Posts

Showing posts from March, 2024

इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन.

Image
इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने  निधन. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मोळ . तालुका खटाव येथील कै. दत्तात्रय ज्ञानदेव वाघ यांची पत्नी कै. इंदुबाई दत्तात्रय वाघ यांचा दिनांक 29-3-2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पाश्चात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्या श्री.चंद्रकांत दत्तात्रय वाघ (सर) यांच्या मातोश्री होत्या सावडने विधी रविवार दिनांक 31. 3 .2024 रोजी मोळ  येथे होणार आहे

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे वनक्षेत्रात लागलेली आग विझवण्यात वर्धनगड ग्रामस्थांना व वन विभागाला यश.

Image
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे वनक्षेत्रात लागलेली आग विझवण्यात वर्धनगड ग्रामस्थांना व वन विभागाला यश. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. रविवार दिनांक 24/03/2024 रोजी पुसेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धनगड ता. खटाव जिल्हा सातारा,गावातील फॉरेस्टला रात्री 2 वाजता आग लागलेली आहे,हे लक्षात येतात सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे पोलीस पाटील श्री गणेश जठार यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली काही तरुण या यंत्रणेने जागे झाले. ग्रामपंचायत कर्मचारी चांगदेव जाधव यांनी मंदिराच्या ध्वनि क्षेपकावरून वारंवार अलाउन्स केले. यावेळी येथील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार, सादिक शिकलगार, आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले व त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी तांबोळी व त्यांचे सहकारी अर्ध्या तासाच्या आत वर्धनगड येथे पोहोच झाले  *फॉरेस्टला लागलेली आग ग्रामस्थांच्या व वन विभागाच्या मदतीने दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर विझवण्यात आली.  ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभ...

दु:ख दूर करणारे सेवादूत समाजाचे खरे नायक:डॉ.श्रीपाल सबनीस.

Image
दु:ख दूर करणारे सेवादूत  समाजाचे खरे नायक:डॉ.श्रीपाल सबनीस. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. पुणेः-वेदनेला जात-धर्म नसतो. त्यामुळे वेदनेला हात देऊन दु:खाशी एकरूप होणे आवश्यक असते. दु:खाची जाणीव ठेवून कार्य करणारे सेवादूत हे समाजाचे खरे नायक आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  रक्तदान सारख्या अलौकिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच हजारो रुग्णांना मोफत रक्ताची बॅग दिल्याबद्दल आप्पा साहेब घोरपडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आप्पासाहेब घोरपडे यांना याआधी राष्ट्रीय लेव्हलला ,राज्य लेवलला तसेच अनेक सामाजिक संस्था मधून सन्मानित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी यावेळी  यंदाचा दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार  सन्मानीत  नॅशनल ॲवॉर्ड विजेते रक्तदाते पांडुरंग (अप्पा) घोरपडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, शाल, दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्ह...

पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयानेच लावली फोटो स्टुडिओला आग.

Image
पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयानेच लावली फोटो स्टुडिओला आग.  पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. डिस्कळ. ता .खटाव येथे पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयाने चिडून चार सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या रात्री डिस्कळ येथील अशोक विठ्ठल यादव यांच्या फोटो स्टुडिओला आग लावली व हे गैरकृत्य केले आणि पलायन केले होते. त्या सर्व आरोपीस पुसेगाव पोलिसांनी जेरबंद केले.   पुसेगाव पोलीस स्टेशन वरून मिळाली माहिती अशी दि. 8/3/2024 रोजी महाशिवरात्रीच्या रात्री पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील डिस्कळ तालुका खटाव येथील पंचरत्न कॉम्प्लेक्स मधील आग लावून पळून गेले बाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सदर अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पुसेगाव पोलिसांसमोर होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौकशी सुरू केली असता, महाशिवरात्रीच्या रात्री बुध गावातील एका पुलावर चार चाकी गाडीचा अपघात होऊन ती भरदा वेगाने निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तपास केला असता, हुंडाई कंपन...

सातारा जिल्ह्यामधील वीर पत्नींचा गौरव पुरस्कार देऊन आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केला सन्मान.

Image
सातारा जिल्ह्यामधील वीर पत्नींचा गौरव पुरस्कार देऊन आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केला सन्मान. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौ वनिताताई भंडारे यांचे  संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिला सन्मान नारीशक्तीचा गौरव पुरस्कार 2024जिल्हास्तरीय हॉटेल सुंदरबन येथे वीर पत्नी सन्मान , कृषी कन्या सन्मान , उद्योजक सन्मान , नारीशक्ती सन्मान सोहळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णा खोरे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या सुविधा पत्नी डॉ, प्रियाताई शिंदे, सौ. प्रमिला मुथा मुथा ग्रुप डायरेक्टर (उद्योजक अजित मुथा यांचे सुविध्य पत्नी ,  श्रीमती मृणाल बाबर उद्योजक बाबर पशुखाद्य , अँड सौ नीता फडतरे ,सौ पल्लवी साठे समाजसेविका यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये  वीर पत्नी अश्विनी काळुंगे, वीर पत्नी गौरी कदम, वीर पत्नी राणी निकम, वीर पत्नी सिनेमा कणसे, वीर पत्नी व...

