शिवरायांच्या नीती मूल्याचे आचरण करणे महत्त्वाचे- शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व दीपस्तंभ प्रमाणे आजही मार्गदर्शन करत आहे. शिवरायांचा जयजयकार करणे सोपे असून शिवरायांच्या चांगल्या गोष्टीचे आचरण करणे खूप अवघड आहे. शिवरायांच्या नीती मूल्याचे आचरण करणे महत्त्वाचे असून व नवयुवकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहणे हीच खरी शिवभक्ती आहे असे मत शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
अनपटवाडी येथील श्री ओम साई तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शिवव्याख्यानामध्ये ते बोलत होत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, प्रशांत तोडकर ,सोनाली खाडे यांची उपस्थिती होती.
शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी म्हणाले शिवाजी महाराज हा प्रेरणादायी मंत्र समस्त तरुण वर्गाला मार्गदर्शन करत आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपली जीवनमूल्य उंचावणे महत्त्वाचे असून आपले आचरण सुद्धा शिवरायांच्या आचरणासारखे असणे तितकेच गरजेचे आहे. परस्त्रीला मातेचा सन्मान देणाऱ्या शिवरायांचा हा गुण तरुण वर्गाने आत्मसात करणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्याही जातीसाठी किंवा धर्मासाठी नसून समस्त मानव धर्माच्या कल्याणाकरता आहे. त्यामुळे शिवचरित्राचा व्यापक दृष्टी ठेवून अभ्यास करून त्यांच्या नीती मूल्याचे आचरण स्वतःच्या जीवनामध्ये करणे हे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक काम आहे. असे शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी यांनी सांगितले.
गणेश उत्सवानिमित्ताने ओम साई गणेश मंडळाच्या माध्यमातून शिवव्याख्यानाला महिलांचा आणि तरुण वर्गाचा प्रतिसाद मोठा मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प पोपट महाराज भोसले यांनी केले.
यावेळी युवा उद्योजक राम निकम, नामदेवराव भोसले, महेश भोसले, रामदास भोसले, संदीप निकम, गौरव निकम, गणेश भोसले, नितीन भोसले, सागर भोसले,भाऊ भोसले यांच्यासह ओम साई गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक , महिलावर्ग, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Thanks
ReplyDelete