कर्कश्य आवाज करणाऱ्या वाहन धारकांवरती फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई Dysp विशाल खांबे अकॅशन मोडवर.
कर्कश्य आवाज करणाऱ्या वाहन धारकांवरती फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई Dysp विशाल खांबे अकॅशन मोडवर. फलटण प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल. दिनांक २५/०२/२०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाणेकडुन फलटण शहरात मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणेकडुन एकुण ६ बुलेट व १ यामाहा अशा मोटार सायकल ताव्यात घेवुन त्या मोटार सायकल बुलेट या मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविण्यात आलेले होते. व १ यामाहा गाडी मॉडीफाय करण्यात आलेली होती. सदर गाडयावर प्रभावी कारवाई व्हावी या करिता मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण (RTO) यांना त्या मोटार सायकलवर कारवाई करण्याकरिता अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालाच्या अनुशंगाने मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण (RTO) यांनी सदर मोटार सायकलची तपासणी करुन घेवुन मोटार सायकल चालक व मालक यांना एकुण ५५,५००/- रुपये दंड आकरण्यात करण्यात आलेला आहे. तसेच बुलेट मोटार सायकलचे सायलेन्सर काढुन घेण्यात आलेले आहेत. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सदर मोटार सायकल यांचेवर...