Posts

Showing posts from October, 2022

गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम पुसेगांव परिसरातील महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा व किर्तन आयोजन.

गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम  पुसेगांव परिसरातील महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा व किर्तन आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवारी (ता. ७) पुसेगाव व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत तुळजापूर, पंढरपूर, म्हसवड, गोंदवले तीर्थक्षेत्र व देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक महिलांनी गुरूवार (ता. ३) अखेर मोबाईल नंबर ९७६६५६८२६८ या क्रमांकाशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन गौरव जाधव मित्र समूहातर्फे करण्यात आले आहे.  पुसेगाव पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांसाठी मंगळवारी (ता. ८) वाढदिनी झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा (गजर भक्तीचा) या किर्तनसोहळ्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सागर (महाराज) बोराटे यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.  गावातील १०० गरजू कष्टकरी कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार असून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. तसेच आपले सामाजिक दातृ...

पत्रकार पंकज कदम यांचे सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जाळले.

Image
पत्रकार पंकज कदम यांचे सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जाळले.   पुसेगाव प्रतिनिधी. नितीन घोरपडे. विसापूर तालुका खटाव येथील पत्रकार पंकज कदम यांच्या शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन काढून मळणीसाठी ठेवलेला ढिग शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला यामध्ये अंदाजे एक लाख ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले  आहे आज ही बातमी शिवसेना  सातारा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव विभाग प्रमुख  मुघटराव कदम यांना समजतात त्यांनी घटनेच्या स्थळावर व शेतामध्ये जाऊन पाहणी केली किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे यावेळी त्या विभागातील सर्कल तलाठी यांना फोन केले असता फोन बंद लागले शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला  संबोधले जाते ज्यांच्या लेखणीच्या जीवावर विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली जाते अशा पत्रकारांना दबाव आणण्यासाठी समाजातील विकृत लोकांकडून असे अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे व संबंधित विभागाने ...

सेवागिरी अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त पुसेगावात कार्यक्रमांची रंगत;

Image
सेवागिरी अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त पुसेगावात कार्यक्रमांची रंगत;  दानशूर व्यक्तींनी देणगी स्वरूपात योगदान देण्याचे आवाहन. सातारा 24 तास न्यूज. नितीन घोरपडे.  पुसेगाव, ता. २८ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. याकरिता ट्रस्टच्या वतीने संजीवन समाधी अमृत महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक २७ डिसेंबर अखेर धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात भाविका-भक्तांचे सुध्दा योगदान असावे यासाठी पैशांच्या स्वरूपात देणगी स्वीकारण्याचा निर्णय ट्रस्टमार्फत घेण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव व विश्वस्तांनी दिली.सोहळ्यात श्रीराम कथा सप्ताह, श्री भागवत कथा सप्ताह, श्री गुरुचरित्र व श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, हरिपाठ, भजन स्पर्धा, झेंडा मिरवणूक, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा, बैलगाडी शर...

पुसेगाव पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.

Image
पुसेगाव पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करताना संघटनेचे सदस्य व पत्रकार. पुसेगाव पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.            सातारा 24 तास न्यूज. अकबर भालदार. पुसेगाव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी संस्थापक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ऋषिकेश पवार, सचिवपदी प्रा. केशव जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संतोष साळुंखे, विलास कुलकर्णी, अकबर भालदार,नितीन घोरपडे, निसार शिकलगार, केशव कचरे.पंकज कदम. यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन केले.

डॉ प्रियाताई शिदे यांच्या हस्ते भैरवनाथ राज्यस्तरिय पत्रकार पुरस्कार संदीप जठार यांना प्रदान.

Image
डॉ प्रियाताई शिदे यांच्या हस्ते भैरवनाथ राज्यस्तरिय पत्रकार पुरस्कार संदीप जठार यांना प्रदान.     पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून तडवळे येथील भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास मंडळाने एक खूप मोठा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण अध्यक्ष श्री सदाशिव खाडे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले. तडवळे ता  खटाव येथे भैरवनाथ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ प्रियाताई शिंदे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मा.अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे,खटावचे युवा नेते राहुल पाटील, माजी जि.प. सदस्य अशोक कुदळे, नाशिकचे पोलीस निरीक्षक जालीदंर पळे, भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी, उपाध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब पवार ,सचिव बाळासाहेब खाडे गुरुजी यांचे हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली गेली अठ्ठेचाळीस वर्षा पासून तडवळे येथील भैरवनाथ कला...

सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती सहयोगी संस्था ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने रेशनिंग विषयी तहसीलदार सो फलटण यांना निवेदन.

