कोरेगाव येथील विधवा 70 वर्षीय वृद्ध महिलेस आसिफ मणेर यांची शिवीगाळ व दमदाटी ;
कोरेगाव - अज्जू मुल्ला.
कोरेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दौलत चित्र मंदिरासमोरील 70 वर्षे विधवा महिलांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्या आसिफ इसाक मणेर यांचे वर कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. फिर्यादी श्रीमती सईदा मुसा भाई मणेर यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी सईदा मणेर या आपल्या दुकानासमोरील छतावर साचलेले पाणी काडीत असताना जाणीवपूर्वक समोर येऊन तू मला पाहून माझे अंगावर पाणी उडवलेस म्हणून शिवीगाळ करीत व 70 वर्षीय वृद्धेश अर्वाच्य भाषेमध्ये बोलत दमबाजी करीत अंगावर धावून गेला व मारण्याची धमकी दिली, यांची घरे मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे या भांडणामुळे सगळ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती तर असिफ मणेर हा बघ्यांच्या गर्दीमुळे अधिकच रस्त्यावर तमाशा करत होता. यास अनुसरून भीतीने या वृद्धेने आरोपी असिफ इसाक मणेर यांचे विरुद्ध कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
Comments
Post a Comment