फलटण शहर व ग्रामीण भागात गौरींचे आगमण व स्वागत.
फलटण शहर व ग्रामीण भागात गौरींचे आगमण व स्वागत. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण शहर व ग्रामीण भागातील गिरवी, निरगुडी, दुधेबावी,जावली,गोखळी,बरड,राजूरी,जिंती, साखरवाडी,तरडगांव,आरडगांव, हिंगणगाव, सासवड, आदर्की,बिबी,ढवळ वाखरी दालवडी या संपूर्ण फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव काळात घरोघरी गौरींचे आगमन पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आणि प्रथा संस्कृतीनुसार आज थाटामाटात धार्मिक सांस्कृतिक वातावरणात आगमन व स्वागत केले.आज गौरी आवाहन,पुजन यामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घराघरात इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो!अशी प्रार्थना करतात. सोमवारी गौरी पूजन करतांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून मिष्ठान्न फळं गौरीच्या नैवेद्य सोबत ठेवतात.घरोघरी विद्युत रोषणाई आरास सजावट, रांगोळी पुष्परचना इत्यादी कामांत महिला व्यस्त असतात.विशेषत: गौरी सजावट रांगोळी पुष्परचना विद्युत रोषणाई यामध्ये महिलांच्या मध्ये चढाओढ लागलेली पहायला मिळते.महिला घरोघरी जाऊन गौरी देवदर्शना बरोबर आरास सजावट रांगोळी पुष्परचना विद्युत रोषणाई यांची पहाणी निरिक्षण करतात.काही ठिकाणी गौरी सजावट ...