Image
सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती सहयोगी संस्था ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने रेशनिंग विषयी तहसीलदार सो फलटण यांना निवेदन.   प्रतिनिधी फलटण.प्रवीण अहिवळे.  फलटण येथील अनेक गरजू गरीब पात्र कुटुंबांना रेशनिंग विषयी समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबांना रेशनिंग मिळत नाही. ज्या पात्र रेशन कार्डधारकांनी आपल्या कार्यालयाकडे 44 हजार रुपये चा उत्पन्न दाखला ग्रामसभा ठराव कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड अर्ज व इतर कागदपत्रे आपल्या कार्यालयाकडे सादर केले असतील अशा कार्डधारकांना रेशन तातडीने मिळावे. रेशन कार्डधारकांना शासनाने जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा या योजनेमध्ये अनेक कुटुंबांना साखर मिळालेली नाही. रेशन मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा ही 44 हजारांऐवजी एक लाख रुपये करावी हे मुद्दे सदर निवेदनात देण्यात आले. तसेच चालू महिन्यातील रेशनिंग वाटप ही चालू करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार फलटण यांना केली असता तहसीलदार फलटण यांनी माहिती दिली की येत्या दोनच दिवसात आम्ही चालू महिन्यातील रेशनिंग वाटप करणार आहोत. सातारा जिल्हा रेशनिंग कृती समि...

राज्यसरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोरेगाव राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मा. तहसीलदार यांना दिले निवेदन.

Image
राज्यसरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोरेगाव राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मा. तहसीलदार यांना  दिले निवेदन.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेतीपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आप्पतीमुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदिल झाला आहे.त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.असे असताना सुद्धा राज्यतील सरकार साधे पंचनामे सुद्धा करायला तयार नाहीत, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.खरेतर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.परंतु राज्यसरकार फकत टीव्ही वर गप्पा मारण्यात व्यस्त्त आहे.या शेतकऱ्याच्या गंभीर जीवन मरणाच्या यातणेकडे लक्षवेधण्यासाठी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी किंवा राज्यशासनाने दयावी, या करिता जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी यांना तर तालुका स्तरावर मा. तहसीलदार यांना उपरोक्त विषयाणव्येय निवेदन देण्याच्या सूचना राष्ट्रीय काँग्रेस प्रांतध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी दिल्या असून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून, हेक्टरी...

सातारा जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती.

Image
सातारा जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक   समीर शेख यांची नियुक्ती. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पोलीस अधीक्षक समीर शेख यांची गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून थेट सातारा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठी नियुक्ती झाली असून यापूर्वी सहाय्य पोलिस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती पुन्हा सातारा होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे तत्कालीन एसपी अजय कुमार बंसल अजूनही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत गृहमंत्रालयाचे सहसचिव वेंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांची बदल्याचे आदेश निघाले होते यामध्ये अजय कुमार बंसल यांची बदली प्रस्ताविक ठेवण्यात आली असून गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रात्री उशिरा पोलीस मुख्यालयामध्ये या बदलीचे आदेश प्राप्त झाले अजय कुमार बंसल यांनी 7 ऑक्टोंबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडी...

भौतिक ,आर्थिक आणि मानव विकास हे तीन ग्रामविकासाचे महत्त्वाचे घटक : माजी विभागीय आयुक्त पुणे. चंद्रकांत दळवी.

Image
भौतिक ,आर्थिक आणि मानव विकास हे तीन ग्रामविकासाचे महत्त्वाचे घटक :   माजी विभागीय आयुक्त पुणे. चंद्रकांत दळवी. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. जेव्हा देशात १० टक्के शहरीकरण होते तेव्हा महात्मा गांधींनी "खेड्याकडे चला" असे आवाहन केले होते. आता शहरीकरण ५० टक्क्यांवर गेले आहे. अशा काळात खेड्याकडे जाताना म्हणजेच ग्रामविकास करताना गावाचा भौतिक विकास, आर्थिक विकास आणि मानव विकास हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या घटकांना वगळून ग्रामविकास अशक्य आहे, असे प्रतिपादन सत्त्व फाउंडेशनचे अध्यक्ष, पुणे विभागचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.  चंद्रकांत दळवी  म्हणाले, ‘‘गावात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवत राहणीमाण सुधारणे, तरुणवर्ग, विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, आदिवासी घटक, महिला यांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवणे, व्यसनमुक्त गाव आणि धार्मिक सदाचरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. श्री. दळवी यांनी स्वतःच्या निढळच्या विकासकामांचे सादरीकरण केले. गावाबाहेर गेलेल्या ग्रामस्थांची नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटनेची स...

मलवडी तालुका फलटण येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न.

