Posts

Showing posts from October, 2024

तासवडे टोल नाक्यावर ९ किलो सोने व ६० किलो चांदी जप्त.

Image
तासवडे टोल नाक्यावर ९ किलो सोने व ६० किलो चांदी जप्त. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत कुरीयर कंपनीच्या गाडीची तपासणी करताना पोलिसांना ७ कोटी ५३ लाखांचे सोने व चांदी आढळून आली आहे. सोने चांदी चलनाप्रमाणे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी, पकडण्यात  आलेली कुरीयर कंपनीची गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली असून विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका हद्दीत  दि. २७ रोजीच्या सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास कराड ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावरील तासवडे टोल नाक्यावर एम.एच. १२ व्ही.एफ ३९३७ या क्रमांकाची कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली. वाहनाच्या चलनाची तपासणी केल्यानंतर गाडीत सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे आढळले. या वस्तू चलनाप्रमाणे आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी, सदरची गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली, ज्यामध्ये विविध तपासणी पथकांचे सहका...

संजयकाका पाटील यांच्या प्रचारात ठामपणे मैदानात -एड. स्वप्नीलभैया पाटील.

Image
संजयकाका पाटील यांच्या प्रचारात ठामपणे मैदानात -एड. स्वप्नीलभैया पाटील.  भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिनिशी संजय काकाच्या पाठीशी  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने,नवे कार्यकर्ते असतील, संजयकाका पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी झटण्याचे आवाहन  तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष एड. स्वप्नील भैया पाटील यांनी सावर्डे येथे बोलताना केले. ते सावर्डे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ इतर तालुक्यातील मतदार संघाच्या तुलनेत 35 वर्षे मागे गेला आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत मागे पडलेला आहे. येथील अपयशी लोकप्रतिनिधी मुळे मतदार संघातील जनतेला हाल अपेष्टाला सामोरे जावे लागत आहे. मतदारसंघात सगळा पोरखेळ चाललेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय आपल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. फक्त श्रेय घेण्याचे काम चालू आहे या ठिकाणी सर्व जुन्या जाणत्या नेत्यांना एकत्रित घ...

रक्तदाता हा देव नाही पण देवापेक्षा कमी ही नाही असे मत नॅशनल कॉन्फरन्स दिल्लीमध्ये आप्पासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केले.

Image
रक्तदाता हा देव नाही पण देवापेक्षा कमी ही नाही असे मत नॅशनल कॉन्फरन्स दिल्लीमध्ये आप्पासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केले. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन आणि जैविक राष्ट्रीय जैविक संस्थान यांच्यामार्फत राष्ट्रीय जैविक संस्था NIB नोएडा येथे तीन दिवशीय नॅशनल कॉन्फरन्स आणि वर्कशॉप याचा आयोजन केलं होतं.  या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये देश देशांमध्ये रक्त आणि रक्तदान या विषयावर ज्या काही प्रॉब्लेम्स येतात यावर चर्चा केली आणि केंद्र सरकारमधील प्रतिनिधी यांनी  उपाययोजना करण्यासंदर्भात मत व्यक्त केले तसेच रक्तदात्यांसाठी नॅशनल हेल्थ पॉलिसी संदर्भात विचार करण्यात येईल असे रक्तदाते आणि संस्था यांनी अनुमती देण्यात आली .स्वास्थ आणि परिवार कल्याण मंत्रालय NBTC डायरेक्टर श्रीकृष्ण कुमार सर  हे बोलले की नॅशनल हेल्थ पॉलिसी तयार करून लवकरच प्रत्येक रक्तदात्याला साठी लागू करण्यात येईल की ज्याचे शुल्क नॉर्मल असेल आणि त्या रक्तदात्याला त्याचा फायदा होईल.ह्या कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातून आप्पासाहेब घोरपडे (श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान) यांची निवड...

फलटण पंढरपूर महामार्गावर रानडे पेट्रोल पंपा शेजारी कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात.

Image
फलटण पंढरपूर महामार्गावर रानडे पेट्रोल पंपा शेजारी कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात. फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे.  फलटण पंढरपूर महामार्गावरील नाना पाटील चौकाच्या शेजारी रानडे पेट्रोल पंपा समोर कंटेनर ट्रक हा पवनचक्कीचे साहित्य घेऊन प्रवास करीत असताना चालकास अचानक विद्युत महामंडळाचे मेन लाईन तार दिसल्याने त्या तारेस पवनचक्की चे साहित्य अडकू नये म्हणून रस्त्याच्या साईड पट्टीवर कंटेनर ट्रक उतरवल्याने त्या ठिकाणी चढ उताराचे एकर असल्याने पहाटे 5 चे सुमारास कंटेनर पलटी होऊन अपघात झाला.असे चालक सांगत आहेत सदर महामार्गावर पहाटेच्या दरम्यान रहदारी कमी असल्याने अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

गोखळीचे माजी सरपंच मनोज उर्फ तात्या गावडे व उपसरपंच अभिजित जगताप यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.

