रणसिंगवाडी येथील क्षितिजा रणसिंग सर्वप्रथम पहिली महिला वकील होण्याचा बहुमान.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
रणसिंगवाडी ता. खटाव येथील अतिशय दुर्गम व डोंगर भागात बसलेल्या वाडीमध्ये कोणत्याही शासकीय सुविधा नसतानाही परिस्थितीवर मात केली असून त्यांचे प्राथमिक शिक्षण रणसिंगवाडी मध्येच झाले तर पुढील शिक्षण ,स्वामी मुक्ता नंद हायस्कूल चेंबूर, कुमुद विद्या मंदिर गोवंडी येथे पदवीधर शिक्षण झाले असून व्ही .इ .एस. कॉलेज चेंबूर येथे लॉचे शिक्षण पूर्ण करून कुमारी क्षितिजा राजेंद्र रणसिंग या गावातील सर्वप्रथम पहिल्या महिला वकील होण्याचा बहुमान मिळाला असून गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे त्यांच्या या यशाबद्दल गावातून त्यांचं आई ,वडील, भाऊ ,बहीण, चुलते व नातलग लोकांनी अभिनंदन केले असून महिला, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार, राजकीय नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य ,शेतकरी वर्ग यांनी मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment