फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत. यातील दोन धबधबे हे धुमाळवाडी या ठिकाणी आहेत. धुमाळवाडी चे वैशिष्ट्य म्हणजे फळांचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच पाचकुंड व नऊकुंड नावाचे दोन मोठे धबधबे येथे आहेत. या ठिकाणी हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. तसेच जावली गावाशेजारी एक मोठा धबधबा आहे. परंतु या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगली व फळांची झाडे होती. ती जवळपास सर्व नष्ट झाल्यात जमा झाली आहेत. त्या ठिकाणी काही वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धबधब्याला भेटी देणाऱ्या काही पर्यटकांकडून काही फळे तोडली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या मोठ्या तिन्ही धबधब्यांकडे पर्यटन विभाग, वनविभाग व महाराष्ट्र सरकारने लक्ष दिले तर या तिन्ही ठिकाणी जर कोणी अतिक्रमण केले असल्यास त्या जमिनी वन विभाग व महाराष्ट्र सरकारने तात्काळ ताब्यात घ्याव्यात आणि अतिक्रमण नसल्यास त्या शेतकऱ्यांच्या फळझाडांना संरक्ष...