चिमुकल्यांच्या कलाविष्काराने विसापूरकर मंत्रमुग्धतब्बल ७९ हजारांचे बक्षीस.

Image
चिमुकल्यांच्या कलाविष्काराने विसापूरकर मंत्रमुग्ध तब्बल ७९ हजारांचे बक्षीस. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. विसापूर ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या 'अंकुर-२०२४' वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने विसापूरकर मंत्रमुग्ध झाले. अतिशय नेटके नियोजन असलेला विसापूर येथील शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात आकर्षण ठरतो. गेली दशकभर सुरू असलेला कार्यक्रम वर्षानुवर्षे बहरत असून येथील बालकलाकार अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करतात. गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेकविध उपक्रम शाळेत राबविले जातात. जिल्हा परिषदेच्या अनेक उपक्रमात विसापूर शाळा अग्रभागी असते. सातत्यपूर्ण विविधांगी उपक्रम राबवित या शाळेने जिल्हास्तरावर यश मिळविले आहे. निस्पृह भावनेने कार्य करणाऱ्या ग्रामस्थ व पालकांची शाळेप्रति असलेली एकजूट ही शाळा विकासात महत्वाची ठरते. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी तब्बल ६४ हजार रोख आणि वस्तुरूपाने १५ हजार असा एकूण ७९ हजार शैक्षणिक उठाव लोकांनी दिला. शाळेच्या प्रशस्त इमारतीसाठी पाठपुरावा सुरू असून भविष्यात अत्याधुनिक शैक...

भाजप लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधक समितीची बैठक उत्साहात पार.

Image
भाजप लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधक समितीची बैठक उत्साहात पार. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. मसूर येथे काल सातारा लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधन समितीची बैठक कराडउत्तर उमेदवार प्रभारी मा. संग्रामबापू घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी होऊ घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या.या कार्यक्रमा प्रसंगी कराड उत्तर विधानसभा उमेदवार प्रभारी मा. संग्रामबापू घोरपडे, सुनिलबापू शिंदे, मंडल अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, विधानसभा संयोजक महेशबाबा जाधव, पंचायतराज जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश जाधव, उपाध्यक्ष अनिल माने, विठ्ठल काकडे, रक्मिणी जाधव, विलास आटोळे, सोमनाथ निकम, विकास आण्णा, संजय घार्गे, रणजित माने तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार संघात पक्क्या रस्त्यांचे जाळे बनवणार आ. महेश शिंदे.बुध निढळ पेडगाव वडूज रस्त्याचे भूमिपूजन.

Image
मतदार संघात पक्क्या रस्त्यांचे जाळे बनवणार आ. महेश शिंदे.बुध निढळ पेडगाव वडूज रस्त्याचे भूमिपूजन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. कोरेगाव खटाव मतदार संघात पक्या रस्त्याचे जाळे बनवणार आहे .मतदार संघात अनेक विकासकामे सुरू आहेत .जिहे कटापूर योजनेचे पाणी नेर तलावातून प्रत्येक गावात पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त आपल्या सहकार्य ची अपेक्षा आहे .निढळ कातळगेवाडी  या गावाला नेर तलाव्यातुन  पाणी मिळणार आहे.काम प्रगती पथावर आहे.असे प्रतिपादन कोरेगाव खटाव मतदार संघाचे व कृष्णा खोरे उपाध्यक्ष आमदार  महेश शिंदे यांनी  निढळ येथे केले .बुध निढळ पेडगाव रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते निढळ येथे झाले.निढळ अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले .या कामासाठी  5 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.यामुळे येथील जनतेला या रस्त्याचा फायदा होणार आहे .रस्ते चांगले असले की त्या भागांचा विकास होतो. त्यामुळे आमचे लक्ष जनतेला चांगले पक्के रस्ते देण्याचे आहे  आमच्या विकासकामात जनतेचे सहकार्य आम्हाला मिळत आहे असे पुढे ते म्हणाले. यावेळी जी .डी. फाउंडेशन चे अध्...

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

Image
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.  फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे कलादालन विज्ञान प्रदर्शन व माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे उत्साहात आयोजन शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरींचे,कलादालन तसेच बाल वैज्ञानिकांची झलक दाखविणारे विज्ञान प्रदर्शन व माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्री.रमणलाल दोशी (व्हॉइस चेअरमन) फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  त्यावेळी मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर चेअरमन (मु.प्रा.वि.शाळा समिती) श्रीमती निर्मला रणवरे (निमंत्रित सदस्या मु. प्रा.वि.फलटण),मा.श्री. अरविंद निकम(प्रशासन अधिकारी फ.ए.सो.) यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आकर्षक अशा विविध कलाकृतींचे व प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सर्व प्रमुख पाहुण्यांसमोर व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसमोर व त्यांच्या समवेत आले...