Image
गोखळीचे माजी सरपंच मनोज उर्फ तात्या गावडे व उपसरपंच अभिजित जगताप यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण-तालुक्यातील पूर्व भागाचे युवा नेते तथा गोखळीचे तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच- मनोज (तात्या) गावडे व उपसरपंच-अभिजित जगताप यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्याने राजे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, श्री विलासराव नलवडे, श्री धनंजय दादा साळुंखे पाटील, श्री अभिजीत भैया नाईक निंबाळकर, श्री अशोकराव जाधव, श्री जयकुमार शिंदे,श्री महादेवराव पोकळे, श्री सचिन अहिवळे, श्री तुकाराम आबा शिंदे, श्री बाबु मामा शिंदे श्री पिंटू  ईवरे, श्री विशाल माने- देशमुख, श्री रणजित शिंदे, शिराज भाई शेख, श्री अमित रणवरे , सिराज भाई शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य खामकरला सुवर्ण पदक.

Image
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य खामकरला सुवर्ण पदक. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. पुसेगाव, ता. १९ : बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रेचा माजी विद्यार्थी व सध्या प्रतिभा निकेतन उच्य-माध्यमिक विद्यालय मुरुम, येथे शिकत असलेल्या आदित्य विजय खामकर या विद्यार्थ्याने सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांच्या साथीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. आदित्यच्या या यशाबददल राष्ट्रीय कुस्ती संघाचे  प्रशिक्षक जितेंद्र कणसे, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष कृष्णात फडतरे, मार्गदर्शक श्रीकांत वाड, शिक्षक, प्रशिक्षक व आदींनी त्याचे व सर्व टीमचे अभिनंदन केले. या टीममधील खेळाडूंची चेन्नेई येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळाची निर्मिती; महाराष्ट्रावर पुन्हा अतिवृष्टीचे सावट.

Image
बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळाची निर्मिती; महाराष्ट्रावर पुन्हा अतिवृष्टीचे सावट.   पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. देशातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, हा परतीचा पाऊस महाराष्ट्रातच रखडल्याने राज्यात काही ठिकाणी परतीचा पाऊस मोठे नुकसान करत आहे.त्यातच आता हवामान खात्याने बळीराजाची चिंता वाढवणारे वृत्त दिले आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याला ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचे सावट आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे. दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण हिंदुस्थानात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हिंदुस्थानसह बांगलादेश आणि म्यानमारवरही होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रासह दक्षिण...

पणदरे ता.बारामती येथील तुळजाभवानी तरुण मंडळ अहिल्यानगर यांच्यावतीने नवरात्रउत्सव निमित्य विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Image
पणदरे ता.बारामती येथील तुळजाभवानी तरुण मंडळ अहिल्यानगर यांच्यावतीने नवरात्रउत्सव निमित्य विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.  पणदरे ता. बारामती येथील तुळजाभवानी तरुण मंडळ अहिल्यानगर यांच्यावतीने नवरात्र उत्सव निमित्त सामाजिक. सांस्कृतिक व्याख्यानमाला  सामाजिक. शैक्षणिक. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कथाकथनकार  मा. प्रा. रवींद्र कोकरे सर. मा. वनाधिकारी राहुल निकम. ज्येष्ठ पत्रकार  मा. रवींद्र बेडकीहाळ. प्राचार्य मा. शांताराम आवटे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देवीची आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कथाकथनकार  मा. प्रा. रवींद्र कोकरे सर यांनी माणसं अशी का वागतात या विषयावर प्रबोधन केले. तर व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न झाल्यावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक वाटप करण्यात येथील असे म्हटले. तर मा. वनाधिकारी राहुल निकम यांनी कन्यारत्न हे धन असल्याचे प्रबोधन केले. त्यानंतर मा. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी अभिजात मराठी भाषा या विषयावर प्रबोधन केले. मा...

सहसंचालक दिलीप जगदाळे यांना आयएएस संवर्गात बढती.

