Posts

Showing posts from October, 2025

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची नियोजनबद्ध सोय करावी:-सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे.

Image
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची नियोजनबद्ध सोय करावी:-सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे.  पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.  राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री.जयकुमार गोरे यांनी आज  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सभागृह पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेतली.याआढावा बैठकीतील प्रमुख नियोजनाचे निर्देश: कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याबाबत संबंधित सर्व विभागांना निर्देश देण्यात आले. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक ती तयारी करावी, असे सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , युवानेते प्रणव मालक परिचारक, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरगाव ता. कार्यकर्ता मेळावा सपंन्न.

Image
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरगाव ता. कार्यकर्ता मेळावा सपंन्न पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोरेगाव तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा सर्वसामान्य जनतेला पटणारा आहे. पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाविषयीची आत्मीयता आपण सर्वांनी पटवून दिली पाहिजे.पक्षाच्या माध्यमातून सुरू असणारे विविध उपक्रम, सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी उठवलेला आवाज आणि महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित करून आगामी निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यावर पक्षाचा निश्चितपणाने प्रत्येक ठिकाणी विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू; “PM रिपोर्ट बदलण्याचा दबाव” असल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप.

Image
फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू; “PM रिपोर्ट बदलण्याचा दबाव” असल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप. फलटण, प्रतिनिधी: राजेंद्र मदने. फलटण शहरात घडलेली एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. ड्युटी संपल्यावर कोणालाही न सांगता डॉ. संपदा मुंडे यांनी स्थानिक हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांनी यामागे वरिष्ठांकडून आलेल्या “PM रिपोर्ट बदलण्याच्या” दबावाला जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणाखाली होत्या. त्यांना सतत वरिष्ठांकडून काही विशिष्ट पोस्टमॉर्टेम (PM) अहवाल बदलण्याबाबत सूचित केल्याचे आणि त्यावरून वारंवार दबाव आणला जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या तणावामुळे त्यांनी निराश होऊन हॉटेलमधील खोलीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या CCTV फूटेजसह, मोबाईल व इतर वैयक्तिक कागदपत्रे तपासली जात आहेत. पोस्टमॉर्टेम अहवाल येईपर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार नाही, असे पोलिसांन...

प्रयत्न करून देखील कामे मार्गे लागत नाहीत. सतत अपयश येत असेल. तर आयुष्यभर चिंता सोडा. आणी अंकशास्त्रानुसार आयुष्यातील राजयोग घडवून आणणारा मोबाईल नंबर मिळवा.

Image
प्रयत्न करून देखील कामे मार्गे लागत नाहीत. सतत अपयश येत असेल. तर आयुष्यभर चिंता सोडा. आणी अंकशास्त्रानुसार आयुष्यातील राजयोग घडवून आणणारा मोबाईल नंबर मिळवा. प्रयत्न करून देखील कामे मार्गी लागत नाहीत. सतत अपयश येत आहे. तुम्हाला तुम्हच्या नशिबाची साथ मिळत नाही. तर मग आजच आपला मोबाईल नंबर अपडेट करा. आणी आपल्या नशिबाच्या कुलपाला योग्य ती किल्ली द्या. आणी स्वतःचे यशाची सर्व दारे उघडण्या करता लक्ष्मी धन योग आदेश भोईटे यांना लगेच संपर्क साधा.

जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार:-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.

Image
जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार:-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे.   पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. सातारा येथे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा  कोअर कमिटी बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणूक रणनीती, पक्षसंघटनाची बळकटी,कार्यकर्त्यांची सशस्त्रीकरण, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व निर्णय,भाजपचे उद्दिष्ट स्पष्ट आहे जनतेचा विश्वास जिंकणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर ठेवणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.  या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती मा. श्री. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ,श्रीमंत छत्रपती ना. श्री.  शिवेंद्रराजे भोसले, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, भारतीय जनता सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, ज्येष्ठ नेते माज...

मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार कदम.

Image
मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा:-अनिलकुमार कदम. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील मे ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे संततधार पावसामुळे पिकांचे, फळबागांचे, भाजीपाला, शेतजमीन, विहिरी,पशुधन कुक्कुटपालन, शेळ्या मेंढ्या,गुरांचे गोठे, झोपड्या,पालं, इत्यादी अनेक प्रकारच्या प्रचंड अपरिमित नुकसान झाले आहे.शेतकरी, शेतमजूर, शेळ्या मेंढ्या गुरांचे धनगर समाजातील पशुपालक यांचे आर्थिक नुकसान झाल्याने अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत यापूर्वी आपणास ई मेल व्दारे याबाबत सविस्तर माहिती देवून फलटण तालुक्याला अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे बाबत अवगत केले होते.तरी कृपया दिनांक ०९/१०/२०२५ रोजीच्या शासन निर्णय मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत खास विशेष बाब म्हणून फलटण तालुक्याचा समावेश करावा हि विनंती. फलटण तालुक्याचा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुका यादीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करावा अन्यथा नाईलाजाने उपोषण...

