उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची - डॉ . श्री सुरेशराव जाधव.

उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची - डॉ . श्री सुरेशराव जाधव.     

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  
                               पुसेगाव - शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना उपक्रमशील  व कृतीप्रवण बनवा . त्यांच्यातील न्यूनगंड दूर करा .  विद्यार्थ्याची संशोधनवृत्ती वाढीस लावून त्यांना विज्ञाननिष्ट बनवा . नवनिर्मीतीची जाणीव निर्माण करा . उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड महत्वाची आहे . आदर्श व समाजप्रवण विद्यार्थी घडवून या संस्थेतील गुरुजणांनी संस्थेचा गौरव वाढवला आहे . शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी हे त्या शाळेचे , संस्थेचे तसेच समाजाचे भूषण असतात असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या संस्थेचे अध्यक्ष व सातारा जिल्हा काँगेस कमिटी अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले ते संस्थेने आयोजित केलेल्या आजी माजी गुरुजनांचा सत्कार व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी गौरव समारंभात बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा श्री श्रीधर साळुंखे यांनी संस्थेच्या विविध उपकमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी दूरध्वनीवरून निवृत्त गुरुजनांना शुभेच्छा दिल्या तसेच शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व मार्गर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . यावेळी विश्वस्त श्री विष्णू खटावकर , माजी प्राचार्य श्री . श्रीधर जाधव , श्री माळी एच . टी . यांनी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास संस्था सचिव  मोहनराव जाधव ,  विश्वनाथराव जाधव ,  योगेशराव देशमुख , के . डी . पवार संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  विविध शाखांचे प्राचार्य , मुख्याध्यापक उपस्थित होते . सौ स्वाती बर्गे ,  फिरोज मोमीण ,  श्री गुरव सर व आरती माळी यांनी सूत्रसंचालन केले . अशोक वळवी यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.