सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे यांचा सपत्नीक पुसेगाव पोलीस ठाणे मध्ये सत्कार.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे यांचा सपत्नीक पुसेगाव पोलीस ठाणे मध्ये सत्कार. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सातारा पोलीस दलातील पुसेगाव पोलीस ठाणे येथे सध्या कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री धनंजय शिंदे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल पुसेगाव पोलीस ठाणे यांचे वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.सन 1991 साली सातारा जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती झाल्यानंतर सातारा, कराड, पाटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील पोलीस ठाणे व शाखामध्ये सेवा करत असताना पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत प्रमोशन झाले होते. दिनांक 30 जून 2024 रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातील 33 वर्षे प्रदीर्घ व निष्कलंक सेवा पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल पुसेगाव पोलीस ठाणे येथे त्यांचा सपत्नीक सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स पो नि श्री आशिष कांबळे व पोलीस स्टाफ यांनी त्यांचे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.