Image
मलवडी तालुका फलटण  येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न.       फलटण मलवडी  प्रतिनिधी: शकील सय्यद.  मलवडी ता. फलटण येथे विकास कामाचे उदघाटन व भूमिपूजन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर( मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा) यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रम प्रसंगी त्यानी आपले मनोगत वेक्त करते वेळी ते पुढे म्हणाले की मा. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे मलवडी व फलटण तालुक्यामध्ये पाणी आले. आणि त्यामुळे दुष्काळ परिस्थिती असलेली गाव आज सुजलाम सुफलाम झाली. अंतिम मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली आता जवळपास आठ महिने झाले. तरीसुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदनगरपालिकामहानगरपाका यांच्या निवडणुका नाहीत. आणि ज्या वेळेला प्रशासक असतो त्यावेळेस काय जिल्हा परिषद मध्ये आत चालले ते कळतच नाही. सी ओ म्हणेल त्या पद्धतीने कारभार चालतो ताबडतोब निवडणुका घ्याव्यात हे सुप्रीम कोर्टाने सांगितले असताना सुद्धा आज आपण पाहतोय आठ महिने होऊन सुद्धा निवडणुका होत नाहीत कधी यांच्या सोयीनुसारच निवडणुका जे काही राजकारण चाललेला आहे ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स...

नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन.शेतांत कुजलेली शेतीपिके बांधली तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर.

Image
नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन.शेतांत कुजलेली शेतीपिके बांधली तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  खटाव माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे  झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी वडूज ता.खटाव येथेमाजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, दिनेश देवकर,यशवंत जाधव, संतोष  दुबळे, अमित कुलकर्णी, अमिन आगा, अजित पाटेकर,अजित देवकर, सलमा शेख, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, चंद्रकांत फाळके सचिन करमारे, आप्पासाहेब खुडे, अभिजीत साळुंखे, शुभम  गायकवाड, सोमनाथ खुडे, निखील राऊत, आदित्य राऊत, काका पवार आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.प्रारंभी शिवसैनिकांनी निष्क्रीय राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आदी शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने...

आ.शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावातील कातकरी समाजाला मायेची उब.

Image
आ.शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावातील कातकरी समाजाला मायेची उब.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. माजी जलसंपदा मंत्री आ शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आज दिनांक १९ रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग मुकबधीर अपंग तसेच गोरगरिबातील लोकांना लोकर चे ब्लँकेट देऊन मायेची उब देणारे जिल्हा राष्ट्रवादी  काँग्रेस  सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश उबाळे यांनी कोरेगाव येथे मार्केट यार्ड मधील कातकरी समाज यांना ब्लँकेट वाटून मायेची उब हा उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे सामाजिक कार्यकर्ते व आ शशिकांत शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक दिनेश सणस ,किशोर काशिद ,यदू खंडाईत , प्रसाद फडतरे , करण फडतरे , बापू फडतरे  ,सुरेश फडतरे , राहूल माने ,अनिल मोरे ,सोमनाथ जाधव ,मंगेश मदने ,रमेश पाटे ,आकाश येवले व इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

विसापूर येथील महिलांनी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा विजय डोके यांचे आवाहन.

Image
विसापूर येथील महिलांनी  आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार  प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा    विजय डोके यांचे आवाहन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. विसापूर ता. खटाव येथे आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज यांच्या माध्यमातून विसापूर येथे १० दिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रशांत पाटील, व्यवस्थापक निलेश सूर्यवंशी,  मआविम जिल्हा समन्वयक विजय डोके , सहाय्यक जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण, तज्ञ प्रशिक्षक ऋषीकुमार फुले, अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज व्यवस्थापक सीमा पुजारी, संयोगिनी कोमल फडतरे, CRP गीतांजली ढोले यांची प्रमुख उपस्थित होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मआविम जिल्हा समन्वय विजय डोके  यांनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले असुन महिलांनी व्यवसायात उतरणे काळाची गरज आहे. त्यातून कुटुंबाचा  आण...

आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मायेची उब ' उपक्रम राबविणार:- रमेश उबाळे.

Image
आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मायेची उब ' उपक्रम राबविणार:- रमेश उबाळे.  कोरेगाव/प्रतिनिधी आज्जू मुल्ला. माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग, मूकबधिर, अपंग तसेच गोरगरीब कुटुंबातील लोकांना लोकरचे ब्लॅंकेट देऊन 'मायेची ऊब ' हा सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश उबाळे यानी घोषित केले.   रमेश उबाळे म्हणाले, आ.शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य, गोरगरीब जनता  तसेच कामगारांचे नेतृत्व आहे. दिन, दलित समाजावर  त्यांचे विशेष प्रेम आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात सामाजिक न्याय विभागतर्फे साजरा करणार आहे. गेल्या वर्षी अनेक अपंगांना व्यवसाय सुरू करून  स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी मोफत पत्र्याचे शेड व टपऱ्या दिल्या होत्या. आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्याय  विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. यावर्षी  आशा भवन येथील दिव्यांग विद्यार्थी तसेच गोरगरीब कु...

वरात श्रेयवाद थांबवा पुसेगाव ग्रामस्थांना पाणी मिळू द्या . मनसेतालुकाध्यक्ष निलेश जाधव.