आमचे जिवलग मित्र पै.अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

Image
आमचे जिवलग मित्र पै.अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. जिवलग मित्र पै. अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस केक कापून उस्ताहात साजरा करणेत आला. वाढदिवस प्रसंगी सिद्दाई स्टोन क्रशरचे म्यॅॅनेजर म्हणून कार्यरत असलेले पै.अक्षयभाऊ बुधवाले यांचा वाढदिवस असल्याने सचिन उर्फ आबा बुधावले. विजय बुधावले.जितेंद्र जाधव मेजर. सार्थक बुधावले. अकबर भालदार. सूरज बुधावले.ऑपरेटर प्रदीपकुमार. ऑपरेटर आशोक भाई.पंकज. या सर्व मंडळीच्या उपस्थित त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करून वाढदिवस साजरा करण्यात आला. Amche

५ ऑक्टोबर हा 'जागतिक शिक्षक दिन' साजरा

Image
५ ऑक्टोबर हा 'जागतिक शिक्षक दिन' साजरा. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.  जो १९९४ मध्ये युनेस्को ने सुरू केला. या दिवशी जगभरातील शिक्षकांच्या मौल्यवान योगदानाची प्रशंसा केली जाते आणि भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस जगभरात शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी देतो. जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास१९९४ मध्ये सुरुवात:युनेस्को ने ५ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक शिक्षक दिन' म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात पाळला जातो.  - *महत्वाचे पाऊल: ५ ऑक्टोबर १९६६ रोजी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) पॅरिसमध्ये शिक्षकांच्या स्थितीबद्दलच्या महत्त्वपूर्ण शिफारशी स्वीकारल्या, ज्याचा गौरव या दिनानिमित्त केला जातो. जागतिक शिक्षक दिनाचा उद्देश शिक्षकांचा सन्मान:जगभरातील शिक्षकांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदर देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांचे सक्षमीकरण:भविष्यातील पिढीला सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांना आवश्यक संसाधने आणि पाठिंबा मिळवून देणे, जेणेकरून ते प्रभावीपणे शिक...

राज्य प्रशासनाला नवे बळ – अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील 10 हजारांपेक्षा अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप.

Image
राज्य प्रशासनाला नवे बळ – अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील 10 हजारांपेक्षा अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'राज्य रोजगार मेळावा - राज्यस्तरीय कार्यक्रम येथे अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेशांचे वितरण' संपन्न झाले. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील निवड झालेल्या 10 हजार पेक्षा अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपाच्या संदर्भात अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करून एक सोपा आणि सर्वसमावेशक शासन निर्णय करण्यात आला. अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. आतापर्यंत 80% अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित नियुक्त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का मोरे यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली ही समाधानाची बाब असल्...

गिरवी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ वासरावर हल्ला,भितीचे वातावरण.

Image
गिरवी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ  वासरावर हल्ला,भितीचे वातावरण. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. फलटण तालुक्यातील वारुगड किल्ला पायथ्याशी असलेल्या गिरवी गावातील व परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात जाधववाडा नजिकच्या चव्हाण वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू झाला आहे.तर सुतार मळवी,गिरवी शिवारात बिबट्या रात्री अपरात्री व कधी कधी दिवसाढवळ्या रानात शेतात भक्ष्य पकडण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत.त्यामुळे गिरवी ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा यंत्रणांनी तातडीने काल रात्री भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले. गिरवी भागात व परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू झाल्याने दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन करणारे शेतकरी, महिला व नागरिकांच्यात घबराट पसरली आहे.गिरवी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी सोमवार दिनांक ०६/१०/२०२५ रोजी तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिबट्या जेरबंद करण्यासाठी गिरवी ग्रामपंचायत वतीने लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी केली आहे.रात्री अपरात्री बिबट्या शेतात शिवारात फिरत अस...

फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता.

फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.फलटण येथे सध्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अशी दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. यानुसार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आली असून ४ पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर खर्चासह १ कोटी ८४ लाख २१ हजार ३१२ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

सहकारी बँकेचे माजी संचालक / मुख्याध्यापक सिकंदर शेख यांचे मंगळवारी हृदयविकाराने दुःखद निधन.

Image
सहकारी बँकेचे माजी संचालक / मुख्याध्यापक सिकंदर शेख यांचे मंगळवारी हृदयविकाराने दुःखद निधन. सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख. आमचे मित्र, मार्गदर्शक, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक, आसू शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, सिकंदर शेख सर यांचे मंगळवार दि -30 सप्टेंबर 2025 रोजी ह्रदय विकाराने दुःखद निधन झाले आहे.बुधवार  दि-1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 6 वाजता ,कोळकी ता-फलटण येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव देह ठेवण्यात येणार आहे.अंत्यविधी बुधवार दि- 1 ऑक्टोबर 2025 रोजी  बरड  ता-फलटण येथे सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान होईल. भावपूर्ण श्रध्दांजली.परमेश्वर  त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.शोकाकूल- सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक व्रद.