Posts

Showing posts from November, 2025

रामोशीवाडी जाखणगाव येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो गांजा जप्त.

Image
रामोशीवाडी जाखणगाव येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो गांजा जप्त.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलिसांच्या वतीने रामोशीवाडी जाखणगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे 2 लाख 78 हजार 900 रुपयांचा अकरा किलो वजनाचा गांजा येथील येथील सगु वहिनी वस्तीवरील सचिन बापू मदने यांचे रानातून जप्त करण्यात आला.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून ही माहिती प्राप्त झाली पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रामोशीवाडी पोस्ट जाखनगाव येथे सगु वहिनीच्या वस्ती शेजारील आडोशाला गांजाचे विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची झाडांची लागवड केलेली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थागुशा कडील पोउनि परितोष दातीर व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करून व पुसेगाव पोलीस स्टेशन सपोनी संदीप पोमन व त्यांचे कडील ठाणे अंमलदार यांची मदत घेऊन संयुक्तपणे मिळालेल्या माहिती ठिकाणी  छापा टाकला असता त्या ठिकाणी संशयित इसम सचिन बापू मदने वय 35 वर्ष त्याने रहात असलेल्या झोपडीलगत ...

युवा नेते रमेश उबाळे यांची रिपब्लिकन सेनेत थेट महाराष्ट्र नेतेपदी निवड.

Image
युवा नेते रमेश उबाळे यांची रिपब्लिकन सेनेत थेट महाराष्ट्र नेतेपदी निवड. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  मुंबई दि: समाजकारणातून मोठ्या प्रमाणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी आज रिपब्लिकन सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात मुंबई या ठिकाणी जाहीर प्रवेश केला. श्री उबाळे यांच्या कार्याची महती माहित असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नेते पदी निवड करून त्यांचा सन्मान राखला गेला.मुंबई येथील आंबेडकर भवन, दादर या ठिकाणी सुमारे दीड तास संपूर्ण  फुले-शाहू - आंबेडकर चळवळ व सातारा जिल्ह्याचे योगदान याबाबत विचार विनिमय करून चर्चा करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी चा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी श्री उबाळे यांच्याशी व्यक्तिगत रित्या संपर्क साधला. आंबेडकरी विचारांचा वारसा जपत असताना सत्तेची समीकरण जुळवण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन सेना यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जाणले. त्यानंतर गोकुळदास पास्ता रोड, दादर येथील आंबेडकर भवन मध्ये आद...

औंध उपसा सिंचन व रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची कामे त्वरित पूर्ण करा:-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

Image
औंध उपसा सिंचन व रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची कामे त्वरित पूर्ण करा:-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम   राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या दालनात औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे - पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत आढावा घेत, सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी या दोन्ही योजनेचे उपरोक्त सर्व विषय मार्गी लागतील अशा पाद्धतीने त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.  औंध उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधसह 21 गावांच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी, आणि र...

पुसेगाव सुवर्णनगरीमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन:-युवा नेते गौरव जाधव.

Image
पुसेगाव सुवर्णनगरीमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन:-युवा नेते गौरव जाधव.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.  सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी दिली.येथील श्री सेवागिरी मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९) दिवसभर चालणार्‍या या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ऑन-द-स्पॉट मुलाखती घेऊन ऑन-द-स्पॉट नियुक्ती पत्र देखील देणार आहेत.पाचवी ते सर्व शाखांतील पदवीधर, पदवित्तर उमेदवारांना रोजगाराच्या भरपूर संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहेत. पुसेगाव व परिसरातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह मेळाव्यात सहभागी व्हावे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही,...