Posts

Showing posts from June, 2023

लिफ्ट 1 लिफ्ट 2 चे उद्घाटन म्हणजे सर्जिकल स्ट्राइक युवा नेते धीरज जाधव.

Image
लिफ्ट 1 लिफ्ट 2 चे उद्घाटन म्हणजे  सर्जिकल स्ट्राइक युवा नेते धीरज  जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. खटाव दुष्काळग्रस्त तालुक्यास वरदायनी   ठरणाऱ्या जिहे कटापुर  योजनेचे  पाणी आ.  महेश  शिंदे  यांनी  नेर  तलाव्यात आणल्याने खटाव  तालुक्यात आनंदाचे  वातावरण  असतानाच   अचानक  खटाव  तालुक्यातील  उत्तर भागा  साठी   आखलेल्या   लिफ्ट 1 लिफ्ट 2 आणि लिफ्ट 3  पैकी  लिफ्ट 1 व लिफ्ट 2 या योजनांचे  उद्घाटन घेऊन  आ. महेश  शिंदे  यांनी  कोरेगाव  विधान  सभा  मतदार  संघातील    सर्जिकल स्ट्राइक केली असल्याचे युवा नेते धीरज जाधव यांनी सांगितले  तर राष्ट्रवादी कांग्रेस सारखे  विरोधक  चिंताग्रस्त  झाले  आहेत जिहे कटापुर  उपसा  जलसिंचन  योजना कोणी पूर्ण केली, कोणी किती निधि  आणला ,   या योजनेस  अडथळा  ठरणाऱ्या रेल्वे  क्रोसिंग चा  विषय...

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळ मुक्त धरण जल युक्त शिवार योजनेचा केला शुभारंभ.

Image
मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळ मुक्त धरण जल युक्त शिवार योजनेचा केला शुभारंभ.               पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी आपल्या मुळ गावी  दरे येथे दाखल झाले असुन त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरीकांच्या समस्यांचा निपटारा करत  शेतीत रमत वक्षांची लागवड केली गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला.जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ कोयना जलाशयामध्ये गाळाची भर आधीक होऊ लागली असुन हि सुपीक गाळ युक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असुन शेतकर्‍यांनी हा गाळ माती काढुन आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधीक बळ मिळेल तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुंख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कांदाटी खोऱ्यातील युवकांच्या रोजगारासाठी व्हिजन तयार करा मुंख्यमंत्री यांनी जिल्हाप्रशासनाची बैठक घेऊन कांदाटी खोऱ्यासह या विभागातील युवकांना रोजगारासाठी शहराकडे जावे लागु नय...

कोरेगाव शहरातून चांगले प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठी प्रयत्नशील : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप.

Image
कोरेगाव शहरातून चांगले प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठी प्रयत्नशील : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा आहे. या शहरातून अधिकाधिक चांगले विद्यार्थी घडावेत, त्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत. जे भविष्यकाळात माय भूमीची सेवा करतील, या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.वात्सल्य सिंधू मातोश्री स्व. सिंधुताई फत्तेसिंह बर्गे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या शाळेत आपण बाराखडी गिरवली त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मंगळवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध दरबार उद्योग समुहाच्यावतीने मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श...

विद्यार्थ्यांचे वाजत गाजत प्रभातफेरी काढून नवागातांचे शाळेमध्ये स्वागत.

Image
विद्यार्थ्यांचे वाजत गाजत प्रभातफेरी काढून नवागातांचे शाळेमध्ये स्वागत.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. निढळ- रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय निढळ तालुका खटाव येथे सन 2023 24 शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी वर्ग सजावट व शाळा सजावट करण्यात आली होती गावातून प्रभात फेरीने कार्यक्रमास सुरुवात झाली प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजनाने नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन नवागातांचे स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी गोड खाऊचे वाटप करण्यात आले विद्यालयातील उपशिक्षक जाधव आर एन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला विद्यालयाचे मुख्याध्यापक निर्मळ जे एस यांनी विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन उपस्थितांचे...

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा :आशिष बैसवारे.

