कोरेगाव ग्रामपंचायत च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्याकडून कोरेगाव ग्रामपंचायतच्या सर्व हयात सरपंच यांचा यथोचित सत्कार.
कोरेगाव ग्रामपंचायत च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्याकडून कोरेगाव ग्रामपंचायतच्या सर्व हयात सरपंच यांचा यथोचित सत्कार.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
कोरेगाव ग्रामपंचायतला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरेगाव नगरपंचायत व राष्ट्रवादीच्या वतीने हयात असणाऱ्या सर्व आजी-माजी सरपंच यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.8 सप्टेंबर 1922 रोजी कोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती..आज 8 ऑगस्ट सन 2022 रोजी ग्रामपंचायत स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने कोरेगाव ग्रामपंचायत प्रथम सरपंच स्वर्गीय बुवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या नगरपंचायत कार्यालयात असलेल्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ दिपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे विषय समिती सभापती आघाडीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यासह नगरपंचायत राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवक नगरसेविका कोरेगाव शहरातील बहुसंख्य ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोरेगाव ग्रामपंचायतच्या हयात असणाऱ्या सर्व माजी सरपंच यांचा मिठाई शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान केला.
Comments
Post a Comment