Image
पुसेगावात  पाणी पुरवठा योजनेवरून लग्ना आधी वरात  श्रेयवाद थांबवा पुसेगाव ग्रामस्थांना पाणी मिळू द्या . मनसे तालुकाध्यक्ष निलेश जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पुसेगाव येथील   मंजूर झालेल्या पाणी पूरवठा योजने वरून  लग्ना  आधी वरात,, सुरू झाली आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष निलेश जाधव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले पाणी पुरवठा योजने साठी   11 कोटी 77 मंजूर झाले आहेत , ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करणारेही बॅनर , पत्रक , पोस्टर व बातम्यांच्या  माध्यमातून  स्वताची  जाहिरात बाजी करत आहेत तरी या योजनेचे राजकीय भांडवल न करता योजना पूर्णत्वास कशी जाईल यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष  निलेश जाधव उर्फ आन्नासाहेब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.   मागील कित्येक वर्षे झाले पुसेगाव  गावामध्ये चार चार दिवस पाणी येत नाही येते ते शुद्ध येत नाही ,  पुसेगाव मध्ये स्वछता ग्रहा चा प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही  प्रयत्...

शेतकऱ्यांनी आर्थिक नफ्यासाठी करार शेती करावी- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

Image
शेतकऱ्यांनी आर्थिक नफ्यासाठी करार शेती करावी- येस ग्रुप संस्थापक संजय भगत. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला  कसलाही फिक्स दराचा आधार नसल्यामुळे  काढणीपश्चात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी करार शेतीतून आर्थिक नफा घ्यावा असे अवाहन  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले दहिगाव  येथे केले. दहिगाव ता. कोरेगाव येथे करार शेती बाबत लोक गौरव विकास फाउंडेशन  दहिगाव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी चव्हाण (भाऊ) हे होते यावेळी किसन चव्हाण, विजय चव्हाण, दत्तात्रय खराडे ,मधुकर चव्हाण, तानाजी चव्हाण, भरत चव्हाण, एस आर एस चे ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.शेतकरी उत्पादन वाढवण्यात सक्षम झाला मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य व अपेक्षित दर  मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते याचा विचार करून करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुप व मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन यांनी  ...

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर ज्यांची वरून प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट.

Image
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर ज्यांची वरून प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट. पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष निलेश नलावडे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस भरत शेठ मुळे यांनी आज सातारा एमायडिसी येथील वरुण प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी वरून प्लास्टर उद्योग समूहाचे एमडी सचिनची घोरपडे तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळुंखे हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते वरून प्लास्टिक उद्योग समूह अनब्रेकेबल प्लास्टिक क्षेत्रांमध्ये एक अग्रगण्य कंपनी आहे या कंपनीची 60 ते 70 प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तसेच संपूर्ण भारतामध्ये या कंपनीचे अनेक डीलर आहेत ग्रामीण भागातील उद्योजकांनी सुरू केलेली ही कंपनी आज संपूर्ण भारतामध्ये एक नावाजलेली कंपनी म्हणून परिचित आहे याप्रसंगी विक्रमजी पावसकर यांनी या कंपनीचे एमडी आणि मराठा उद्योजक सचिन घोरपडे यांचे देखील तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल...

पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेनेने प्रथम प्रयत्न केलेग्रामस्थ हे विसरणार नाहीत:-प्रताप जाधव.

Image
पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेनेने प्रथम प्रयत्न केले ग्रामस्थ हे विसरणार नाहीत:-प्रताप जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्री सेवागिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुसेगाव व पुसेगाव मधील बाजारपेठेचे नाव प्रसिद्ध आहे दहा ते बारा हजार लोक वस्ती असलेले गाव प्रलंबित पाणीपुरवठा योजनेमुळे पिण्याच्या पाण्यासाठी बरेच दिवस झाले वंचित राहिले आहे पाणीसाठा मुबलक नसल्यामुळे गावचे पाणी योजना सुरळीत नाही हा प्रामुख्याने प्रश्न कायमच अनुत्तरीत राहिला आहे. गेले एक दोन वर्षे झालं गावातील नेते आपापल्या परीने या योजना पूर्णत्वास जावी व  मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे त्याचबरोबर शिवसेनेनेही गेले एक वर्षांपूर्वी त्यावेळचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन सदर प्रस्ताव व त्याचे डिटेल्स मंत्री महोदयांना दिले होते त्यावेळी तात्काळ याविषयी योजनेस निधी प्राप्त व्हावा याचा गावातून सर्वे होऊन प्रस्ताव सादर करावा असे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिले होते.  मंत्री  पाटील यांनी गावातील ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख मान्यवरां...

पत्रकारांना धमकावन आता पडेल महागात 50 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा होऊ शकतो तुरुंगवास.

