श्री गणेश उत्सव निमित्त चिमणगाव येथे कुस्ती मैदान उत्सहात संपन्न.
चिमणगाव प्रतिनिधी. दत्ता सावंत.
चिमणगाव ता. कोरेगाव येथे सालाबादप्रमाणे श्री गणरायाचे आगमन करते वेळी चिमणगाव ग्रामस्थ यांनी एक गाव एक गणपती असी प्रता व एकतेच प्रतीक जपत या उत्सहात कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.या कुस्ती मैदानाचा आनंद या पंच क्रोशीतुन तसेच भाहेरून सर्व भाविक भक्त व मल्य यांनी उपस्थिती दिली. यावेळी या कुस्ती मैदानात लहान गटापासून ते मोठया गटा पर्यंत 100रु.ते 1 लाख रु.असे बक्षिस ठेवण्यात आले होते. या कुस्ती मैदानाचा मल्य (पैयलवान )मा. दत्ता नारळे यांनी एक लाख रु. निकाली कुस्ती करून मानकरी ठरले.त्यामुळे नारळे यांचे पंचक्रोशीतुन कौतुक करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी कुस्ती मैदानाला निकाली कुस्ती करने करिता मल्य प्रणव सरक पुणे.नारळे कोल्हापूर. दिग्विजय जाधव सुकणे. भैया चव्हाण पिंपरी. रामा धायगुडे लोणंद त्याचबरोबर पंचक्रोशितील भाविक भक्तांनी उपस्थिती देऊन आनंद घेत शोभा वाढविली त्याबद्दल चिमणगाव ग्रामस्थ यांनीसर्वांचे अभिनंदन करून सदरचे मैदान उत्सहात संपन्न करण्यात आले.
Comments
Post a Comment