खटाव येथील येरळा नदीमध्ये वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेल्याने मृत्यू.

खटाव येथील येरळा नदीमध्ये वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेल्याने मृत्यू.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

खटाव नजीक येरळा नदीच्या पात्रात भिकू पाटोळे वय 60 वर्ष अचानक आलेल्या नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्याने मयत झाले असल्याची तक्रार पुसेगाव पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपास पुसेगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
 दिनांक अकरा रोजी दुपारी बारा वाजता शिरस वस्ती, खटाव येथील भिकू अकोबा पाटोळे वय 60 वर्ष गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांनी नेहलेल्या  गुरांपैकी एक म्हैस घरी परत आली परंतु भिकू पाटोळे व इतर गुरे परत न आल्याने, नारायण वसंत पाटोळे, बंधू दीपक भिकू पाटोळे व भावकीतील संजय गोविंद पाटोळे व संजय भिवा जाधव सगळ्यांनी मिळून त्यांचा शोध शिरस वस्ती शिवारात घेतला, परंतु ते सापडले नाहीत त्यानंतर दिनांक 12 रोजी शोध घेत येरळा नदीच्या पात्राकडे गेलो असता, नदीपात्राचे पाण्यात भिकू अकोबा पाटोळे हे  उताणे  पडलेल्या अवस्थेत दिसून आले. व एक रेडकु नदीपात्र्याचे पाण्यात वाहून जाऊन शेजारी उभे होते व बाकीची गुरे आजूबाजूला चरत होती. जवळ गेले असता भिकू पाटोळे मयत झाले असल्याचे समजले. सदर याबाबतची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली, प्राथमिक तपासाच्या अंदाजानुसार भिकू अकोबा पाटोळे वय 60  वर्ष येरळा नदीच्या काठाने घरी येत असताना येरळा नदीला पूर आल्याने ते प्रवाहात वाहून गेल्याने मयत झाले असल्याचे निदर्शनात आले. सदर याबाबतची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.