सर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला .

सर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला   . 
संपादकीय विशेष लेख
बासर्वसामान्यासाठी धावून जाणारा विविध अभ्यासाचे पैलूचे मार्गक्रमन करणारा सर्वसामान्य अभ्यासू नेतृत्व - अज्जू मुल्ला   . का प्रसंगातून आपल्या कौशल्याच्या जोरावर विविध अभ्यासाचे पैलू असणारे अपार मेहनत चिकाटी व चौकस बुद्धी तसेच सामाजिक कार्याचे आवड असणारे वेळोवेळी दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारे मुस्लिम समाजातील कोरेगाव येथील येणाऱ्या पुढील काही दिवसातील युवा व उज्वल व उभरते  नेतृत्व कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार अज्जू  मुल्ला यांचा आज दिनांक पाच रोजी वाढदिवस असून त्यांनी आपल्या वयाची 50 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा,
 आजमुद्दीन बाबालाल मुल्ला यांचा जन्म कोरेगाव येथे 5/9/ 1972 रोजी झाला, त्यांच्या वडिलांचे नाव बाबालाल मुल्ला त्यांचा व्यवसाय शेती हा होता, मोजकी शेती, त्यावर पूरक  उदरनिर्वाह करीत होते, त्यांचा मुलगा अजमुद्दिन मुल्ला आज त्यांच्या हिम्मतिच्या व कौशल्यच्या जोरावर एक चांगल्या पदावर कार्यरत आहे. अजमुद्दीन मुल्ला यांचे शिक्षण मॉडेल एज्युकेशन इंग्लिश स्कूल  कोरेगाव येथे झाले, तर उच्चशिक्षण डीपी भोसले कॉलेज कोरेगाव येथे पूर्ण झाले. त्यांनी आपल्या या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीमध्ये अनेक सामाजिक राजकीय कार्य केले. त्यांनी विविध संस्थेची पदे भूषवली आज ते संपादकीय पत्रकार म्हणून सुद्धा कार्य करीत आहे.
 तर केंद्रीय पत्रकार संघाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष, माहिती अधिकार संघर्ष समिती तालुकाध्यक्ष व मानव अधिकार फाउंडेशन तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. आपल्या पदावर कार्य करीत असताना सर्वांशी सलोख्याने राहून मिळून मिसळून त्यांचे कार्य त्यांनी पुढे चालूच ठेवले आहे.शांत मनमिळावू असणारा त्यांचा स्वभाव हा जनसामान्याला चांगलाच भोवून जातो,आज ही जनसामान्यांमधून त्यांच्या कार्याची चांगल्याच पद्धतीने दखल घेतली जाते, व त्यांना चांगल्या प्रकारे जनतेचे पाठबळ मिळत आहे. मुस्लिम समाजात जामीयत उलेमायहिंद या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मुस्लिम समाजासाठीही ते भरपूर कार्यरत आहेत.त्यांच्या एकूण कार्याचा आलेख पाहता त्यांचे एकंदरीत असलेले कार्य उल्लेखनीय व यशस्वीपूर्ण आहे. त्यांची पत्नी सुलताना मुल्ला व त्यांच्या मुलीचा त्यांना नेहमीच हातभार लागत असतो, सध्या सातारा न्यूज च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचे काम केले आहे. व चालू आहे, त्यांनी आता स्वतःचा चांद तारा युट्युब चॅनेल सुरू केला आहे. वेळोवेळी सर्वसामान्य तसेच गोर गरिबांसाठी झटणारा कुठल्याही प्रकारच्या सदैव मदतीला तत्पर असलेला असा हा एकमेव राजकीय सामाजिक शैक्षणिक व सर्वच विविध क्षेत्रातील अग्रगण्य स्थानावर पुढे राहून कार्य करणारा असा हा सर्व सामान्यातील कार्यकर्ता आज त्यांचा वाढदिवस होत आहे त्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा ;
.   शब्दांकन : संपादक अकबर भालदार. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.