Image
सहसंचालक दिलीप जगदाळे यांना आयएएस संवर्गात  बढती. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.    पुसेगाव, ता. १६ :  बुध  (ता. खटाव) येथील  दिलीप जगदाळे यांना नुकतीच आयएएस पदावर बढती मिळाली आहे. श्री. जगदाळे हे सध्या महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागातर्फे नुकतेच या बाबतचे गॅजेट राजपत्र जाहीर करण्यात आले आहे.  यावर्षी महाराष्ट्राच्या राज्य शासकीय नागरी  सेवेतील  तेवीस अधिकाऱ्यांना आयएएस संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये श्री. जगदाळे यांचाही समावेश आहे. जगदाळे यांनी त्यांचे शिक्षण बुध येथील नागनाथ विद्यामंदिर, दापोली व राहुरी कृषी विद्यापीठ , कर्मवीर पाटील मॅनॅजमेण्ट इन्स्टिटयूट सातारा, पुणे विद्यापीठ व सिम्बायोसिस विद्यापीठ येथून शिक्षण पूर्ण केले आहे.  त्यांनी यापूर्वी श्रीवर्धन व देवगड येथे तहसीलदार पदावर काम केले आहे. सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) व पंढरपूर येथे त्यांनी प्रांताधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समित...

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी.महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी. महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. संपादक,अकबर भालदार. *मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती*  रायगड, दि. ११ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.  वायुदलाचं सी-२९५ या विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई -३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी  विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई-३० या लढाऊ विमानानेही  फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी-२९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट,खा. श्रीरंग बारणे,खा. ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपसंपादक, नितीन घोरपडे. ठाणे, दि.11 - सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज वाशी, नवी मुंबई येथे काढले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.  त्यानंतर सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ, महाराष्ट्र भवन, नैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामे, ठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका), पश्...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. उपसंपादक, नितीन घोरपडे. 👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :* ✅   वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार ✅   सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता  ✅  महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा   ✅  कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय  ✅  राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता.  ✅  राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार  ✅  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ  ✅  सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार  ✅  केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक य...

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा.

Image
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली.

Image
राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली. उपसंपादक, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मुंबई, दि. 10 : - ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभ...

मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ.

Image
मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ. संपादक, अकबर भालदार. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग होणार कोल्हापूर, दि. ०९* : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आज अखेर १७ लाख २३ हजार ३०  इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी शुभारंभ झाल्याचे मुख्यमंत्र...

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारीकिल्ले वर्धनगड येथील वर्धनी मातेच्या यात्रेचा 11/10/2024 रोजी चा मुख्य दिवस.

Image
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारीकिल्ले वर्धनगड येथील वर्धनी मातेच्या यात्रेचा 11/10/2024 रोजी चा मुख्य दिवस. उपसंपादक :-नितीन घोरपडे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी वर्धनी माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ले वर्धनगड या किल्ल्यावरती या देवीचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे तसेच निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारा हा किल्ला आणि या किल्ल्यावरती असणारी वर्धनी माता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान नवरात्र उत्सवामध्ये या देवीला महाराष्ट्रातून हजारो भाविक येत असतात परंतु अष्टमी  शुक्रवार दिनांक 11 10 2024  देवीची यात्रेचा मुख्य दिवस आहे  या दिवशी गावातून पालखी किल्ल्यावरती नेली जाते व पालखीचे संपूर्ण किल्ल्यावरती मिरवणूक काढली जाते यावेळी देवीच्या समोर ललगुणचे असणारी कळसकर गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम देखील सुरू असतो तसेच देवीचे विविध मानकरी यावेळी उपस्थित असतात आणि हजारो भाविक देखील यावेळी किल्ल्यावरती उपस्थित असतात यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण वर्धनगड ...

काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळ मलठण येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Image
काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळ मलठण येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने . काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ, मलठण  होम मिनिस्टर खेळ पैठणी चा कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जिजामाला नाईक निंबाळकर व सौ मनिषाताई नाईक निंबाळकर या वेळी सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी अशोकराव जाधव हे आमचे घरातील एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांचे कार्यक्रमाला आम्ही सहकुटुंब येतो ते माझे सासरे लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे खास जवळचे सहकारी राहिले आहेत त्यामुळे आम्ही सर्व नाईक निंबाळकर कुटुंब त्यांचे मागे खंबीर पने उभे आहोत असाच संदेश दिला.या वेळी खाजदार रणजितसिहं नाईक निबाळकर यांच्या हस्ते देवी मातेची आरती करून कार्यक्रमांस सुरवात झाली. या कार्यक्रम प्रसंगी सहभागी झालेल्या प्रत्येक महिला स्पर्धकास नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव यांचे तर्फे पैठणी भेट देण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी 💥 लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे उजवे हात राहिलेले अशोकराव जाधव.सौ जिजामाला नाईक निंबाळकर. तसेच या मंडळाचे धडाडी...

