अल्पसंख्याक बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा :मा.जिल्हाधिकारी सो!



अल्पसंख्याक बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा :मा.जिल्हाधिकारी सो!

 कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.

  कोरेगाव शेजारील कब्रस्तान लगत असणाऱ्या वॉल कंपाऊंड तोडून काही जणांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमणाच्या बाबत कोरेगाव येथील मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असता काही लोकांनी मनात राग ठेवून संबंधित अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहीद कुरेशी यांच्या वरती प्राण घातक हल्ला करून त्यांची गाडी पेटवली व तसेच त्यांचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला अशा काही अल्पसंख्याक विरोधी लोकांच्या वरती कडक कारवाई होणे गरजेचे आहे एकंदरच म्यपको कोरेगाव येथील कब्रस्तान लगत असणाऱ्या अतिक्रमण  करणाऱ्यांची संख्या एक वरून पाच पर्यंत पोहोचलेली आहे त्याच संबंधितांनी कुरेशी यांच्यावरती जीवघेणी हल्ला केलेला आहे तरी अशा लोकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा बुधवार दिनांक 28 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या  वतीने अल्पसंख्याक बांधवांच्या न्याय हक्कासाठी व कब्रस्तान बचाव यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.