राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत बैठक.
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत बैठक. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील.त्या साठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदे समवेत लवकरच बैठक आयोजित करू,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे मुक्कामी आहेत.राजभवन येथे प्रथमच त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या सूचनेनुसार या पत्रकार परिषदे दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक सरकारे आली आणि गेली पण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही .मराठी पत्रकार परिषद ही एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी संघटना आहे.३६ जिल्हे व ३५० तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत.पत्रकारांच्या प्रश्नांना व...