सामाजिक बांधिलकी जपणारे वारकरी ह .भ .प .रघुनाथ उर्फ सर्जेराव (बुवा ) घोरपडे यांचं प्रथम स्मृतिदिन.

Image
सामाजिक बांधिलकी जपणारे वारकरी ह .भ .प .रघुनाथ उर्फ सर्जेराव (बुवा ) घोरपडे यांचं प्रथम स्मृतिदिन. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.  वर्धनगड ( ता. खटाव ) येथील वारकरी भूषण हरिभक्त परायण सर्जेराव बुवा घोरपडे यांचा आज दिनांक 11. 4 .2024 ( सोमवारी) प्रथम स्मृतिदिन त्यानिमित्ताने  अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले सर्जेराव उर्फ रघुनाथ श्री घोरपडे बुवा यांचा जीवन प्रवास अत्यंत थक्क करणारा असा आहे कधीही पैशाला महत्त्व न देता त्यांनी माणूस जोडण्याचे काम आयुष्यभर केले लहानपणीच वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांची आई अनुसया दत्तात्रेय घोरपडे यांनी अतिशय संस्कारक्षम वातावरणामध्ये त्यांचे पालन पोषण केले तरुण वयात त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शेतीमध्ये नवनवीन कल्पना राबवून आधुनिक पद्धतीने शेती केली आणि शेती करत त्यांनी आपल्या एक मुलगी व दोन मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आज त्यांची दोन्ही मुले शेती व उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे काम करत आहेत तसेच त्यांचा वारसा प्रभावीपणे चालवत आह...

विसापूर शाळेत भरला बालबाजार चिमुकल्यांच्या बाजारात हजारांची उलाढाल.

Image
विसापूर शाळेत भरला बालबाजार चिमुकल्यांच्या बाजारात हजारांची उलाढाल. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी विसापूर, ता.खटाव येथील जि प शाळेत चिमुकल्यांचा बालबाजार भरवण्यात आला. कृतीयुक्त शिक्षण हा शिक्षणाचा गाभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. गणिती ज्ञानाचा व्यवहारात उपयोग व्हावा या हेतूने बालबाजार भरविण्यात आल्याचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर धायगुडे यांनी नमूद केले. सकाळपासूनच शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आपले वैविध्यपूर्ण स्टॉल मांडले होते.  भाजीपाला, फळभाज्या, फळे, गरम बटाटा भजी, सँडविच, वडापाव आदी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती. 'भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, आला बघा,गावरान मेवा' असे म्हणत आपला माल विकण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळा फंडा वापरत होते. ग्रामस्थ व पालकांनी बाजारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदीचा आनंद घेतला. काहींनी विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान तपासत अनेक प्रश्नही विचारले. हिशेब विचारत बाजाराचा उद्देश सफल करण्यात हातभार लावला. या बाजारात तब्बल वीस हजारांच्या वर उलाढाल झाल...

रामेश्वर डोंगर बहरला विविध फुलांनी , फळांनी ,रंगीबेरंगी पानांनी.

Image
रामेश्वर डोंगर बहरला विविध फुलांनी , फळांनी ,रंगीबेरंगी पानांनी. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. विसापूर तालुका खटाव येथील रामेश्वर डोंगरावरील ऐतिहासिक रामेश्वर मंदिरा शेजारील बेचिराग असणारी रामेश्वरवाडी येथील श्रीरामांच्या पवित्र पावन स्पर्शाने पवित्र झालेला रामेश्वर डोंगर मध्ये  विविध झाडांची फुले व फळे नवनवीन झाडाला लागलेली पालवी पाहून रामेश्वर डोंगर हा निसर्गरम्य  रम्याने नाहून निघाला असून हे पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील अभ्यासू लोक रामेश्वर डोंगर मध्ये येत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये पळस ,करवंद, वाघाटी, मेडसिंग ,कुशांबी, धायटी ,पैर, सोनसाखळी , ग्लेरेसिडिया यासारखे असंख्य विविध झाडे पाहून मनमोहक दृश्य दिसत असून बरेसे हौशी निसर्ग प्रेमी फोटो काढण्यासाठी व शूटिंग करण्यासाठी या डोंगर भागात फिरताना दिसत आहेत यावर्षी करवंद या फळाच्या जाळ्या फुलांनी भरले असून उन्हाळ्यामध्ये डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी चांगलीच खायला मिळणार असल्याचे डोंगरात फिरताना दिसून येते.