जुन्या भांडणाच्या रागातून कोरेगावात मोटरसायकल जाळली ;

जुन्या भांडणाच्या रागातून कोरेगावात  मोटरसायकल जाळली ;

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 

जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरासमोरील उभी असलेली एक्टिवा मोटरसायकल कोरेगाव येथील विशाल बर्गे याने रात्रीच्या वेळी पेटवून दिली, पेटलेली दुचाकी पाहताच दुचाकी एक्टिवाची मालक असलेल्या समीना कुरेशी यांनी विशाल बर्गे चे नाव घेतले म्हणून, विशाल ची आई चित्रलेखा बर्गे व वडील चंद्रकांत बर्गे यांनी दमदाटी करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार कोरेगाव पोलीस स्टेशनला समीना कुरेशी यांनी दिली असून घटनेचा तपास कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सनी आवटे करीत आहेत.कोरेगाव येथील चौथाई गल्ली मध्ये राहत असलेल्या समीना व शाहिद कुरेशी सातारला आपल्या चारचाकी वाहनातून मुलीला व जावयाला सोडून येत असताना, घरासमोर आल्यानंतर रात्री साडेबाराच्या दरम्यान विशाल बर्गे सिगारेट ओढून, त्याने माझ्या मोटरसायकलच्या फाटलेल्या सीटवर काहीतरी टाकून जुन्या केसचा राग मनात धरून हातातील लाईटरने माझ्या घरासमोरील लावलेली ऍक्टिवा फोर जी एम एच 11 सी एन 17 99 ही मोटरसायकल पेटवून देत असल्याचे पाहिले, माझ्या चार चाकी गाडीच्या लाईटच्या उजेडात तो तिथून पळून गेल्याचे दिसले,त्यावर विशालने माझी गाडी जाळली म्हणूनमी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून  आमच्यासमोर राहणारे विशाल बर्गेचे  आई-वडील चित्रलेखा बर्गे व चंद्रकांत बर्गे बाहेर आले, माझ्या मुलाचे नाव घेत आहे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. सदर या घटनेमध्ये मोटर सायकल पूर्ण जळून गेली आहे. सदर याची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला कुरेशी यांनी दिली असून पुढील तपास कोरेगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.