पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती उत्तर कोरेगाव भारतीय जनता पार्टी तर्फे उत्साहात साजरी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त उत्तर कोरेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने पिंपोडे बुद्रुक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
सेवा सप्ताहानिमित्त दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रदर्शित होणाऱ्या मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते.२५ सप्टेंबर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय जनसंघाचे अध्यक्ष मा.पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्री डॉ. भागवत कराडकर यांचे स्वीय सहाय्यक मा.अमितजी चव्हाण यांनी दिली. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी , पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेतून सुरू झालेल्या राष्ट्रीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या प्रवासाविषयी माहिती देण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामील करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. यावेळी उत्तर कोरेगाव मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष मनोज कलापट ,अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुरेश निंबाळकर, यशवंत पवार, कुमारबापू भोईटे ,मयूर धुमाळ, योगेश करपे, संग्राम लेंभे ,सातारा जिल्हा आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बुनगे महाराज,भादे गावचे देशपांडे काका ,शेखर काटकर, अनिल शिंदे, वाठार ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, शशिकांत धुमाळ,सुधीर अडागळे, अजय भोईटे ,दिलीप पवार ,रमेश शेलार ,विशाल सोळसकर ,अच्युत भोईटे ,विश्वास साळुंखे, मनोज नलवडे, अलकेश पवार, चंद्रकांत शिंदे, शेखर पवार ,दिनेश चव्हाण,हनुमंत चव्हाण, संदीप भगत, महेश शिंदे, बाळकृष्ण जगताप, वैभव चव्हाण व वाठार, पिंपोडे ,वाघोली, अनपटवाडी ,आसनगाव , दहिगांव, सोनके ,सर्कलवाडी चौधरवाडी, जगतापनगर ,सोळशी, नांदवळ, विखळे ,तडवळे सं. वाघोली या गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment