निढळ येथील आयआयटी पवई मुंबई येथील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा मा.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन.

निढळ येथील आयआयटी पवई मुंबई येथील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा  मा.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

निढळ ता खटाव येथे आय आय टी  पवई मुबई मधील 33 विद्यार्थी यांनी या गावचा अभ्यास दौरा केला. त्यावेळेस माजी विभागीय आयुक्त व निढळ चे सुपुत्र चंद्रकांत दळवी यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की  ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गुणवत्ते मध्ये कुठे ही कमी नाही. मराठी मीडियम मधील विद्यार्थी सुध्दा आय आय टी मध्ये जावू शकतात हे या अभ्यास दोऱ्यात आलेल्या काही विद्यार्थी यांनी दाखवून दिले आहे.प्रयत्न आणि कष्ट केल्यास आपल्या विद्यार्थ्यांना आय आय टी अशक्य नाही . 
यावेळी निढळ परिसरातील विद्यार्थी व आय आय टी मधील विद्यार्थी  यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आय आय टी मधील विद्यार्थ्यांना येथील विद्यार्थी अनेक प्रश्न विचारले व त्याची उत्तरे आय आय टी मधील विद्यार्थी नी दिली. व येथील तरुणांना प्रोत्साहन दिले.
 आय आय टी मधील विध्यार्थ्यांना दोन दिवस निढळ चा अभ्यास दौरा केला. यामध्ये निढळ मधील विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यानी  निढळ येथील पाणलोट क्षेत्रातील विकास कामाचे कौतूक केले .
निढळ मधील या विकास कामाचाअभ्यासासाठीआमच्या आय आय टी  शिक्षणा साठी  उपयोग होणार आहे.निढळ  गावाने ग्रामीण भागात विकास कसा केला जातो याचा आदर्श निर्माण केला आहे. आमच्या या अभ्यास दोऱ्यात 33 विद्यार्थी आहेत. त्यातील काही विद्यार्थी जर्मनी सारख्या देशातून आले आहेत .तसेच अनेक जन अनेक राज्यातून आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात आय आय  टी संस्थेचे स्थापना  झाली  वआज ही संस्था जगातील नामवंत संस्था आहे .जगातील अनेक देशातुन व अनेक राज्यांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.मराठी तरुण ही यात कुठेही मागे नाही .जर जिद्द असेल तर गरिबी ,सामाजिक परिस्थिती, ग्रामीण भाग या साठी आड येत नाही.असे आय आय आय टी मधील विद्यार्थी विश्वनाथ फाळेगावकर यांनी सांगितले .यावेळी निढळ मधील विद्यार्थी वर्ग ,पालक वर्ग व ग्रामस्थ  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.