हसबे ,अश्विनी सूर्यवंशी मॅडम ,जयसिंग काटे ,सागर चव्हाण ,प्रशांत मोहिते, प्रकाश झिमुर ,शशिकांत घाडगे ,वर्षा भोसले ,पूजा पाटील व चालक विष्णू मर्ढेकर या अधिकारी व अंमलदारांनी भाग घेतला तसेच आगामी असणारे सण उत्सवाच्या अनुषंगा...