Image
बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा :आशिष बैसवारे.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कातळगेवाडी येथें स्टेट बँकेचा ग्राहक ,शेतकरी व सर्व नागरीकांनी स्टेट बँक मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय व सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा . सध्या अपघाताचे प्रमाण पाहता सर्वाना विमा गरजेचा आहे  .बँकेने ग्राहक सेवा केंद्रा मार्फत आपल्या अनेक सेवा सुरू केल्या आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया चे पुसेगाव व निढळ येथे ग्राहक सेवा केंद सुरू आहे.त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा .या केंद्रात नवीन खाते उघडणे ,पैसे भरणे ,पैसे काढणे ही कामे केली जातात. ही केंद्र अधिकृत आहेत . स्टेट बँके मार्फत सुरू असलेल्या शेतकऱ्यां साठी  असणाऱ्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा  असे   शाखाधिकारी आशिष बैसवारे यांनी सांगितले.स्टेट बँक ऑफ इंडिया  व ग्रामस्थ यांचे वतीने  कातळगेवाडी ता खटाव येथे ग्राहक मेळावा संपन्न झाला .यात स्टेट बँकेच्या सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देण्यात आली. तसेच ग्राहकांच्या शंका व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली  प्रास्ताविक विलास कुलकर्णी यांनी केले .यावेळी शाखाधिकारी...

रक्तदान शिबिर च्या माध्यमातून आम्ही सातारकर सामाजिक संस्था चा उपक्रम सर सेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन.

Image
रक्तदान शिबिर च्या माध्यमातून आम्ही सातारकर सामाजिक संस्था चा उपक्रम सर सेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन.  विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.  आम्ही सातारकर सामाजिक संस्था . या संस्थेमार्फत खूप सारे उपक्रम राबवले जातात.  सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या 326 व्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सातारकर सामाजिक संस्था आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान (हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य )भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते .रक्तदान शिबिर साठी आप्पा  घोरपडे यांचे चांगले सहकार्य लाभले. यशस्वी शिबिरामध्ये ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना पाच लाखाचा एक वर्षाचा अपघाती विमा देण्यात येणार आहे.या रक्तदान शिबिरासाठी आणि आरोग्य शिबिर साठी सामाजिक क्षेत्रामधील विविध मान्यवर हजेरी लावली आणि अनोख्या रक्तदान शिबिर चे अभिनंदन केले. रक्तदान शिबिर साठी आम्ही सातारकर सामाजिक संस्था मधील सर्व पदाधिकारी सभासद इतर सर्व यांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केले . रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग होता. रक्तदान केले त्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्म...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लातूर विविध पुरस्काराचे वितरण निलंगा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची निवड.

Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लातूर विविध पुरस्काराचे वितरण निलंगा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची निवड.    कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक डी.टी आंबेगावे, प्रमुख पाहुणे म्हणून लातूर LCB पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, त्यासोबतच संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,महिला अध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी आणि नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विव...

आ. शशिकांत शिंदे यांनी नवीन मतदार संघ शोधावा युवा नेते धीरज जाधव.

Image
आ. शशिकांत शिंदे यांनी नवीन मतदार संघ शोधावा  युवा नेते धीरज जाधव.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. कोरेगाव मतदार  संघातील जनतेने   आमदार शशिकांत शिंदे  यांचे  पार्सल जावळीला परत पाठवल  आहे.  सध्या  कोरेगाव  मतदार  संघाशी त्यांचा  काहीही  संबंध  राहिलेला नसताना  ते  मतदार  संघातील जनतेत संभ्रम  निर्माण करण्याच  काम  करत आहेत.  जिहे कटापुर  उपसा  जलसिंचन  योजना  महेश  शिंदे   यांनीच पूर्ण केली  आहे  हे   कोरेगाव  मतदार  संघातील जनतेला  कोणी वेगळ  सांगन्याची  गरज नाही.   आमदार  शशिकांत शिंदे  यांनी  आमदार  महेश  शिंदे  यांच्याशी  समोरा  समोर बसून जिहे कटापूर साठी  कोणी किती निधि  आणला  याची  चर्चा  करण्या पेक्षा  नवीन मतदारसंघ  शोधन्यावर  चर्चा  करा  आमदार महेशदादा  शिंदे  तुम्हाला...

मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी उत्साहात पार पडली.

Image
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी उत्साहात पार पडली.  विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. दरवर्षी प्रमाणे मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ( रजि ) परिवार अयोजित जगदगुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त वारकरांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप वर्षे 12वे रविवार दिनांक ११/०६/२०१७ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत  मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळेस संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई,पुणे,सातारा वरून संस्थेचे पदाधिकारी, सदस्य,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कॅम्पसाठी Dr अमोल,Dr  लिना,Dr स्नेहल तसेच इतर मेडिकल स्टापचे योगदान महत्वाचे ठरले,कार्यक्रमासाठी संस्थेचे पुणे जिल्हा प्रमुख स्वप्निल घोडके,तानाजी मोलाने,सचिन जाधव मुंबईवरून सचिव महेंद्र जाधव,सरचिटणीस रमाकांत बने,खजिनदार गौरव डंगारे,पदाधिकारी हेमंत वाडकर,गोपाळ मोरे,शिरीष संकपाळ,अनिकेत वाडकर,सर्वेश परब,सिध्देश भणघे,  प्रतिक घनवट,सरिता वाडकर,दर्शना शेलार,नेहा शेळके, ...

सातारा पंढरपूर रस्ता दुरवस्था, भीमनगर दरेला जमिन मोबदला प्रश्न प्रलंबित रमेश उबाळे यांचा शासनावर आरोप, दि.१० जुलैपासून आमरण उपोषण.

Image
सातारा पंढरपूर रस्ता दुरवस्था, भीमनगर दरेला जमिन मोबदला प्रश्न प्रलंबित रमेश उबाळे यांचा  शासनावर आरोप, दि.१० जुलैपासून आमरण उपोषण.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामध्ये गेलेल्या भीमनगर, दरे (ता. कोरेगाव) या गावांतील जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळाल्याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊन, ठिय्या आंदोलन करूनही न्याय न मिळाल्यामुळे तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दहा जुलैपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.श्री. उबाळे यांनी 'भीमनगर, दरे'प्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयास तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाबाबत पंतप्रधान कार्यालयास प्रशासनामार्फत स्वतंत्रपणे निवेदने दिली आहेत. 'भीमनगर, दरे' संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की  पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या सध्या सुरू असलेल्या कामामध्ये भीमनगर, दरे या गावांतील ३५ खातेदारांच्या शासनाकडून...

कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पदभार स्वीकारला.

Image
कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पदभार स्वीकारला.    पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कोरेगाव येथे कार्यालय असलेल्या सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र धैर्यशील शेळके यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व उपनिरीक्षक विजय जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजेंद्र शेळके हे लोणंद, तालुका खंडाळा येथील रहिवासी आहेत. नुकतीच त्यांना पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.१९९२ बॅचचे ते पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी विविध ठिकाणी उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ कामकाज केले आहे. शुक्रवारी दुपारी ते सातारा पोलीस मुख्यालयात हजर झाले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतल्यानंतर ते कोरेगावात दाखल झाले. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा पोलीस दलामार्फत कारभार केला जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशी ग्वाही राजेंद्र शेळके यांनी दिली.

कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पदभार स्वीकारला; कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही.

Image
कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी  पदभार स्वीकारला; कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  कोरेगाव येथे कार्यालय असलेल्या सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र धैर्यशील शेळके यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व उपनिरीक्षक विजय जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजेंद्र शेळके हे लोणंद, तालुका खंडाळा येथील रहिवासी आहेत. नुकतीच त्यांना पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.१९९२ बॅचचे ते पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी विविध ठिकाणी उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ कामकाज केले आहे. शुक्रवारी दुपारी ते सातारा पोलीस मुख्यालयात हजर झाले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतल्यानंतर ते कोरेगावात दाखल झाले. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा पोलीस दलामार्फत कारभार केला जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशी ग्वाही राजेंद्र शेळके यांनी दिली.