कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील मुतारीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी.
कोरेगाव प्रतिनिधी -अज्जू मुल्ला.
कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील 30 वर्षांपूर्वी बांधलेली मुतारी दुर्दशा झाली असून या मुतारीमुळे दुर्गंधी पसरली असून या परिसरातील राहणाऱ्या लोकांना तसेच या मंदिरा परिसरामध्ये नगरपंचायतीच्या वतीने बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बाकड्यावरती बसणाऱ्या आबाल वृद्धांना या मुतारीच्या दुर्गंधी पासून आरोग्यास धोका निर्माण झाला असून या मुतारीचे बांधकाम नव्याने करण्याची विनंती कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने मुख्याधिकारी कोरेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोरील चौथाई गल्लीमध्ये असणाऱ्या या मुतारी मध्ये दुर्गंधी पसरले असून , या मुतारीच्या फरश्या निघाल्या आहेत तसेच वरील पत्रा संपूर्ण फुटल्यामुळे लघवी करण्यास उभे राहिले असता वरून पाणी अंगावर टपकत असते, ही मुतारी रस्त्याच्या कडेला असल्याने येना जाणाऱ्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून लघु शंका करणाऱ्या लोक या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांनाही दिसत आहे, या परिसरातील ही एकमेव अशी मुतारी दोन-तीन वार्ड मध्ये वापरली जाते. तसेच भैरवनाथ मंदिरामध्ये लग्नकार्य तसेच विविध समारंभ होत असतात त्यावेळी याच मुतारीचा वापर केला जातो,सदर या मुतारीच्या बाबतीमध्ये नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन या मुतारीचे नूतन बांधकाम तातडीने करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून, याबाबत विचार न केल्यास होणाऱ्या परिणामास नगराध्यक्ष मुख्याधिकारी जबाबदार राहतील असेही या निवेदनात नमूद केले आहे .
Comments
Post a Comment