वर्धनगड येथील मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीच्या रस्त्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज.

वर्धनगड येथील मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीच्या रस्त्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज.

पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 

वर्धनगड मुस्लिम समाजासाठी नवीन दफनभूमी व जुन्या दफनभूमीसाठी रस्ताची नितांत गरजेची मागणी असून सध्या असलेल्या दफनभूमीमध्ये मयत व्यक्तींना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही तर मयत नेहण्यासाठी सरळ रस्ता सुद्धा नाही त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावरून बांधावरून दफन भूमीमध्ये मयत न्यावे लागत आहे, ही मोठी सध्याच्या काळात शोकांतिका असून,प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करून येथील मुस्लिम समाजास दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व जुन्या दफन भूमीकडे जाणारा रस्ता त्वरित डांबरी करून देण्याची मागणी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
.  वर्धनगड तालुका खटाव या गावांमध्ये मुस्लिम समाजाचे 70 ते 80 घरी असून 600 ते 700 लोकसंख्या आहे. मुस्लिम समाजास पूर्वंपार या ठिकाणी फक्त सात गुंठे दफनभूमी आहे. शेजारून ओढा जात असल्याकारणाने ओढ्याला येण्याच्या पाण्याच्या प्रवाहाने आत्तापर्यंत दोन ते तीन गुंठे जागा त्यामध्ये गेली आहे. या ठिकाणी मोठा समाज असल्याने ही दफनभूमी आता कमी पडीत असून या दफनभूमीकडे जाणारे सगळे रस्ते बंद आहेत यासाठी पूर्वंपार असलेला वर्धनगड ते नेरला जाणारा साखळी रस्ता हा बदलत्या काळानुसार एकमेव असा राहिलेला असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. निम्म्या अंतरापर्यंत ग्रामपंचायत व शशिकांत शिंदे यांच्या आमदार फंडातून सिमेंट काँक्रेट व काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. परंतु अजूनही अंदाजे 400 मीटरचा रस्ता अपूर्ण असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. त्यामुळे या मार्गाने मयत नेत असताना, मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, लोकांच्या शेतावरून व बांधावरून अक्षरशः मयत दफनभूमीत न्यावे लागत आहे. शासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील मुस्लिम समाजाला न पेलणारे निकष नवीन दफनभूमी जागा मिळण्यासाठी प्रशासनाकडून लावले जात आहेत ही मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल, संबंधित प्रशासकीय विभागाने या दफनभूमीची व रस्त्याची अवस्था पहावी व निर्णय घ्यावेत अशी ज्वलंत मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.