मासाळवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पदांवर नियुक्त झालेल्यांचा अनिल देसाई यांच्या हस्ते सत्कार.

मासाळवाडी येथील  गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पदांवर नियुक्त झालेल्यांचा अनिल देसाई यांच्या हस्ते सत्कार.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

मासाळवाडी येथे गणपती निमित्त विद्यार्थी गुणगौरव तसेच गावातील इंडियन नेव्ही,आर्मी,पोलीस व विविध सरकारी पदावरती नेमणूक झालेला चा सत्कार समारंभ कार्यक्रम व मासाळवाडीचे युवा उद्योजक अविनाश मासाळ यांच्या मुलाचे व सचिन मासाळ यांच्या मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रमास सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई व त्यांच्यासोबत रासपाचे बबन दादा विरकर व दादासाहेब दोरगे साहेब तसेच मासाळवाडी गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिलभाऊ देसाई म्हणाले मासाळवाडी मध्ये अविनाश मासाळ यांनी गणपती उत्सवाच्या निमित्ताने व आपल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील गुणवंतचा सत्कार तसेच गावातील नवीन नेमणूक झालेले विविध पदांवरती युवकांचा  सत्कार असा कार्यक्रम घेतलेला आहे त्याची मी मनापासून कौतुक करतो.मासाळवाडीतील कोणालाही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काही मदत लागली तर मी सदैव आपल्यातला कार्यकर्ता म्हणून मदत करीन  मासाळवाडी येथील गुणवंतांचे अभिनंदन करतो व अविनाश व. सचिनच्या मुलांना दीर्घायुष्य होवो व त्यांचे जीवन निरोगी व आनंदमय जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमास विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ महिलावर्ग हजर होते

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.