आफजल भाई कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा;

आफजल भाई कुरेशी यांचा  वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा;

 कोरेगाव - अज्जू मुल्ला.
 

जामियत उलमाएं हिंद कोरेगाव  कार्यकारिणी सदस्य आणी सामाजिक कार्यकर्ते आफजल भाई कुरेशी याचा वाढदीवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 कोरेगाव शहर येथील अफजलभाई कुरेशी सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जामियेत उलेमाये हिंद या संघटनेच्या माध्यमातून अनेक  वेळा समाज उपयोगी कामे केले आहेत. आणि समाजाची एकनिष्ठ राहून सर्व स्तरातील लोकांच्यासाठी, त्यांनी वेळोवेळी मोठे सहकार्य करीत असून,कोरेगावच्या मुस्लिम समाजामध्ये त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला. पण हा वाढदिवस साजरा करीत असताना, वाढदिवसाच्या ऐवजी  या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाज उपयोगी कामे केली पाहिजेत असे विचार अफजल भाई कुरेशी यांनी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते मोहसीन कागदी,गफार कुरेशी, गुलाब कुरेशी आसिफ कुरेशी, इब्राहिम कुरेशी,समीर कुरेशी, माजीद सौदागर असे अनेक 
 कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.