Image
पत्रकारांना धमकावन आता पडेल महागात 50 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा होऊ शकतो  तुरुंगवास. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी ही जाहीर केले आहे की पत्रकारांची असभ्यवर्तन करणाऱ्यांना, 50 हजार रुपये दंड आणि पत्रकारांची गैरवर्तणूक करणाऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्यास आता तुरुंगात पाठवण्यात येईल , पत्रकारांना धमकवण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहजासहजी जामीन मिळणार नाही .मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले  पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा. आणि पत्रकारांची आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एफआयआर, नोंदवला जाईल .अन्यथा  एसएसपी वर कारवाई केली जाईल,  असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. तर हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष मार्केडेज काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांची गैरवर्तवणूक करू नये अशा सूचना दिली आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास  ...

सत्ता होती तर पाणी योजना दीड वर्ष का रखडलीपुसेगाव ची पाणी योजना श्रेयवादात अडकवू नका:-उपसरपंच पृथ्वीराज जाधव

Image
सत्ता होती तर पाणी योजना दीड वर्ष का रखडली पुसेगाव ची पाणी योजना श्रेयवादात अडकवू नका:- उपसरपंच पृथ्वीराज जाधव  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.                         पुसेगावची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना गेल्या दीड वर्षांपासून रखडली होती,शासन तुमच्याच विचाराचे होते मग तुम्हांला का या योजनेला मंजुरी आणता आली नाही.?पुसेगावकरांच्या विनंतीला मान देऊन आ महेश शिंदे यांनी खटाव ,देगाव,बुध बरोबरच तातडीने या योजनेत पुसेगाव चा ही समावेश करून कॅबिनेट मध्ये तात्काळ मंजुरी मिळवली.त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. नागरिकांच्या हितासाठी द्वेषभावना बाजूला ठेवून ,श्रेयवादात न अडकता विरोधकांनी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे.योजना पूर्ण होऊ द्या समोरासमोर खरेखोटे करण्यास आम्ही कधीही तयार आहोत असा इशारा पुसेगाव चे उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी दिला आहे.दिलेल्या माहितीनुसार मागील पंचवार्षिकला पुसेगावचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत  प्रस्ताव सादर केला होता.त्यावेळी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य य...

मुस्लिम बांधवांविरोधात भाषण करणाऱ्या विक्रम पावसकरांवर कारवाई करा :- रमेश उबाळे, पोलीस अधीक्षकाना निवेदन.

Image
मुस्लिम बांधवांविरोधात भाषण करणाऱ्या विक्रम पावसकरांवर कारवाई करा :- रमेश उबाळे, पोलीस  अधीक्षकाना निवेदन.  कोरेगाव/प्रतिनिधी आज्जू मुल्ला. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट  प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण करून हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, विकम विनायक पावसकर हे दुर्गा माता दौड संपन्न करण्यासाठी वाठार येथे आले होते.त्यांनी यावेळी येथे केलेल्या भाषणामध्ये मार्गदर्शन करताना सामाजीक भान विसरून हिंदू-मुस्लिम जातीय तेढ निर्माण व्हावी या हेतूने वारंवार मुस्लिम बांधवांविषयी व मुस्लिम धर्मविषयी अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य  केल्याने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपल्या...

धार्मिक कार्यात सहभागी झाल्याच्या कारणावरून कोरेगावात एकावर जीवघेणा हल्ला ;

Image
धार्मिक कार्यात सहभागी झाल्याच्या कारणावरून कोरेगावात एकावर जीवघेणा हल्ला ; कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. ईद-ए-मिलाद कार्यक्रमांमध्ये तू का आलास व तुला या कार्यक्रमाची बातमी कोणी द्यावया सांगितली या कारणावरून येथील जामा मशिदीचे  नवनिर्वाचित अध्यक्ष हमीद नजीर मुल्ला वय पन्नास वर्ष यांनी चिडून जाऊन फिरोज काझी व त्यांचा मुलगा सलमान काझी यांच्यावर जीव घेणा हल्ला करून जखमी केले. याबाबतची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.कोरेगाव येथील सलमान काजी आपल्या खाजगी नोकरी कामावर गेला असताना परत घरी माघारी जेवण करण्यासाठी येताना दुपारी दोनच्या दरम्यान साखळी पुलानजीक असलेल्या हमीद मुल्ला यांच्या फळांच्या गाड्या शेजारी लोकांची गर्दी झाली असल्याकारणाने काय झाले हे पाहण्यासाठी गेला असता,हमीद मुल्ला हे फिरोज काझी ( मुन्नाभाई ) यास तू ईद-ए-मिलाद कार्यक्रमात का आलास व त्या कार्यक्रमाची बातमी कोणाला विचारून दिलीस म्हणून शिवीगाळ व दमदाटी करीत होते व हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तेथे पडलेला दगड त्यांनी फिरोज काजीच्या छातीवर मारला हे पाहून फिरोजच्या मुलगा सलमान काझीने माझ्या ...

सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख मा.प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Image
सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख मा.प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.   हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदर्श घेत हिंदुत्व आणि सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने धावून  जाऊन न्याय मिळवून देणारे त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन योग्य रित्या मार्गदर्शन करणारे सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुसेगाव नगरीचे सुपुत्र मा. प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.   शुभेच्छुक-  किल्ले वर्धनगड शिवसेना शाखाप्रमुख असलम भाई शिकलगार. महाराष्ट्र रंग कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. संजय घोरपडे.

खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या योगदानातून पुसेगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लागली चेअरमन बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन.

Image
खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या योगदानातून पुसेगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लागली  चेअरमन बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन. पुसेगांव प्रतीनिधी पंकज कदम. पुसेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा जलजीवन योजना मार्गी लावण्यात खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे पुसेगाव ग्रामपंचायतीचे 14 सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. विरोधक या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करीत असून, योजनेसाठी त्यांनी काय परिश्रम केले ते स्पष्ट करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नुकतीच पुसेगाव साठी जीवन पाणीपुरवठा योजना साठी 11 कोटी 77 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेच्या श्रेयवादासाठी पुसेगाव मध्ये तीन गटामध्ये श्रेयवाद सुरू झाला असून, याबाबत श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  यावेळी सरपंच विजय मसने, रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव, सुरेश शेठ जाधव,विश्वस्त गौरव जाधव, विश्वस्त संतोष वाघ, विश्वस्त सचिन देशमुख, ग...

लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन व ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया. सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

Image
लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन व ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया. सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.   फलटण प्रतिनिधी. प्रवीण अहिवळे.   फलटण- गणेशशेरी गोविंद दूधडेरी समोर जय मल्हार हॉटेल शेजारी लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन भव्य शुभारंभ त्याच बरोबर ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा. श्री दीपक राजे पांढरे साहेब निवृत्त न्यायाधीश यांच्या हस्ते रिबेन  कापून पार पडला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब. सातारा जिल्हाध्यक्ष मा. बबनराव मदने उर्फ नाना. सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने. फलटण तालुका अध्यक्ष आनंदराव भोसले. सातारा 24 तास न्यूज चे मुख्य संपादक अकबर भालदार. मुख्य उपसंपादक नितीनराव घोरपडे सर. नरसोबा पत संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन मा. ज्ञानेश्वर दिनकर राव मुळीक उर्फ नाना. शकील सय्यद. निशिकांत अहिवळे. प्रवीण अहिवळे. दिलीप ननवरे. महावीर व्होरा. नाथा सोडमिसे. महेंद्र देवासी....

येस ग्रुप 1011 एकरा वरती करणार 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग' सोयाबीनला देणार 8100 रुपये दर - येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.

Image
येस ग्रुप 1011 एकरा वरती करणार 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग' सोयाबीनला देणार 8100 रुपये दर - येस ग्रुपचे संस्थापक  संजय भगत.       पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. माझ्या शेतीमालाला  काय दर मिळणार याचे टेन्शन सोडा आणि आमच्याशी नाते जोडा' या येस ग्रुपच्या  कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या अभिनव उपक्रमामध्ये  शेतकरी ,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या , गावांनी सहभागी व्हावे असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले     फत्त्यापूर ता. जि. सातारा येथे झालेल्या बागायतदार शेतकरी मेळाव्यात श्री संजय भगत मार्गदर्शन करत होते यावेळी सोसायटी चेअरमन तानाजी घाडगे ,माजी उपसरपंच अधिक घाडगे,  येसांकुर कंपनी चे ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती           शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून जादा उत्पादन झाले पाहिजे व फिक्स दर मिळवा यासाठी मदर अर्थ हेल्थ फाउंडेशन व येस ग्रुपच्या  येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी जाखणगाव ता. खटाव, येसांकुर सीड प्रायव्हेट लिमिटेड,  यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम 2022-23 हेल्थ कप पि...

शहिदा अब्बास भाई शेख यांचे अल्पशा आजाराने निधन.

Image
शहिदा अब्बास भाई शेख यांचे अल्पशा आजाराने निधन.  कोरेगाव - अज्जू मुल्ला. शहीदा आब्बासभाई शेख यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 67 व्या वर्षी  दुःखद निधन झाले. मूळ गाव भसापाची वाडी सातारा जि.सातारा सध्या मुबई येथे रहिवासी होत्या, माटूंगा येथील प्रशिद्ध उद्योजक राजू फ्रेंकी या प्रोडक्शन कंपनीचे मालक, सिकंदर आब्बास शेख व मुकंदर आब्बास शेख यांच्या त्या मातोश्री होत्या यांचा स्वभाव मनमिळावू कडक व शिस्तबद्ध असा होता तसाच फार प्रेमळही होता, त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार केल्याने स्वतःचे मोठे नाव कमवून व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगला जम बसवला त्यांना त्यांच्या आईचे नेहमीच पाठबळ मिळत गेले. परंतु त्यांना नियतीने त्यांच्यातून अल्पशा आजाराने वयाच्या 67   व्या वर्षी  त्यांच्यातून हिरावून नेले त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबासमवेत नातेवाईक व अप्तेष्टमंडळी यांचेवर दुःख व शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात   दोन मुले आणी दोन मुली सुना व नातवंडे आसा परिवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्...

