श्री गौरवभैय्या जाधव गरजू विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक साहित्य वाटप; ५१ अनाथ मुलांना शिक्षणासाठी घेणार दत्तक.
श्री गौरवभैय्या जाधव गरजू विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक साहित्य वाटप; ५१ अनाथ मुलांना शिक्षणासाठी घेणार दत्तक. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. श्री सेवागिरी रयत संघटना व गौरवभैय्या जाधव मित्र समूह पुसेगाव व पंचक्रोशीतील एक हजार १११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना यंदाही सलग पाचव्या वर्षी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार असून ५१ अनाथ मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दत्तक घेणार आहे. तरी आपल्या पाल्याला कोणत्याही शैक्षणिक मदतीची गरज असल्यास पालकांनी आठ जूनपर्यंत ९७६६५६८२६८, ९१७५१२८२५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गौरवभैय्या जाधव मित्र समूहाने केले आहे.विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा. स्कूल बॅग, वही, पेन, पेन्सिल, कंपास, आदी साहित्य काही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक देऊ शकत नाहीत. महागाई वाढल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील अनेक पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना अडचणी येतात.समाजसेवेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर...