धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने वृक्षारोपण उत्सहात संपन्न.
धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने वृक्षारोपण उत्सहात संपन्न. फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे. धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजी राजे महाविद्यालयाच्या उद्यानकन्या यांनी धुळदेव येथे २४ सप्टेंबर ,वार रविवार रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाची कल्पना गावातील नागरिकांना अगोदर दिली गेली होती.गावांमध्ये दोन दिवस अगोदर वृक्षारोपण संदर्भात घरोघरी जाऊन गावकऱ्यांना आमंत्रण दिले गेले होते.या आमंत्रणाचा मान ठेऊन गावकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमामध्ये दशरथ कर्णे,सचिन महामुनी या सारख्या प्रौढ नागरिकांनी तसेच प्रमुख पाहुणे मा.प्रा.वसंतराव मोरे यांनी आपली उपस्थिति दर्शवली होती .विठ्ठल जाधव च्या हस्ते पाहिले वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपण समारंभामध्ये गुलाब,जांभूळ,नारळ या सारख्या झाडांचा समावेश होता. गावकऱ्यांनी खुश होऊन उद्यांकन्यांना तुमच्या नंतर ही आम्ही या झाडांची काळजी घेऊ हे आश्वासन दिले.