सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त 231 वि जयंती फलटण येथे उत्साहात साजरी.

सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त 231 वि जयंती फलटण येथे उत्साहात साजरी. 

फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. 

फलटण-इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देशाला मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे थोर  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिना निमित्त  231 सावी जयंती फलटण शहरात ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनेत्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी ह्यूमन राईट कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब उर्फ नाना यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती सांगितली शिवछत्रपतींच्या काळापासून रामोशी समाजातील थोर व्यक्तींचा सहभाग दिसून येत आहे. असे सांगून छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यासारखी रामोशी समाजाचे नेतृत्व गुण कौशल्य प्राप्त थोर व्यक्तिमत्व असणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना सात सप्टेंबर जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून यांच्या देशभक्तीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगितले. तद्नंतर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री रणधीरजी  भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 18 57 आगोदर लढा उभा केला परंतु इतिहासकारांनी म्हणावी अशी दखल घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याच बरोबर इतिहासकारांनी 1857च्या नंतरच्या लढ्याला ज्यादा महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता भारत देशातील इंग्रजांच्या विरोधाचा बंड अथवा लढा करण्याचे श्रेय फक्त आणि फक्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना दिले पाहिजे. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी श्री छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. राजे उमाजी नाईक यांचे कार्य व घेतलेले कष्ट याबाबतची माहिती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाही. राजेंची माहिती देशभर पोचविण्याचे कार्य इथून पुढे सदैव करित राहणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कमिटीतील संपर्क अधिकारी निशिकांत अहिवळे व फलटण तालुका अध्यक्ष श्री आनंदराव भोसले साहेब यांनी केले. या कार्यक्रमास कमिटीतील महावीर होरा. संपत गुंजवटे. प्रवीण अहिवळे. दादा दळवी.वाघमारे साहेब.राजेंद्र मदने. दिलीपराव ननवरे साहेब नेरकर साहेब.भीमराव बापू भोसले. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बंडू उत्तम अहिवळे. इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उमाजी नाईक चौकातील समाजसेवक श्री व्यंकट हरी मदने यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.