ॲकॅडमी ऑफ मार्डन आर्ट्स संस्थेचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम सपंन्न.

Image
ॲकॅडमी ऑफ मार्डन आर्ट्स संस्थेचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम सपंन्न.   फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने  ॲकॅडमी ऑफ मॉर्डन आर्ट्स संस्थेचा भव्य फॅशन कार्यक्रमाचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन करून फॅशन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी ॲकॅडमी ऑफ मॉर्डन आर्ट्स या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिने स्टार अभिनेत्री सौ.नयन संतोष राजमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी त्या पुढे म्हणाल्या ही संस्था बारामती मध्ये व पुणे जिल्हा परिसरामध्ये 2010 सालापासून चांगल्या पद्धतीने चालवत आहे, तेव्हापासून ही संस्था महाराष्ट्र जागतिक पदावर कार्यरत आहे. सदर संस्थेमध्ये फॅशन डिझाईनिंग. हॉटेल मॅनेजमेंट. इंटेरियर डिझाईनिंग ही दोन वर्षाची प्रोफेशन कोर्स शिकवली जात असून संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% गॅरंटी ने जॉब दिले जाते. आज पर्यंतच्या कार्यखंडामध्ये संस्थेकडून भारत व भारताबाहेर अनेक विद्यार्थी जॉब करीत आहेत अशी माहिती यावेळी दिली. या ॲकॅडमी ऑफ मॉर्डन फॅशन मध्ये अनेक महिला यांनी उपस्थितीत राहून चांगला प्रत...

जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे.

Image
रमेश उबाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आ.बाळासाहेब पाटील.रामराजे नाईक निंबाळकर. खा.श्रीनिवास पाटील.आ.शशिकांत शिंदे.  जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे. कोरेगाव/प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.  माजी जलसंपदामंत्री आ.शशिकांत शिंदे यांचे विश्वासु सहकारी रमेश उबाळे यांची  जि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे यांची एकमताने निवड झाली. कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा  मेळाव्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.        रमेश उबाळे हे ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांचा सातारा येथे बालाजी कन्स्ट्रक्शन हा बांधकाम व्यवसाय आहे. व्यवसायाबरोबरच त्यांना सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करण्याची विशेष आवड आहे . तीन वर्षांपूर्वी  त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय  घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश  करून आपले काम सुरू केले. प्रारंभी त्यांना आ.शशिकांत शिंदे या...

नवरात्री उत्सवानिमित्त सोमंथळी तालुका फलटण येथे ह.भ.प.हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य किर्तन उत्साहात संपन्न.

Image
नवरात्री उत्सवानिमित्त सोमंथळी तालुका फलटण येथे ह.भ.प.हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य किर्तन उत्साहात संपन्न.  फलटण सोमंथळी प्रतिनिधी.निशिकांत अहिवळे.  जय भवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळ सोमंथळी नजीक सरकारी मळा येथे नवरात्र उत्सवानिमित्त अनेक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मंडळाच्या वतीने युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले त्यांनी किर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा घेतलेला अभंग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती तसेच कीर्तन सेवेत देवीची उत्पत्ती देवीचे चरित्र व 51 शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली हे सविस्तर सांगितले पुढे त्यांनी आईचे महत्व सांगत असताना त्यांनी आईच्या गर्भात मुलावर आई कसे संस्कार करत असते याचेही महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले या कार्यक्रमात प्रामुख्याने महिला मोठया भवसंख्येने उपस्थितीत होत्या या कीर्तन सेवेत किरण महाराज अहिवळे  गोपीचंद खरात बाळासाहेब पवार  व बापूराव सोडमिसे महाराज सो मंथळी यांनी त्यांना साथ दिली या कार्यक्रमात ह्यूमन र...

बरड तालुका फलटण येथील सब मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली परंतु एक बँक फोडण्यात चोरट्यांना अपयश.

Image
बरड तालुका फलटण येथील सब मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली परंतु एक बँक फोडण्यात चोरट्यांना अपयश.   फलटण सोनवडी प्रतिनिधी.नासीर शेख.   फलटण तालुक्यातील बरड गावातील महाड पंढरपूर रस्त्यालगत असणारे सब मार्केट यार्ड मध्ये अनेक दुकाने असून त्या दुकाना पैकी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री तीन दुकाने फोडून त्या दुकानातील अनेक वस्तू चोरून नेल्या परंतु एक बँक फोडण्यास अज्ञात चोरट्यांना अपयश आले असून दुकान धारक यांनी चोरी झाले बाबद बरड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता अधिक तपास बरड पोलीस करीत आहेत.

येस ग्रुपच्या "करार शेती " पॅटर्नमुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल - महाव्यवस्थापक संजय सुद्रिक.

