अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई यांच्याकडून कोविडयोद्धा वहर्ष फाउंडेशन अध्यक्ष आप्पा घोरपडे यांचा सन्मान.
हर्ष फाउंडेशन अध्यक्ष आप्पा घोरपडे यांचा सन्मान.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते.कोरोनाच्या काळात तसेच कोरोना नंतर सुद्धा प्लाझ्माचें, रक्ताचे मदत मुंबई पोलीस यांना वेळोवेळी हर्ष फाउंडेशन कडून होत आली आहे. हर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून रक्तदानातील भरीव कार्य झाले आहे .असे मत अ .पो. नि. रवी देसाई यांनी मांडले. ते रेहाना शेख क्राईम ब्रँच ऑफिसर यांनी मुंबई पोलीस 2011 च्या बॅचला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य कार्यक्रमाचे नियोजन गिरगाव मुंबई करण्यात झाले होते. त्या वेळी बोलत होते.
रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अपघातात अनेकदा रक्ताची तात्काळ गरज पडते .पोलीस शक्य ती मदत करतात पण त्यांच्या कार्याला आम्ही रक्त दानाच्या माध्यमातून हर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून मदत करत असतो असे हर्ष फाउंडेशन चे अध्यक्ष आप्पा घोरपडे यांनी सत्कार स्वीकारताना सांगितले. तसेच भविष्यात रस्त्यावर झालेल्या अपघातातील कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता जाणवु नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत.तसेच कोणतताही रुग्ण रक्ताच्या कमतरतेमुळे मृत्यू पावू नये असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई ,गिरगाव पोलीस चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे ,पी.एस.आय भोसले मॅडम. व 2011 च्या बॅच चे सर्व पोलीस वर्ग उपस्थितीत होते.रक्तदान सारख्या पवित्र कार्यामुळे प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब घोरपडे यांचे सर्वानी कौतुक केले .
Comments
Post a Comment