तडवळे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडा: क्षीरसागर.
तडवळे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडा: क्षीरसागर. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव दिनांक 29 ग्रामपंचायतच्या सर्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांची प्रक्रिया सध्या चालू आहे .कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगावची सर्वत्रिक निवडणूक देखील जाहीर झाली असून अर्ज भरण्यापासून चिन्ह वाटपापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही निवडणूक अत्यंत शांततेने ग्रामस्थांनी पार पाडावी असे आवाहन या गावासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. तडवळे संमत कोरेगाव येथे अकरा सदस्य पदाच्या जागा आणि एक सरपंच अशा बारा पदांसाठी निवडणूक होत आहे .२४ उमेदवार रिंगणात आहेत.तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालू आहे. आत्तापर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे चांगले सहकार्य आहे. हेच सहकार्य पुढे कायम ठेवावे .प्रचार असो की प्रत्यक्ष निवडणूक आणि त्यानंतर निकाल असो या सर्व टप्प्यांवर शांतता आणि संवाद गरजेचे आहे. तरी या बाबतीत सर्वच ग्रामस्थांनी जागरूक राहावे ,असे श्री. क्षीरसागर म्हणाले. दिनांक पाच नोव्हेंबर २०२३ रोजी निवडण...