Image
येस ग्रुपच्या "करार शेती " पॅटर्नमुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल  - महाव्यवस्थापक संजय सुद्रिक. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.         जाखनगाव येथील येस ग्रुपने सोयाबीन बीजोत्पादन व सोयाबीन खरेदी करार शेती पॅटर्न मुळे शेतकरी कर्जबाजारीपणा कमी होऊन शेतकरी आत्महत्या मध्ये घट होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे महाव्यवस्थापक संजय सुद्रिक यांनी केले.जाखनगाव ता. खटाव जि. सातारा येथील येस ग्रुपच्या येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी संचलित सोयाबीन खरेदी केंद्र क्रमांक 1  गोदाम क्रमांक 1  चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या समारंभ प्रसंगी सहकार बोर्डाचे महाव्यवस्थापक संजय सुद्रिक बोलत होते यावेळी शेतीमालतारण व्यवस्थापन तज्ञ प्रशांत चास्कर, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे , येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत, शेती निविष्ठा वितरण हेड पांडुरंग जाधव ,राज्य बाजार व्यवस्थापक कुशाग्र मुंगी ,ॲग्री बाजार व्यवस्थापक रवींद्र साखरे, आर्या  कोलेटरल क्षेत्रीय प्रमुख गणेश देशमुख, येस बँकेचे महाव्यवस्थापक हरतेज सिंग यांची प्रमुख...

कोरेगाव येथील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक संपन्न.

Image
कोरेगाव येथील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक संपन्न. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कनेते मा.दिवाकरजी रावते साहेब,शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा.दगडुदादा सकपाळ, शिवसेना उपनेते,सातारा सांगली संपर्कप्रमुख मा.नितीन बानूगडे पाटील(सर)यांच्या मार्गदर्शना खाली व शिवसेना जिल्हा प्रमुख, मा.प्रतापदादा जाधव उपजिल्हाप्रमुख,मा.दत्ता नलवडे,तालुकाप्रमुख मा.रमेश बोराटे,तालुकाप्रमुख मा.सचिन झांजुर्णे,तालुकाप्रमुख मा.दिनेश देवकर,महिला आघाडी प्रमुख मा.उज्वला भोसले,यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगाव विधानसभा कोरेगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक शनिवार दि.०१/१०/२०२२, सकाळी ठिक - ११:०० वाजता सर्किट हाऊस कोरेगाव येथे आयोजित करण्यात आली  बैठकीस तालुक्यातील आजी- माजी पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक, महिलाआघाडी,युवासेना,शिवसेनेच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरेगाव आणि माण- खटाव विधानसभा मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार-जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव.

Image
कोरेगाव आणि माण- खटाव विधानसभा  मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार-जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. शिवसेना आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे अतूट नाते असून यावर्षीही बहुसंख्येने निष्ठावान शिवसैनिक दसरा मेळाव्याला वाजत गाजत उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणार आहेत.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेच्या १९६६ च्या स्थापनेपासून होत असलेला शिवतीर्थावरील दसरा मेळावा आजतागायत एक नेता, एक मैदान ,एक विचार असाच होत आहे.हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला असून त्याच विचारधारेवर आजही शिवसेना ठाम असून कितीही वादळे आली तरी शिवसेना डगमगली नसून आत्मसन्मान आणि निष्ठेचा वारसा आजही जपला असून सद्यस्थितीत चालू राजकीय घडामोडीत गद्दारांच्या बंडातूनही शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आगामी काळात शिवसेना एकमेव पक्ष आहे जो महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देऊ शकतो दसरा म...

विसापूर येथे स्पर्श क्लीनिक व लॅबोरेटरी तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

Image
विसापूर येथे स्पर्श क्लीनिक व लॅबोरेटरी तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. विसापूर तालुका खटाव येथे स्पर्श क्लिनिक  अॅण्ड लॅबोरेटरी यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा ता पर्यंत या शिबीराचे आयोजन असून डॉक्टरांकडून मोफत तपासणीमध्ये ब्लडप्रेशर, ऑक्सीजन, पल्स ,स्त्रीरोग, गर्भसंस्कार मार्गदर्शन, पोटाचे पचनाच्या समस्या ,त्वचारोग निदान, सर्दी, खोकला, बालरोग, अस्थिरोग, संधिवातासाठी मोफत औषधे व रक्त तपासणी मोफत एच. बी. होमोग्लोबिन, मधुमेही रुग्णांसाठी मोफत शुगर तपासणी ,थायरॉईड तपासणी सवलतीच्या दरात असून हे शिबीर जय भवानी कॉम्प्लेक्स भवानीनगर विसापूर येथे आयोजन केले असून डॉ. पराग रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.सुषमा रणदिवे , तुषार रणदिवे यांच्या उपस्थितीत होणार असून विसापूर परिसरातील ग्रामस्थ , वाडी, वस्तीवरील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर पराग रणदिवे यांनी केली आहे.