पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर.
पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर. प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | जुबेरभाई कोतवाल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी असताना त्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती, फलटण येथे प्रशासनाच्या वतीने महत्त्वाची समन्वय व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीपासून स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे पत्रकार आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीत यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, पंचायत समिती गट विकास अधिकारी अक्षय गव्हाटे व सर्व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य, पालखी सोहळा मार्गावरील सर्व गावातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.जिल्हा परिषद...