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. छत्रपती संभाजीनगर, दि.६  :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने १५ हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पोलीस पाटील संघटनेने आभार मानले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  महादेव नागरगोजे तसेच अन्य...

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण.

Image
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर, दि.६ :- मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शि...

सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक.

Image
सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. पुसेगाव पोलीस ठाणे येथे सीसीटीएन प्रकल्पामध्ये दैनंदिन कामकाजाचे ऑनलाईन सादरीकरण  करावे लागते यामध्ये पोलीस ठाण्यास दाखल होणाऱ्या तक्रारी, गुन्हामधील  पंचनामे, चार्जशीट फाईल करणे, मोबाईल शोध तांत्रिक माहितीचे अवलोकन करून  पृथ्थकरण करणे गुन्हाचे अंतिम अहवाल व त्यांच्या निकालाबाबत अद्यावतीकरण करणे अशा सर्व गोष्टी अदयावतीकरण या सर्व गोष्टी अदयावत ठेवाव्या लागतात. असे सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सर्व पोलीस ठाण्याकडे कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यातून दर महिन्याला प्रथम क्रमांक येणाऱ्या पोलीस ठाणे इन्चार्ज व अंमलदार यांचे अभिनंदन करण्यात येते सन सप्टेंबर 2024 मधील सीसीटीएनएस कामकाजामध्ये पुसेगाव पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबाबत दिनांक 5.1O .2O24 रोजी क्राईम मीटिंग दरम्यान पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख यांच्या हस्ते पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण व सीसीटीएनएस कामकाज पाहणारे अंमलदार अमृता चव्हाण यांना बक्षीस प्रमाणपत्र घेऊन सन्मान क...

उमेद चे ग्रामविकास अंतर्गत स्वतंत्र विभाग करू: - आमदार महेश शिंदे.

Image
उमेद चे ग्रामविकास अंतर्गत स्वतंत्र विभाग करू: -    आमदार महेश शिंदे. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. वेटणे .तालुका .खटाव येथे समर्पित व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या उमेद अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमीत विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देवून उमेद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे आणी समुदाय संसाहान व्यक्ती यांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा यासाठी उमेदच्या महीला,  सी आर पी बँक सखी, कृषी सखी यांनी ना. महेशजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ना महेशजी शिंदे यांनी उमेदच्या सर्व न्याय मागण्या पुर्ण करु असे अश्वासन दिले. यावेळी खटाव तालुका उमेद महीला व कर्मचारी संघटनेचे अध्यक्षा सौ. विद्या भोसले, जिल्हा सचीव सौ. विदया घाडगे, प्रभाग समन्वयक ज्योती गायकवाड, तसेच सर्व सीआरपी बँक सखी, कृषी सखी व बचत गटातील महीला उपस्थित होत्या.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत महाराष्ट्रात ८४ लाख कुटुंबांचे वंचीत कुटुंबांचे संघटन करून त्यांचे समुह, ग्रा...

महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. *ठाणे, दि.५:-*  सिंचनापासून ते पायाभूत सुविधापर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणूकीपासून ते झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,  महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पर...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार.

Image
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुंबई दि. 5 - भाषा ही फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला.  केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह मान्यवर साहित्यिक आणि कलावंत उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.

Image
आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुंबई दि. ५:  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन ३, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या च्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या वाहतुकीला गती देणाऱ्या मेट्रो ३ च्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाले.तसेच मुंबई व ठाणे परिसरातील ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण करण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ५ सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण.

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ५ सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. वाशिम, दि. ५ : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण.

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद वाशिम, दि. 5 :* बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. 👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :*  ✅ राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ✅ महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार ✅ दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन ✅ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार ✅ टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव ✅ पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन ✅ प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद ✅ राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ. ✅ राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण. ✅ संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार. ✅ लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांत...

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू.

Image
कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. सुमारे २३९९ कोटींचे वाटप पहिल्या टप्प्यात 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.

सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Image
सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर सातारा, दि.29 :  महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या  जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणाा घेऊन महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील 289 कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी   आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याच...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. 👉🏻 *मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :* ✅  कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू ✅  ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ✅  ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता ✅  ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता ✅  ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार ✅  देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. ✅  भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार ✅  रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा ✅...

विटा बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन.

Image
विटा बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. सांगली दि. १ : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी, सुविधायुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी बापू पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जि. प. सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर,  आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.     ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन.

Image
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. --------- ⁠टेंभू योजनेला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर सांगली, दि. १  : टेंभू विस्तारित प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेस दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजनानंतर विटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभू योजनापूर्तीसाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यां...